ब्लॉग नं. 2025/35 3 . दिनांक: 1 7 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनशैलीतून उद्भवणारे अनेक त्रास आपण वारंवार अनुभवतो,त्यापैकी पित्ताचा त्रास हा सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक प्रकार आहे. छातीत जळजळ , तोंड कडू होणे , अंग गरम जाणवणे , आंबट ढेकर… हे सर्व त्रास पित्त वाढल्याची लक्षणे आहेत.पण पित्त का वाढते ? आणि ते कमी करण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करता येतात ? चला , अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: पित्त वाढण्याची मुख्य कारणे : 1. चुकीचा आहार: आपण नेहमी खात असलेल्या पदार्थांचा पित्ताशी थेट संबंध असतो.तेलकट , तिखट , मसालेदार पदार्थ रेड मीट , जंक फूड हे अन्न पदार्थ पित्त वाढवण्यामागील मुख्य कारणे आहेत. अशा पदार्थांमुळे छातीत जळजळ होणे अगदी स्वाभाविक आहे. 2. अपेय पानाचे सेवन: आयुर्वेदानुसार अपेय पान म्हणजे शरीरासाठी हितकारक नसलेले पदार्थ.जसे चहा , कॉफी , दारू , सिगारेट यांचे जास्त प्रमाणात सेवन पित्त दोष वाढवते. 3. तीव्र ऊन आणि उष्ण वातावरण: ऊन्हात जास्त वेळ काम करणे , शरीराला सूर्याची तिव्रता पेलवणं कठीण होणे,...
Blog No.2023/26 9 Date:- 22nd ,October 2023. मित्रांनो , सध्या नवरात्र सुरू आहे.बरेच लोक या दिवसात नऊ दिवस उपवासाचे व्रत ठेवतात. उपवास ही एक प्रथा आहे , ज्यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी स्वेच्छेने अन्न किंवा पेय वर्ज्य केले जाते.शतकानुशतके विविध संस्कृती आणि धर्मांमध्ये उपवास ठेवण्याची प्रथा आहे. उपवास म्हणजे आपण लोक करतो तसला उपवास नव्हे म्हणजे साबुदाण्याची खिचडी,बटाट्याची भाजी,रताळ्याचे गोड काप,लोणावळ्याची चिक्की, बटाट्याचे वेफर्स, दाण्याची आमटी किंवा फ्रूट सॅलड खायचं याला उपवास नव्हे फराळ म्हणतात,त्याला फराळ हे संयुक्तिक नांव आहे.पण उपवास करण्याचे काही फायदे आहेत. ते आज आपण बघू या. प्रास्ताविक उपवास म्हणजे लंघन किंवा काहीही न खाण्याचे काही फायदे आहेत. ते पुढीलप्रमाणे:- 1. वजन व्यवस्थापन: उपवासामुळे कॅलरी ची कमतरता निर्माण होऊन वजन कमी होण्यास मदत...