ब्लॉग नं. 2026/089. दिनांक: 30 मार्च,2026. मित्रांनो, आजकाल तरुण मुलांचे किंवा प्रौढ लोकांचे देखिल, कुठलेही आजार नसतांना मृत्यूमुखी पडल्याच्या घटना,ऐकायला मिळतात.जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टर, सध्या याच विषयावर सखोल संशोधन करत आहेत. कोविड- 19 केवळ फुफ्फुसांचा आजार नसून तो रक्तवाहिन्या आणि हृदयावरही गंभीर परिणाम करतो , हे आता सिद्ध झाले आहे.या विषयावर आधारित एक ब्लॉग मी आज सादर करत आहे. सविस्तर: ' सायलेंट ' कोविड आणि वाढते हृदयविकाराचे झटके: काय सांगते जागतिक संशोधन ? कोविड- 19 ची लाट ओसरून आता बराच काळ लोटला असला , म्हणजे 22 मार्च, 2020 ला आपल्या देशांत,त्याने प्रवेश केला असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले, तरी त्याचे सावट अद्याप गेलेले नाही. अनेक लोकांना वाटतं की,त्यांना कधीच कोविड झाला नाही , पण प्रत्यक्षात त्यांना Asymptomatic ( लक्षणे नसलेला) कोविड झालेला असू शकतो.आजकाल आपण बातम्यांमध्ये वाचतो की , तरुण आणि तंदुरुस्त दिसणाऱ्या व्यक्तींचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने ( Heart Attack) मृत्यू होत आहे. याचा आणि कोविडचा काही संबंध आहे का ? यावर जगभरात काय सं...
ब्लॉग नं. 2026/ 083. दिनांक: 24 मार्च , 2026. मित्रांनो, सावधान! तुम्ही खाताय तो गूळ शुद्ध आहे का ? FSSAI ने सांगितली भेसळ ओळखण्याची सोपी पद्धत साखरेला एक आरोग्यदायी पर्याय म्हणून,आजकाल घराघरांत गुळाचा वापर वाढला आहे. मग तो चहा असो , गुळाची लापशी असो किंवा पुरणपोळी , गुळाशिवाय भारतीय पक्वान्न अपूर्ण आहेत.परंतु , तुम्ही विकत आणलेला गूळ खरोखरच शुद्ध आहे की,त्यात घातक रसायने आणि खडूची पावडर मिसळली आहे ? नुकतेच ' भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने ' (FSSAI) ग्राहकांच्या आरोग्यासाठी गुळाची शुद्धता तपासण्याची एक अत्यंत सोपी घरगुती चाचणी शेअर केली आहे.याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ या. सविस्तर: घरीच कशी करावी गुळाची शुद्धता चाचणी ? (DIY Test) : ही चाचणी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या उपकरणाची गरज नाही , फक्त पाणी आणि काचेचा ग्लास पुरेसा आहे: 1. तुकडा घ्या: गुळाचा एक लहान तुकडा घ्या. 2. पाण्यात टाका: एका काचेच्या पारदर्शक ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात तो गुळाचा तुकडा...