ब्लॉग नं.: 2026/074 दिनांक: 15 मार्च 2026. मित्रांनो , मधुमेहाच्या रुग्णांनी भात कसा खावा ? मधुमेह ( Diabetes) हा आजच्या काळातील एक अतिशय सामान्य,पण गंभीर आजार बनला आहे. भारतात लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत.मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे . कारण आपण जे काही खातो-पितो त्याचा थेट परिणाम रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर होत असतो.या बद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: विशेषतः भात ( Rice) या पदार्थाबाबत मधुमेहाच्या रुग्णांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो. “ आपण भात खाऊ शकतो का ?” कारण भात हा आपल्या भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.महाराष्ट्रात तर दुपारच्या जेवणात भाताशिवाय जेवण पूर्णच होत नाही.परंतु तज्ञांच्या मते , योग्य पद्धतीने खाल्ल्यास मधुमेहाच्या रुग्णांनाही भात खाता येऊ शकतो. भात आणि मधुमेह – नेमकी समस्या काय ? भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स ( Glycemic Index – GI) तुलनेने जास्त असतो. याचा अर्थ असा की भात खाल्ल्यानंतर रक्तात...
ब्लॉग नं. 2026/068 दिनांकः 9 मार्च , 2026. मित्रांनो , सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू आहे. द्राक्ष येण्यास कधीच सुरुवात झालेली. पण सुरुवातीला द्राक्ष थोडी आंबट असतात आणि सीजन संपता संपता,गोड द्राक्ष बाजारांत यायला सुरुवात होते.मी बँकेच्या एका शाखेत असतांना,एका द्राक्ष बागेला भेट द्यायचा प्रसंग आला.म्हणजे इन्सपेक्शनला गेलो होतो. त्या शेतकऱ्याने द्राक्ष बागेला पाणी पुरविण्याची एक नवीन सिस्टम विकत घेतली होती, पाणी पुरवठा,मोबाईलचा उपयोग करून कसा करता येतो,(ऑनलाइन) हे दाखविण्यासाठी मला बोलावले होतं.द्राक्षावर किती मोठ्या प्रमाणात किटकनाशकाची फवारणी करण्यात येते. हे तेव्हा अनुभवलं होतं.मग द्राक्ष अधिक स्वच्छ धुवून घ्यायला सुरुवात केली,पण इतक्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने ती कशी धुवावीत,या संबंधी एक पोस्ट वाचली,ती आज शेअर करतोय. सविस्तर: द्राक्षे व्यवस्थित कशी स्वच्छ करावीत? तुम्ही द्राक्षे धुतल्याशिवाय खाता का ? म्हणजे चव पहाण्यासाठी म्हणून? मग त्यांना स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या खाण्यापूर्वी फळे ध...