Blog No.2023/290 Date: -19 th , November 2023. मित्रांनो, आज आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ICC World Cup 2023 चा अंतिम सामना/मॅच खेळली जाणार आहे.5 ऑक्टोबर, 2023 पासून सुरू झालेला हा भव्य दिव्य सोहळा/ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यापर्यन्त पोहोचली आहे . स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया India vs Australia असा,अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. साखळी सामन्यातील 9 पैकी 9 सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.तर दुसऱ्या बाजूला साखळी सामन्यातील 9 पैकी 7 सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाने रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेटसने पराभव करीत अंतिम फेरी गाठली आहे. प्रास्ताविक ऑस्ट्रेलिया आजपर्यन्त 5 वेळा आयसीसी वर्ल्ड कपचा विजेता राहिलेला आहे आणि त्यांनी या वेळेला आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आह...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .