ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
ब्लॉग नं. 2025/031 दिनांक: 31 जानेवारी , 2026. मित्रांनो , शस्त्रक्रियेद्वारे मधुमेह बरा होऊ शकतो का ? आजवर मधुमेह ( Diabetes) म्हणजे आयुष्यभर साथ देणारा आजार , अशीच आपली ठाम समजूत होती.गोळ्या , इन्सुलिन , आहार नियंत्रण , व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल याच गोष्टींवर मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचा भर दिला जात होता. “मधुमेह बरा होत नाही , फक्त नियंत्रणात ठेवता येतो” हे वाक्य आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र अलीकडेच AIIMS ( दिल्ली) येथील शस्त्रक्रिया विभागातील डॉ. मंजुनाथ यांनी केलेल्या एका विधानामुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि रुग्णांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. आपण आजच्या ब्लॉगमध्ये या विषयी विस्ताराने जाणून घेऊ. सविस्तर: डॉ. मंजुनाथ मते , “ मेटाबॉलिक सर्जरी ( Metabolic Surgery)” या विशेष शस्त्रक्रियेमुळे अनेक टाइप- 2 मधुमेह रुग्णांचे रक्तातील साखर प्रमाण नैसर्गिकरीत्या नियंत्रणात येते आणि काही रुग्णांना तर औषधांची गरज जवळजवळ संपते. पण प्रश्न असा उभा राहतो की , ही शस्त्रक्रिया प्रत्येक मधुमेही रुग्णासाठी आहे का ? ती सुरक्षित आहे का ? आण...