ब्लॉग नं. 2026/039. दिनांक: 8 फेब्रुवारी, 2026. मित्रांनो, मानसिक आजार म्हणजे वेड नाही मानसिक आजारांवर दर रविवारी एक ब्लॉग लिहायचं ठरवलं आहे.त्याच उपक्रमातील हा दूसरा ब्लॉग. आज आपण मानसिक आजार म्हणजे काय? आणि त्यासंबंधीचे जे गैरसमज आहेत, त्यावर जाणून घेऊ या. सविस्तर: “ तो वेडा झाला आहे.” किंवा “ तिला मानसोपचाराची गरज आहे,म्हणजे काहीतरी बिनसलंय.” अशी वाक्ये आजही आपल्या समाजात सहज ऐकायला मिळतात.पण यामागे एक मोठा गैरसमज दडलेला आहे आणि तो म्हणजे मानसिक आजार म्हणजे वेड पण यांत अजिबात तथ्य नाही. मग मानसिक आजार म्हणजे काय ? मानसिक आजार म्हणजे, विचार करण्याची पद्धत बदलणे किंवा भावना नियंत्रणाबाहेर जाणे आणि वागण्यात बदल होणे. जसं शरीराला ताप , मधुमेह , रक्तदाब होतो, तसंच मनालाही आजार होतात.याचं एक वास्तववादी उदाहरण खालील दिले आहे. स्मिता एक सुशिक्षित , जबाबदार आई आहे. ती घर सांभाळते , नोकरी करते , सगळ्यांची काळजी घेते. पण काही महिन्यांपासून-- तिला झोप येत नाही--लहानसहान गोष्...
ब्लॉग नं: 2025/0 32 . दिनांक: 1 फेब्रुवारी, 2026. मित्रांनो, मानसिक आजार आणि लग्न आज समाजात जसे शारीरिक आजार वाढत आहेत,तसेच मानसिक आजार वाढत आहेत.समाजात लग्न म्हणजे स्थैर्य , सुरक्षितता आणि सुखाचा आरंभ असे मानले जाते. दोन कुटुंबांचा , दोन व्यक्तींचा आणि त्यांच्या स्वप्नांचा मिलाफ अशी एक सुंदर कल्पना. पण या सुंदर चित्राच्या मागे एक वास्तव आहे , ज्याबद्दल आपण फारसं बोलत नाही,ते म्हणजे मानसिक आजार . आजपासून दर आठवड्याला,रविवारी एका मानसिक आजारावर लिहायचं ठरवलं आहे. आजचा ब्लॉग त्यातील पाहिला. सविस्तर: आजही शारीरिक आजाराबद्दल खुलेपणाने चर्चा होते , पण मानसिक आजाराचा उल्लेख झाला की कुजबुज , भीती आणि लपवाछपवी सुरू होते. विशेषतः लग्नासारख्या संवेदनशील विषयात देखिल, “ मानसिक आजार आहे” हे सत्य लपवले जाते का ? दुर्दैवाने , हो. लग्न जुळवताना कुंडली , शिक्षण , नोकरी , पगार , घर , जात हे सगळे मुद्दे खुलेपणाने मांडले जातात. पण जर मुलगा किंवा मुलगी नैराश्य , चिंता विकार , बायपोलर डिसऑर्डर , OCD क...