ब्लॉग नं. 2026/068 दिनांकः 9 मार्च , 2026. मित्रांनो , सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू आहे. द्राक्ष येण्यास कधीच सुरुवात झालेली. पण सुरुवातीला द्राक्ष थोडी आंबट असतात आणि सीजन संपता संपता,गोड द्राक्ष बाजारांत यायला सुरुवात होते.मी बँकेच्या एका शाखेत असतांना,एका द्राक्ष बागेला भेट द्यायचा प्रसंग आला.म्हणजे इन्सपेक्शनला गेलो होतो. त्या शेतकऱ्याने द्राक्ष बागेला पाणी पुरविण्याची एक नवीन सिस्टम विकत घेतली होती, पाणी पुरवठा,मोबाईलचा उपयोग करून कसा करता येतो,(ऑनलाइन) हे दाखविण्यासाठी मला बोलावले होतं.द्राक्षावर किती मोठ्या प्रमाणात किटकनाशकाची फवारणी करण्यात येते. हे तेव्हा अनुभवलं होतं.मग द्राक्ष अधिक स्वच्छ धुवून घ्यायला सुरुवात केली,पण इतक्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने ती कशी धुवावीत,या संबंधी एक पोस्ट वाचली,ती आज शेअर करतोय. सविस्तर: द्राक्षे व्यवस्थित कशी स्वच्छ करावीत? तुम्ही द्राक्षे धुतल्याशिवाय खाता का ? म्हणजे चव पहाण्यासाठी म्हणून? मग त्यांना स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या खाण्यापूर्वी फळे ध...
ब्लॉग नं. 2026/0 62. दिनांक: 3 मार्च , 2026 . मित्रांनो , 🍈 फणस – “उष्णकटिबंधीय फळांचा राजा” आणि नैसर्गिक सुपरफूड भारतात उन्हाळ्यात आंब्यासोबत ज्याचे नाव प्राधान्याने घेतले जाते,ते फळ म्हणजे फणस . आकर्षक आकार , अनोखी चव आणि भरपूर पोषणमूल्ये,यांमुळे फणसाला “उष्णकटिबंधीय फळांचा राजा” असे म्हटले जाते. दक्षिण आणि आग्नेय आशियात मूळ असलेले हे फळ,आज जगभरात सुपरफूड म्हणून ओळखले जाते.पिकलेला फणस नैसर्गिक गोडवा देतो , तर कच्चा फणस भाजी , बिर्याणी , कटलेट किंवा अगदी “व्हेगन मीट” पर्याय म्हणूनही वापरला जातो. विशेष म्हणजे त्याच्या बिया सुद्धा पौष्टिक असतात. म्हणजेच फणस हा खऱ्या अर्थाने संपूर्ण फळ आहे.आज या फळाबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: 🌿 पोषक तत्वांनी समृद्ध खजिना : फणसामध्ये पुढील महत्त्वाचे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात: व्हिटॅमिन C , व्हिटॅमिन A , पोटॅशियम, मॅग्नेशियम, आहारातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स. हे घटक शरीराला रोजच्या गरजांसाठी आवश्यक ऊर्जा आणि संरक्षण देतात. त्यामुळे फणस हे सर्वात पौष्टिक उष्णकटिबंधीय फळांपैकी एक म...