ब्लॉग नं. 2026/071.
दिनांक: 12 मार्च, 2026.
मित्रांनो,
वय
वाढतंय… पण शक्ती का कमी होतेय?
आपण
नियमित चालता, व्यायाम
करता, “हेल्दी” खाता, सप्लिमेंट्सही
घेता… तरीही शरीरात सतत अशक्तपणा जाणवतो? खुर्चीतून उठताना
हातांचा आधार घ्यावा लागतो? जिने चढताना दम लागतो? तर कदाचित हे फक्त “वय” नाही. ही असू शकते सार्कोपेनिया — वयानुसार होणारी स्नायूंची झपाट्याने घट.ज्या बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार
आहोत,आजच्या ब्लॉगमध्ये.
सविस्तर
🧬 सार्कोपेनिया म्हणजे नेमकं काय?
सार्कोपेनिया
म्हणजे, वयानुसार स्नायूंचा आकार आणि ताकद कमी होणे. साठीनंतर ही प्रक्रिया अधिक
वेगाने होते.स्नायूंचे सूक्ष्म तंतू तुटतात आणि योग्य पोषण नसेल तर ते पुन्हा
मजबूत होत नाहीत.याचा परिणाम म्हणजे, खुर्चीतून उठताना त्रास, सामान उचलताना
कमजोरी, संतुलन बिघडणे आणि पडण्याचा धोका वाढणे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे — ही
प्रक्रिया थांबवता येते, आणि काही प्रमाणात उलटवता (Reverse) देखील येते.
🚫 सकाळी
टाळावेत असे 5 पदार्थ:
1️⃣ पांढरी ब्रेड:
पांढरी
ब्रेड (White Bread) शरीरात गेल्यावर लगेच साखरेत रूपांतरित होते. रक्तातील साखर वाढते आणि
इन्सुलिनचे प्रमाण झपाट्याने वाढते.उच्च इन्सुलिन स्नायूंना प्रथिनांचा उपयोग करू
देत नाही.यामुळे दीर्घकाळात स्नायूंची झपाट्याने घट होते आणि ऊर्जा कमी होते.
2️⃣ रिकाम्या पोटी कॉफी:
रिकाम्या
पोटी कॉफी घेतल्यास कोर्टिसोल (ताण हॉर्मोन) वाढतो. उच्च कोर्टिसोल,स्नायूंचे
विघटन वाढवतो आणि नवीन स्नायू तयार होण्याची प्रक्रिया मंदावतो.
3️⃣ प्रोसेस्ड मांस (बेकन, सॉसेज):
यामध्ये
नायट्रेट्स आणि नायट्राइट्स असतात. हे शरीरात जाऊन दाह (inflammation) निर्माण करतात. दीर्घकाळ
दाह म्हणजे स्नायूंच्या पेशींवर हल्ला.
4️⃣ ओट्स + स्किम्ड दूध:
स्किम्ड
दुधात फॅट नसल्याने A, D, E, K ही
जीवनसत्त्वे योग्यरीत्या शोषली जात नाहीत.फॅट हे त्यांचे “वाहन” आहे.
5️⃣ रिफाइंड सिरीयल्स:
यात
आवश्यक अमिनो अॅसिड्स नसतात.स्नायूंना आवश्यक घटक न मिळाल्यास शरीर स्वतःचे स्नायू
तोडून ते वापरते.
✅ स्नायू
मजबूत करणारे 5 शक्तिशाली नाश्त्याचे पदार्थ:
1️⃣ प्लेन ग्रीक दही:
यामध्ये 20 ग्रॅम उच्च दर्जाचे प्रथिन असते,ल्यूसिन (Leucine) भरपूर प्रमाणात असते,ज्यामुळे, स्नायू वाढीची प्रक्रिया सुरू करते.
प्लेन ग्रीक दही कसे खावे?
एक प्लेट,प्लेन फुल-फॅट ग्रीक दही, त्यावर
बदाम/अक्रोड आणि त्यात थोडी ताजी फळे घालून खावे.
🍳 2️⃣ अंडी:
अंड्यात
सर्व 9 आवश्यक
अमिनो अॅसिड्स तसेच व्हिटॅमिन D सुद्धा असते. यातील 94%
प्रथिन शरीर वापरते. महत्त्वाचे म्हणजे खातांना पूर्ण अंडे खा. फक्त
पांढरा भाग नाही.
🥑 3️⃣ अवोकॅडो:
यांत चांगले
फॅट्स असतात आणि पोटॅशियम असते. जे हॉर्मोन्स संतुलित ठेवते. अंडी किंवा दह्यासोबत
खाल्यास परिणाम अधिक चांगला मिळतो.
🍗 4️⃣ लीन मीट (चिकन/टर्की):
यांत 35 ग्रॅम प्रथिन (4 oz मध्ये), क्रिएटिन आणि बी जीवनसत्त्वे असतात. उरलेले डिनर चिकन सकाळी वापरू
शकता.
🌰 5️⃣ सुकामेवा आणि बिया:
यांत ओमेगा-3, मॅग्नेशियम आणि झिंक असते. जे दाह (Inflammation) कमी करण्यास मदत करतात
रात्री भिजवून सकाळी
खाल्ले तर अधिक फायदेशीर आहे.
🕰️ महत्त्वाचे:
रात्री
झोपेत स्नायूंची दुरुस्ती होते.पण सकाळचा नाश्ता योग्य नसेल तर ही प्रक्रिया
अपूर्ण राहते. सकाळचा पहिला घास म्हणजे स्नायूंमधील गुंतवणूक
🎯 समारोप:
वय
वाढणे थांबवता येत नाही.पण अशक्तपणा थांबवता येतो. म्हणून,आजपासून पांढरी ब्रेड
बंद, रिकाम्या पोटी कॉफी नाही, प्रोसेस्ड मांस टाळा आणि सिरीयल्सऐवजी प्रथिनयुक्त
नाश्ता घेत चला.तसेच यांत सातत्य ठेवा. 4-6 आठवड्यांत फरक जाणवेल.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा
भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
अस्वीकरण:
हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित
आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या
डॉक्टरांशी संपर्क करावा.

Comments
Post a Comment