Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

अनोखा दिवाळी अंक : अनुवादविश्व दिवाळी अंक 2025

ब्लॉग नं. 2025/309.

दिनांक: नोव्हेंबर 2025.

मित्रांनो,

            दर वर्षी प्रमाणे दिवाळी आली की,दिवाळी अंक बाजारात येऊ लागतात.या वर्षी देखिल,अनेक नामवंत प्रकाशकांनी आपापले दिवाळी अंक प्रकाशित केले.त्या सोबतच काही लहान लहान प्रकाशन संस्थांनी देखिल आपले दिवाळी अंक बाजारात आणले.काहींनी ई-दिवाळी अंक प्रकाशित केले.या वर्षीच एक वैशिष्ठ म्हणजे, अनुवादकांचा व्हॉटसअॅप समूह असलेल्या, “अनुवादक मंच” ने आपला पहिला ऑनलाइन दिवाळी अंक,“अनुवादविश्व दिवाळी अंक 2025” हा  प्रकाशित केला.”अनुवादक मंच” हा 150 अनुवादकांचा एक समूह आहे.हा अंक विविध भाषातील साहित्याचा अनुवाद करणाऱ्या अनुवादकांचा असल्याने, विविध देशातील,प्रदेशातील साहित्याचा स्पर्श या अंकाला लाभला असल्याने,हा एक वैशिष्ठपूर्ण असा दिवाळी अंक झाला आहे.आजचा ब्लॉग या दिवाळी अंकास समर्पित आहे.

सविस्तर:

            अनुवादक म्हणजे केवळ एका भाषेतील साहित्य,दुसऱ्या भाषेत अनुवाद करणारा एवढंच अर्थ नसून,एका भाषेतील भावनांचे रुपांतरण,लेखकाची शैली उलगडून दाखविणे,संस्कृतीचा परिचय वगैरे त्या लेखकाच्या लेखनाला धक्का न लावता घडलेला मनांमधील संवाद आहे. भाषेच्या सीमांना ओलांडून झालेला संस्कृतीच्या संगमाचा उत्सव आहे.

            अंकाचे मुखपृष्ठ वैशिष्ठपूर्ण आणि आकर्षक आहे,विविध भाषांमधील शब्द किंवा लिपी दर्शविण्यात आली आहे.हे मुखपृष्ठ अशोक बोकील यांनी तयार केले आहे. अंकाच्या सुरुवातीस संपादक रवींद्र गुर्जर यांचे संपादकीय आहे. त्यांनी आपल्या संपादकीयातून अंक निर्मिती मागची कथा विदित केली आहे.

अंकाचे विभाग:

            अंक एकूण चार विभागात विभागला आहे. पहिला विभाग आहे, लेख विभाग, दूसरा विभाग हा कथा विभाग आहे. तिसरा विभाग हा काव्य विभाग आहे तर,चवथा विभाग हा पुस्तक परिचय विभाग आहे.

            पहिल्या लेख विभागात एकूण पाच लेख आहे.अनुवादकांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं याचा सुरेख आढावा घेतला आहे. यात भाषांतर करतांना मूल कलाकृतीला,न्याय देता यायला हवा हे महत्वाचे आहे असं सुचविण्यात आलं आहे. विशेषतः ललित वाङमयाचे भाषांतर करतांना,अनुवादकांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं असं प्रतिपादन केलं आहे.वैचारिक आणि शास्त्रीय वाङमयाचे भाषांतर,त्या मानाने सोपं  असल्याचं म्हटलं आहे.अनुवाद या कलेची महाराष्ट्राला उशिरा जाणीव झाल्याचं म्हटलं आहे.यातील एका लेखात म्हटलं आहे की, माणसा-माणसांसातील दुरावा कमी करण्यात अनुवादाचा मोठा वाटा असतो. एका लेखात असाही उल्लेख आहे की,कै. पु. भा. भावे म्हणाले होते की, आम्हीही जेम्स हिल्टनसारखं लिहितो,पण आमची मराठी पुस्तकं महाराष्ट्राबाहेर जाऊ शकत नाही.म्हणून आमचं साहित्य कमी प्रतीचं असतं असं नाही. हे अगदी पटतं.या शिवाय देखिल या विभागात बरेच लिहिण्यासारखं आहे,पण विस्तारभयास्तव लिहिता येत नाही. अनुवादक होणं तेवढं सोपं नाही,हे हा विभाग वाचल्यावर समजतं.

          दुसऱ्या कथा विभागात,विविध भाषातील कथांचा,अनुवादकांनी मराठी अनुवाद केलेला आहे.जपानी, हिन्दी,इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, बंगाली इत्यादि भाषेतील विविध शैलीच्या कथा,सगळेच प्रख्यात अनुवादक असल्याने, खूप छान उतरल्या आहेत आणि वाचनीय झाल्या आहेत. यातील ‘माझं हिरोशिमा’, ‘मी देखिल दिवा लावणार आई’, ‘प्रतिशोध’,‘ट्रेनवर दरोडा ! नको रे बाबा !!’, ‘भारतीय लोक कथा :वाघ,ब्राह्मण आणि कोल्हा’,‘अभिनेत्री’, भेटू तीन महिन्यांनी,रहस्य पुनर्जन्माचे” या काही लिहिल्या. खरं तर मला सगळ्या कथांची नांव लिहावीशी वाटत आहे.कारण,प्रत्येक कथा इतरांपेक्षा वेगळी आहे.ती जिथून आली आहे,त्या ठिकाणचा तिला स्पर्श झाला आहे.                

