Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

लक्ष्मी पूजन एक मंगल सोहळा

 ब्लॉग नं.2025/296.

दिनांकः 21 ऑक्टोबर, 2025. 

मित्रांनो,

लक्ष्मीपूजन : महाराष्ट्रात दिवाळीतील सर्वात मंगल सोहळा

भारतभर साजरी होणारी दिवाळी ही प्रकाश,आनंद आणि संपन्नतेचा उत्सव मानली जाते.पण महाराष्ट्रात या दिवाळीचे वेगळेच रंग दिसतात. चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवातील सर्वात पवित्र दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. हा दिवस म्हणजे केवळ देवपूजा नसून घराघरात श्रद्धा, स्वच्छता, सौंदर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक असतो.आजचा ब्लॉग हा या विषयावर आहे.

🌼 दिवाळीचा तिसरा दिवस — लक्ष्मीपूजन:

धनत्रयोदशी आणि नरकचतुर्दशी नंतर येणारा दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्येला हा दिवस येतो.हा दिवस अंधारावर प्रकाशाचा, दुर्गुणांवर सद्गुणांचा आणि दरिद्र्यावर समृद्धीचा विजय दर्शवतो.

महाराष्ट्रात या दिवशी लोक सकाळीच घर झाडून स्वच्छ करतात.घरातील प्रत्येक कोपरा,देवघर, ओटा, अंगण, दार, खिडक्या आणि छतापर्यंत प्रत्येक जागा प्रकाशित ठेवली जाते.कुठे अंधार असू नये हे बघितलं जातं.   कारण असा समज आहे की, जिथे स्वच्छता आणि सौंदर्य असते तिथे लक्ष्मीचा वास असतो.

🪔 पूजेची तयारी:

संध्याकाळी सूर्यास्तानंतर सर्वत्र तेलाचे दिवे,पणत्या लावल्या जातात.घर,परिसर दिव्यांनी सजवले जाते.दिव्यांनी सजलेले घर म्हणजे जणू छोटेखानी स्वर्गच ! दरवाज्यावर तोरण,रांगोळी आणि सुंदर फुलांच्या माळा लावल्या जातात. घरातील स्त्रिया सुंदर रांगोळ्या काढतात—कधी पद्म, कधी शंख-चक्र, तर कधी श्रीचिन्ह असलेली रांगोळी काढतात.घरातील लहान मोठे सर्वच नवीन कपडे परिधान करतात.    

त्यानंतर लक्ष्मीची स्थापना केली जाते.लक्ष्मीमातेच्या मूर्ती किंवा चित्रासमोर,चांदीची किंवा सोन्याची नाणी,आजकाल नवीन नोटांची पाकिटे,घरातील असलेले दागिने चौरंगावर किंवा टेबलवर मांडले जाते. काहीजण बँक पासबुक, चेकबुक, व्यवसायाच्या कागदपत्रांचीदेखील पूजा करतात.कारण लक्ष्मीपूजन विष्णुपती लक्ष्मीचे पूजन आहेच पण त्या सोबत आपण ज्या गोष्टींना लक्ष्मी मानतो.अशा सर्व वस्तूंचे पूजन असते.

🕯️ पूजा विधी आणि मंत्रोच्चार:

पूजेमध्ये सर्वप्रथम गणपतीचे आवाहन केले जाते.नंतर लक्ष्मीमातेला आवाहन करून,तिला जल, पुष्प, अक्षता, कुमकुम आणि नैवेद्य अर्पण केले जातात विशेष मंत्रांनी लक्ष्मीची आराधना केली जाते.
या वेळी "श्री सूक्त" किंवा "लक्ष्मी अष्टक" पठण करण्याची प्रथा आहे. या स्तोत्रांमध्ये लक्ष्मीच्या कृपेने घरात धन, धान्य, आरोग्य आणि आनंद नांदावा अशी प्रार्थना केली जाते. पारंपरिक पूजेप्रमाणे यथावत सर्व पूजा,त्यानंतर आरती, प्रसाद वाटप हे सर्व विधी केले जातात.    

💰 व्यावसायिक जगतातील लक्ष्मीपूजन:

महाराष्ट्रातील व्यापारी आणि उद्योगपतींसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.त्यांच्यासाठी ही नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते.बहुतांश दुकाने,बँक,कार्यालये, कारखाने या दिवशी खातेपूजन करतात. नवीन बही सुरू करून, व्यवसायात भरभराट होण्याची प्रार्थना केली जाते. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना गोडधोड पदार्थ व भेटवस्तू देण्याची परंपरादेखील आहे.काही कार्यालयात कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त बोनसचे वाटप केले जाते. यामागे दिवाळी साजरी करण्यासाठी अतिरिक्त असे गिफ्ट समजण्यात येते.पूजेनंतर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात येतो.        

🍮 गोडधोड आणि स्नेह:

पूजेच्या शेवटी सर्व कुटुंब एकत्र बसून फराळाचा आनंद घेतात. चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, चिवडा अनरसा या पदार्थांचा सुवास संपूर्ण घरभर दरवळत असतो. प्रत्येकजण एकमेकांना “शुभ दीपावली” म्हणतो आणि आनंद वाटतो.

🌙 आध्यात्मिक अर्थ:

लक्ष्मीपूजनाचा मूळ हेतू केवळ धन मिळविण्यासाठी देवीची आराधना नाही.तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैशाची देवी नसून,ती संपन्नतेचे आणि संतुलनाचे प्रतीक आहे.ही संपन्नता नेहमी करता नांदो हे लक्ष्मीकडे मागणे मागण्यात येते.ज्या घरात प्रामाणिकपणा,स्वच्छता,आणि सौहार्द असते,तिथेच खरी लक्ष्मी वास करते. म्णूनच दिवाळी आपल्याला शिकवते, मनातील अंधार दूर करून, अंतःकरणात प्रकाश पसरवणे हीच खरी समृद्धी आहे.तसेच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी वास करते,या मागे स्वच्छतेचा संदेश जनामनात पसरविणे हा मूल उद्देश आहे.     

समारोप:

महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन हा केवळ धार्मिक विधी नाही,तर कुटुंब,समाज आणि संस्कृती यांना एकत्र बांधणारा उत्सव आहे. तो आपल्याला सांगतो की, समृद्धी ही बाहेरून नव्हे, तर अंतर्मनातून येते. म्हणून दिव्यांचा प्रकाश लावतानाच आपण आपल्या मनातील अंधारही दूर करू या, आणि लक्ष्मीमातेच्या कृपेने आयुष्य उजळवू या. " लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!" 🪔🌸

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

Comments

  1. अतिशय सुंदर माहिती

    ReplyDelete
  2. मस्त लिहिले आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...