Blog No. 202 4 / 080. Date: 24 th , April 202 4. मित्रांनो, दही आणि योघर्ट हे दोन अनेकदा समानार्थी शब्द मानले जातात.पण हे शब्द वेगळे आहेत.पण या दोन्ही मधे नेमका फरक काय आणि वजन कमी करण्यासाठी दही आणि योघर्ट यातील कशाचा उपयोग होतो,हे पाह्यला हवे.दही आणि योघर्ट या दोहोंचे स्वरूप सारखेच आहे . प्रत्यक्षात , ही दोन्ही दुधाची भिन्न उत्पादने आहेत , जी वेगळ्या पद्धतीने तयार केले जातात आणि विविध आरोग्य लाभ देतात.दोन्ही उत्पादने अत्यंत पौष्टिक आहेत आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानली जातात.यातील जास्त फायदेशीर आहे हे आजच्या ब्लॉग मधे बघू या. सविस्तर: दही वि योघर्ट : काय फरक आहे ? लिंबाचा रस , व्हिनेगर किंवा दही यासारख्या आम्लयुक्त पदार्थाचा वापर करून दूध आंबवून दही बनवले जाते.तर दुसरीकडे , योघर्ट एक दुग्धजन्य पदार्थ आहे,जो बॅक्टेरियाचा वापर करून दूध आंबवून तयार केला जातो.दुधाला आंबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिवाणू...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .