Skip to main content

ज्येष्ठ नागरिक आणि फ्रॅक्चरचा धोका

  ब्लॉग नं. 2026/0 64.   दिनांक: 5 मार्च , 2026 .   मित्रांनो , ज्येष्ठ नागरिक आणि फ्रॅक्चरचा धोका वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होत जातात. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हाडांची घनता कमी होणे (ऑस्टिओपोरोसिस) . त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये फ्रॅक्चर होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. यासाठी एक साधं सूत्र लक्षात ठेवायला हवं . या विषयावर आहे, आजचा ब्लॉग. सविस्तर:                साठी नंतर हाडांशी संबंधित रोग होणे हे स्वाभाविक लक्षण आहे.मग स्त्री असो वा पुरुष, हाडांची काळजी घेण्यात येत नाही. फक्त त्यांचा पुरेपूर वापर केला जातो. त्यातच स्नायू मजबूत रहात नाही आणि त्यांच्या मजबूतीसाठी आपल्याकडून काही केले जात नाही.त्यामुळे पडण्याचे प्रमाण वाढते.आणि पडण्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोकाही वाढतो.               📌 फ्रॅक्चरचा धोका: हाडांची घनता कमी असेल तर,अगदी छोट्या धक्क्यानेही फ्रॅक्चर होऊ शकते. त्यामुळे केवळ तपासण्या करून उपयोग नाह...

ज्येष्ठ नागरिक आणि फ्रॅक्चरचा धोका

 ब्लॉग नं. 2026/064.  

दिनांक: 5 मार्च, 2026. 

मित्रांनो,

ज्येष्ठ नागरिक आणि फ्रॅक्चरचा धोका

वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होत जातात. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हाडांची घनता कमी होणे (ऑस्टिओपोरोसिस). त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये फ्रॅक्चर होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. यासाठी एक साधं सूत्र लक्षात ठेवायला हवं.या विषयावर आहे, आजचा ब्लॉग.

सविस्तर:   

            साठी नंतर हाडांशी संबंधित रोग होणे हे स्वाभाविक लक्षण आहे.मग स्त्री असो वा पुरुष, हाडांची काळजी घेण्यात येत नाही. फक्त त्यांचा पुरेपूर वापर केला जातो. त्यातच स्नायू मजबूत रहात नाही आणि त्यांच्या मजबूतीसाठी आपल्याकडून काही केले जात नाही.त्यामुळे पडण्याचे प्रमाण वाढते.आणि पडण्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोकाही वाढतो.              

📌 फ्रॅक्चरचा धोका:

हाडांची घनता कमी असेल तर,अगदी छोट्या धक्क्यानेही फ्रॅक्चर होऊ शकते. त्यामुळे केवळ तपासण्या करून उपयोग नाही, तर अपघात टाळणे हेच सर्वात प्रभावी संरक्षण आहे.

⚠️ सावध रहा” – ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णमंत्र:

एकदा पडणे म्हणजे अनेकदा आयुष्याची गुणवत्ता कमी होणे. म्हणून पुढील काळजी अत्यावश्यक आहे.

🚫 उंचावर चढणे टाळा:

साधारणतः 50-55 नंतरच,स्टूल, खुर्ची किंवा टेबलावर उभे राहून वस्तू काढू नका. वस्तू काढायची असल्यास शिडी वापरा आणि कुणी तरी आधार द्यायला सोबत असेल हे बघा.  

🌧 पावसाळ्यात विशेष काळजी:

पावसाळ्यात रस्तेच नव्हे फुटपाथही निसरडे होते.अशा निसरड्या रस्त्यावरून घसरून पडण्याची शक्यता अधिक असते. म्हणून निसरड्या रस्त्यांवर/फुटपाथवरुण बाहेर जाणे शक्यतो टाळा.

🚿बाथरूममध्ये सुरक्षितता:

बाथरूममध्ये घसरून पडण्याचे प्रमाण अधिक आढळून येते.बाथरूम जर ओले असेल तर,एग्जॉस्ट फैन

सुरू करून बाथरूम कोरडे करून घ्या. बाथरूममध्ये घसरू नये याची काळजी घ्या.बाथरूममध्ये आधारासाठी ग्रॅब बार लावून घ्या आणि त्याचा वापर करा.  

