ब्लॉग नं: 2025/170
दिनांक: 20 जून, 2025.
मित्रांनो,
पूर्वी, भारतीय पुरुषांच्या आयुष्यात लग्न हा
अंतिम टप्पा मानला जात असे.तो एक कर्तव्य,एक जबाबदारी,
प्रौढत्वाचा एक शिक्का असे. पण आता हा प्रवास म्हणा,प्रवाह बदलत चालला आहे. विशेषतः 20 ते 30 या वयोगटातील पुरुष, लग्नाऐवजी अविवाहित राहण्याचा पर्याय
निवडत आहेत. हे बंडखोरीसारखे नाही तर आत्मचिंतन आणि स्व-जागरूकतेचा भाग आहे. हे
प्रेमापासून पळणे नाही,तर अवास्तव अपेक्षांपासून आणि मानसिक ताणांपासून स्वत:चा
बचाव करण्याचा एक प्रयत्न आहे.आजचा ब्लॉग या विषयाला समर्पित आहे.
सविस्तर:
भारतीय पुरुषांवर अपेक्षांचे वाढलेले ओझे, गैरसमज होण्याची भीती,आर्थिक
ताण, तुटत चाललेली घरे, सासू सासऱ्यांच्या सोबत तणाव आणि भावनांना मोकळे करण्यासाठी
जागा नसणे या गोष्टी यामुळे पुरुष, लग्नाऐवजी अविवाहित राहणे पसंत करत आहेत. याविषयी आपण सविस्तर
जाणून घेऊ.
1. अपेक्षांचे वजन:
भारतीय
कुटुंबांमध्ये मुलगा जन्माला येताच,त्याच्यावर कर्तव्ये लादली जातात.शिक्षण,नोकरी,लग्न,
आणि मुलांचा सांभाळ.मात्र, आजकालचे पुरुष हे
पारंपरिक साचे तोडत आहेत.आता केवळ कुटुंब चालवणे पुरेसे नसते.त्यांना आदर्श पती,आर्थिक आधार,भावनिक साथीदार,आणि
सासर आणि माहेर या दोन्ही बाजूंनी मानसिक ताण सोसावे लागतात.यामुळे अनेक पुरुष
दबावाखाली येतात आणि म्हणून ते अविवाहित राहून, शांततेला अधिक पसंती देतात.
2. गैरसमज होण्याची भीती:
आजच्या
लिंग-समानतेच्या युगात, पुरुषांनी
भावनिकदृष्ट्या मोकळे राहावे,असुरक्षिततेवर चर्चा करावी अशी
अपेक्षा केली जाते. पण असे केल्यावर अनेक वेळा त्यांची थट्टा होते किंवा त्यांना
योग्य प्रकारे समजले जात नाही. यामुळे, भावनिक संघर्ष
टाळण्यासाठी, काही पुरुष,प्रेम आणि नातेसंबंध टाळतात.
3. आर्थिक ताणतणाव:
भारतीय
विवाहप्रथा अनेकांसाठी आर्थिक दृष्ट्या आव्हानात्मक असतात.लग्नातील खर्च, हुंड्याच्या अपेक्षा,उच्च जीवनशैली आणि,नोकरीतील अस्थिरता आणि बेरोजगारीचा भार वाढतो.मध्यमवर्गीय
पुरुषांना ही आर्थिक ओझे स्वीकारणे कठीण होत आहे, त्यामुळे
ते अविवाहित राहण्याचा पर्याय निवडतात.
4. बालपणीच्या जखमा आणि
तुटलेली घरे:
विभक्त घरांमध्ये
वाढलेल्या पुरुषांनी,त्यांच्या पालकांच्या नातेसंबंधातील त्रास पाहिलेला असतो.
त्यामुळे, ते
स्वतःच्या भविष्यात,असेच त्रासदायक नातेसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. बालपणातील
मानसिक जखमांमुळे,ते आयुष्यात शांती आणि स्थैर्य शोधतात.
5. सासू-सासऱ्यांसोबतचे
तणाव:
आजच्या
आधुनिक महिलांनी शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळवले असले तरी,पारंपरिक सासू-सासरे अजूनही जुन्या
अपेक्षा ठेवतात.यातून पुरुषांना दोन आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. अशा
परिस्थितीत, अनेक पुरुष विवाहाचे राजकारण आणि ताण
टाळण्यासाठी अविवाहित राहणे पसंत करतात.
6. भावनिक अभिव्यक्तीसाठी
जागांचा अभाव:
भारतीय
समाज अजूनही मुलांना 'मजबूत'
राहण्याचा सल्ला देतो.अश्रूंना कमजोरी मानले जाते.त्यामुळे
पुरुषांना त्यांच्या भावनांना मोकळे करण्यासाठी,आवश्यक असलेल्या सुरक्षित जागा
मिळत नाहीत. लग्नामुळे ही परिस्थिती सुधारावी अशी अपेक्षा असते, पण तिथेही त्यांना फक्त कामगिरी करण्याची अपेक्षा असते.
समारोप:
पुरुषांनी
अविवाहित राहण्याची निवड केली आहे, ही निवड बंडखोरी नाही, तर स्वाभिमानाने घेतलेला निर्णय आहे.
ही भारतीय पुरुषांच्या मानसिकतेतील आणि त्यांच्या नातेसंबंधातील बदल दर्शवते.प्रेम
आणि कुटुंब नाकारण्याचा हा निर्णय नाही,तर संतुलित,न्याय्य आणि सुरक्षित आयुष्याची निवड आहे.जोपर्यंत समाज विवाहाची संकल्पना
बदलत नाही आणि पुरुषांना भावनिक आधार देण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण करत नाही,
तोपर्यंत हे पुरुष स्वतःच्या शांतीसाठी आणि स्वाभिमानासाठी या
मार्गावर चालत राहतील.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु, पुणे.

बदलत्या सामाजिक व्यवस्थेने आणलेल्या ताणतणावामुळे
ReplyDeleteखुपच छान
ReplyDelete