        आता तिसरा विभाग म्हणजे काव्य विभाग. काव्य विभाग काहीसा वेगळा आहे. माहित नाही कां? मी एक कथाकार आहे,कवि नाही. पण मला काव्य विभाग,त्यात असलेल्या वैविध्यामुळे आवडला. याला कारण काव्य संग्रहाचा अनुवाद मी अपवादानेच बघितला अहे. त्यातला एक म्हणजे,कविवर्य मंगेश पाडगावकर सरांचा “मीरा”, हा संत मीराबाईंच्या भक्तिगीतांचा अनुवाद.या विभागात,कवी ग्रेस यांच्या अनुवादित कविता,संस्कृत कृष्णश्लोकांचे मराठीत छंदान्तर किंवा स्वैर अनुसर्जन,जे इंग्लिशमध्ये देखिल केलेलं आहे,रविंद्रनाथ टागोर यांच्या कविता मराठीत अनुवादित केल्या आहेत, एका मराठी कवितेचा हिन्दी अनुवाद देखिल आहे. साहिर लुधियानवी यांच्या उर्दू गझलचा मराठीत अनुवाद, बार्बरा या इंग्रजी कवितेचा मराठी अनुवाद, ‘ये कहानी फिर सही’ या प्रसिद्ध उर्दू गझलचा मराठी स्वैर अनुवाद, शास्त्रीय बंदिशीचा मराठी अनुवाद केलेला आहे. यातील एक वैशिष्ठपूर्ण गोष्ट  म्हणजे प्रसिद्ध तमिळ गाणं ‘कण्णे कलैमाने’ हे मराठीत अनुवादित केलं आहे.संस्कृतमधील दोन रचनांना मराठीत अनुवादित केलं आहे.           

            चवथा आणि शेवटचा विभाग आहे, पुस्तक परिचय हा.मी पुस्तकप्रेमी या व्हॉटसअप समूहाचा सदस्य असल्याचे, मी अन्य ब्लॉगमधून लिहिलं आहे, त्या समूहावर आजवर 1970 पुस्तकांचा परिचय झालेला आहेबहुतांश परिचय मी वाचलेले असल्याने,खरं तर मला पुस्तक परिचयाचे नाविन्य वाटायला नको,पण पुस्तक परिचय वाचायला घेतले,अन या पुस्तक परिचयातील वेगळेपणा मला जाणवला. यातील अधिकांश पुस्तके ही परदेशी किंवा अनुवादित असल्याने आणि त्याचा परिचय,अनुवाद क्षेत्रातील तज्ञ आणि जाणकार मंडळींनी करून दिल्यामुळे,मूळ लेखकाची शैली,मांडणी,धाटणी या सर्व बाबींचा परामर्श घेत,त्यांनी त्या पुस्तकांचा परिचय करून दिला आहे.यांत प्रामुख्याने ‘मोसाद’, ‘नॉट विदाऊट माय डॉटर', ‘टू सर विथ लव’, अनब्रोकन, हंग्री टाईड’, ‘निद्रिस्त नदी’, ‘रिल्केची दहा पत्रे’, ‘नदीष्ट’, ‘नंदीघोष-यात्रा’ श्रीकृष्णकथा-वेध नवा’, ‘गोंदवलेकर महाराजांची प्रवचने’ यांचा उल्लेख करावासा वाटतो.                        

समारोप:

            असा हा अनोखा दिवाळी अंक हा दृष्टीने अनोखा आहे, कारण हा केवळ मराठी भाषेतील साहित्य घेऊन आपल्या समोर आलेला नाही,एखाद्या शहरात जसे वेगवेगळ्या देशातील,संस्कृतीतील नागरिक येऊन रहात असतात,त्याला Cosmopolitan म्हणतात तसा,हा दिवाळी अंक Cosmopolitan look असणारा झाला  आहे.त्यामुळे त्या देशातील सभ्यता,संस्कृती हे साहित्याच्या रूपाने जाणून घेण्याची संधी मला मिळाली आणि वाचकांना ती मिळेल असं मला वाटतं. आता,शेवटी हा इतका वाचनीय अंक माझ्यापर्यंत कसा आला.सुप्रसिद्ध अनुवादिका डॉ. शुचिता नांदापुरकर फडके, आतापर्यंत तिने केलेल्या 100 पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.जी माझ्या नात्यात आहे (जिचा मला अतिशय अभिमान आहे), माझ्या सौची वहिनी आहे,तिने पाठविला आणि एक मागणी केली,यावर एखादा ब्लॉग लिहिता येईल कां? ब्लॉगसाठी विषयाच्या असलेल्या मी लगेच स्वीकारली.या ई-मासिकाच्या प्रकाशकांना एक छोटीशी सूचना करावीशी वाटते,ती  म्हणजे अनुक्रमणिका जर hyper link केली असती,तर वाचकाला आपल्या आवडीने पाहिजे ती कथा, कविता,परिचय वाचता आला असता.सोबत अंकाची लिंक शेअर करत आहे,त्यावर क्लिक करून तुम्ही अंक वाचू शकता.                                        

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

✍️ प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)





वरील लिंकवर Ctrl प्रेस करून क्लिक करा. लिंक उघडेल.    
"अनुवादविश्व दिवाळी २०२५" हा अंक आपल्या समस्त मित्र-परिवाराला भेट म्हणून पाठवा. अभिप्राय अपेक्षित आहे.


तुम्हाला हवं असल्यास मी या ब्लॉगसाठी आकर्षक शीर्षकं आणि उपशीर्षकंही सुचवू का?


Comments

  1. खूप छान आढावा घेतला ह्या दिवाळी अंकाचा.अनुवादित सकस साहित्याची मेजवानी.

    ReplyDelete
  2. मस्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...