👉आंघोळीनंतर कपडे बाथरूममध्ये उभे राहून घालू नका:

            बाथरूममध्ये शक्यतो उभे राहून कपडे बदलण्याचा प्रयत्न करू नका.खोलीत जाऊन बसून कपडे घाला.

🚽 कमोडचाच वापर करा:

भारतीय पद्धत जरी आरोग्यदृष्ट्या योग्य असली तरी,एक वय झाल्यानंतर कमोडचा उपयोग करणे योग्य. कमोडमधून उठताना भक्कम आधार घ्या.

🌙 रात्री उठताना घाई करू नका:

रात्री झोपेतून जाग आल्यावर, बाथरूमला जायचे असल्यास,आधी बिछान्यात 3-4 मिनिटे बसून राहा.

दिवा लावा आणि मगच उभे रहा.

🚪 टॉयलेटला आतून लॉक लावू नका:

टॉयलेटला शक्यतो आतून लॉक लावू नका, फक्त लॅच की लावा.इमर्जन्सी बेल असल्यास अधिक सुरक्षित.

👖 कपडे बसूनच घाला:

बाहेर जायच्यासाठी कपडे बदलवायचे असल्यास,कपडे बसूनच घाला.विशेषतः लांब पायांचे कपडे उभे राहून घालणे टाळा.

🤲 पडतांना हाताचा आधार घ्या:

शक्यतो पडणार नाही,याचा प्रयत्न करा.पण पडल्यास,पडतांना हाताचा आधार घ्या,कारण कंबर किंवा मांडीच्या हाडाच्या फ्रॅक्चरपेक्षा हाताचे फ्रॅक्चर उपचारास सोपे असते.

🚶‍♂️ रोज चालण्याचा व्यायाम:

नियमित चालणे हा चांगला व्यायाम आणि सोपं व्यायाम आहे.चालण्यामुळे स्नायू मजबूत करते.चालण्याने तोल सुधारतो आणि पडण्याचा धोका कमी होतो.  

🥛 हाडांसाठी योग्य आहार:

हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम गरजेचे आहे,जे दुग्धजन्य पदार्थ, सोया पदार्थ आणि केळी खाणे आवश्यक.शक्यतो पूरक औषधांपेक्षा नैसर्गिक आहारावर भर द्या.

☀️ सूर्यप्रकाशाचे महत्त्व:

सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन D तयार होते,रोज कमीतकमी 15 ते 20 मिनिटे उन्हात बसा. व्हिटॅमिन D हे कॅल्शियम शोषण्यासाठी अत्यावश्यक आहे.

🧬 ऑस्टिओपोरोसिस कसा थांबवायचा?

हाडांमध्ये कॅल्शियम शोषण वाढवणे आणि ऑस्टिओब्लास्ट अ‍ॅक्टिव्हिटी सक्रिय ठेवणे आवश्यक आहे.

🌸 समारोप:

ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठे औषध म्हणजे : जागरूकता. सुरक्षितता, संतुलित आहार,नियमित हालचाल. सावध रहा, सुरक्षित रहा आणि निरोगी जगा”. हेच फ्रॅक्चरपासून संरक्षणाचे खरे सूत्र आहे.पडणे टाळा कारण असे म्हटले जाते की एकदा पडणे म्हणे आयुष्याची दहा वर्षे कमी, कारण पडल्यामुळे, हाडे दुखावतात, स्नायू कमकुवत होतात, आत्मविश्वास कमी होतो आणि हालचाल कमी होते.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Comments

  1. हाडांची काळजी हा मूलभूत मंत्र आपल्या ब्लॉग मधून मिळाला
    पडू नये, काळजी घ्यावी, हे अगदी बरोबर आहे पण अपघात सांगून होत नसतात. कधी कधी अनवधानाने माणूस पडतो.
    पडताना हातावर भार घ्यावा हा सल्ला खूप उपयुक्त
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...