ब्लॉग नं. 2026/060.
दिनांक: 1 मार्च, 2026.
मित्रांनो,
🩺 वय वाढलं की BP चा “परफेक्ट” आकडा बदलतो का? – ज्येष्ठांसाठी
जीवनरक्षक दृष्टिकोन
एक काळ
असा होता की 120/80 हा रक्तदाबाचा (Blood
Pressure) “सुवर्णमान” समजला जायचा – आणि अजूनही अनेक ठिकाणी तो
तसाच सांगितला जातो.पण 70-75 नंतरही तोच
नियम लागू होतो का? अलीकडील संशोधन आपल्याला एक वेगळीच गोष्ट
सांगतं,आणि ती प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने समजून घेण्यासारखी आहे.जी आपण आजच्या ब्लॉगमध्ये सविस्तर
जाणून घेणार आहोत.
सविस्तर:
🔬 संशोधन काय सांगतं?
75
वर्षांवरील 15,000 हून अधिक व्यक्तींवर पाच वर्षे केलेल्या
अभ्यासात एक महत्त्वाची बाब समोर आली: ज्यांचा सिस्टोलिक BP
130–140 दरम्यान होता त्यांचा,मृत्यूदर कमी,त्यांच्यात पडण्याचे
प्रकार कमी आढळलेत, आणि हॉस्पिटलायझेशन कमी वेळा करावे लागले तसेच मेंदूचे कार्य (cognition)
सुधारले.
आश्चर्य
म्हणजे, 120 च्या
खाली BP असणाऱ्यांमध्ये पडण्याचा धोका 28% जास्त होता.याचा अर्थ
असा की, BP जास्त आहे किंवा कमी आहे हे वयोमानानुसार ठरतं..
🧠 वयानुसार शरीरात होणारे तीन
महत्त्वाचे बदल:
1️⃣ धमन्यांचा कडकपणा (Arterial
stiffness):
तरुणपणी
धमन्या लवचिक असतात. वयानुसार त्या कडक होतात.ज्यामुळे,मेंदू व किडनीपर्यंत रक्त
पोहोचण्यासाठी थोडा जास्त दाब आवश्यक असतो.
2️⃣ Baroreceptor प्रतिसाद मंदावतो:
उभं
राहिल्यावर BP अचानक
खाली जाण्यापासून शरीर वाचवतं.वय वाढलं की हा प्रतिसाद धीमा होतो.ज्यामुळे चक्कर
येते आणि पडण्याचा धोका वाढतो.
3️⃣ औषधांचे मेटाबॉलिझम बदलते:
तोच डोस ज्येष्ठांमध्ये
जास्त प्रभाव दाखवू शकतो.आणि BP खूप खाली जाऊ शकतो
⚠️ खरा धोका कुठे आहे?
डॉक्टरकडे
बसून चेक केल्यास BP “परफेक्ट”
दिसतो…पण उभं राहिल्यावर तो अचानक खाली येतो
याला म्हणतात Orthostatic Hypotension. यामुळे चक्कर, बेशुद्धी, फ्रॅक्चर आणि स्वावलंबन गमावणे.
🏠 घरी करता येणारी ३ मिनिटांची
महत्त्वाची चाचणी
1️⃣ 5 मिनिटे झोपा आणि BP मोजा.
2️⃣ लगेच उभे
राहा आणि पुन्हा BP मोजा
जर:
- सिस्टोलिक
20 पेक्षा
जास्त कमी (वरचे बीपी)
- डायस्टोलिक
10 पेक्षा
जास्त कमी (खालचे बीपी) तर डॉक्टरांशी चर्चा करणे अत्यावश्यक आहे.
📊 वयानुसार योग्य BP रेंज (साधारण मार्गदर्शक)
|
वयोगट |
सिस्टोलिक
BP |
|
65–74 |
130–140 |
|
75–84 |
135–145 |
|
85+ / अशक्त |
140–150 |
डायस्टोलिक साधारण 70–85 दरम्यान असणे चांगले
👥 “आकडा” नाही – “माणूस” महत्वाचा आहे.
एकाच
वयाचे दोन 81 वर्षांचे
व्यक्ती, एकाला किडनी, हृदयाचे आजार आणि दुसरा पूर्ण सक्रिय,जरी
दोघांचा BP सारखा असला तरी उपचार वेगळे असतील.यालाच म्हणतात
— Treat the patient, not the number.
✅ समारोप:
आजपासून करायच्या 5 गोष्टी
घरचा BP मॉनिटर वापरा, दोन आठवडे रेकॉर्ड
ठेवा, Orthostatic टेस्ट करा, चक्कर / थकवा प्रामाणिकपणे
सांगा आणि डॉक्टरांशी “target BP” बद्दल चर्चा करा. विशेषतः वय
75 नंतर, खूप कमी BP धोकादायक ठरू शकतं,
मध्यम BP जास्त सुरक्षित असू शकतं आणि पडणे टाळणे हे हार्ट
अटॅक टाळण्याइतकेच महत्त्वाचे आहे. ज्ञान हेच खरे औषध आहे. तुमचं
BP किती आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहेच,पण त्याहून
महत्त्वाचा प्रश्न आहे: ते तुमच्यासाठी योग्य आहे का? आणि हे आपल्या डॉक्टरांकडून जाणून घ्या.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा
भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी
व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय
सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

उपयुक्त माहिती
ReplyDelete