Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

पहलगाममध्ये पर्यटकांवर अतिरेकी हल्ला

ब्लॉग सं. 2025/124

दिनांक: 25 एप्रिल, 2025.    

मित्रांनो,

            परवा म्हणजे 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला,ज्यात हा ब्लॉग लिहीपर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यु झाला.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हे शांत शहर एका विनाशकारी दहशतवादी हल्ल्याने हादरले,जो अलिकडच्या काळात या प्रदेशात नागरिकांवर झालेल्या सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक होता. नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.आजचा ब्लॉग याचा विषयावर.

सविस्तर:

हल्लेखोरांनी या भागात सुट्टी घालवणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य केले, ज्यामुळे शांततापूर्ण निवासस्थानाचे दुःखद स्थळ बनले.बळींमध्ये जयपूरचा रहिवासी 33 वर्षीय नीरज उधवानी होता, जो त्याच्या पत्नीसोबत सुट्टीवर होता. घटनेच्या वेळी त्याची पत्नी त्यांच्या हॉटेलमध्ये असल्याने ती हल्ल्यातून वाचली.द रेझिस्टन्स फोर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

सरकारचा प्रतिसाद:

या घटनेनंतर,भारतीय सुरक्षा दलांनी संपूर्ण प्रदेशात व्यापक शोधमोहीम सुरू केली,गुन्हेगारांना पकडण्यासाठी चौक्या स्थापन केल्या आणि वाहनांची तपासणी तीव्र केली.सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिसादाचे निरीक्षण करण्यासाठी आपला दौरा मधेच सोडून भारतात परतले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कृतींचे समन्वय साधण्यासाठी विमान तळावर उच्च अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी लगेच काश्मीरला भेट दिली आणि काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासह उच्चस्तरीय बैठक बोलावली.आणि सीसीएस या उच्च स्तरीय सुरक्षा समितीने 5 पाच महत्वाचे निर्णय घेतले आहे.

1          सिंधू पाणी कराराचे निलंबन: सिंधु जल करार 1962 नुसार भारत सिंधु नदीचं पाणी पाकिस्तानला उपलब्ध करून देत होता. ते आता थांबवले जाईल.पाकिस्तानातील 80% शेती ही सिंधु नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.त्यामुळे आता पाकिस्तानची जलकोंडी होईल.

2          अटारी-वाघा सीमा तपासणी नाका बंद करणे: या सीमेवरून जी छोटे मोठे व्यापार केले जात ते आता बंद होतील.

3          पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सूट योजना (SVES) रद्द करणे: भारतातील नागरिकांचे कुणी नातेवाईक पाकिस्तानात राहतात किंवा पाकिस्तानातील नागरिकांचे कुणी नातेवाईक भारतात रहात असतील,त्यांना एकमेकांना भेटतात येणार नाही.      

4          पाकिस्तानी लष्करी सल्लागारांची हकालपट्टी: पाकिस्तानच्या हाय कमिश्नरचं जे कार्यालय भारतात आहे,त्यातील आर्मी,एयरफोर्स, नेव्ही मधील पाकिस्तानी लष्करी सल्लागारांची हकालपट्टी करण्यात आली आहे आणि त्यांना एका आठवड्यात भारत सोडून जाण्यास सांगितले आहे.

5          पाकिस्तानी दूतावासातील राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे: पाकिस्तानी दूतावासातील राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरुन 30 वर करण्यास सांगण्यात आले आहे.    

याला राजनैतिक सर्जिकल स्ट्राइक म्हणण्यात येत आहे.पण एवढ्यांवर थांबून चालेल असे वाटतं नाही.

आजपर्यंत दहशतवादाला धर्म नसतो असं आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक म्हणत असतं,पण अतिरेक्यांनी नांव आणि धर्म विचारून हत्या केलेल्या आहेत.त्यामुळे दहशतवादाला धर्म आहे आणि तो म्हणजे इस्लाम हे उघड झाले आहे.

या हल्ल्यामागे उद्देश कोणता?         

1.       भारतात सध्या वक्फ बोर्ड कायद्यावरील चर्चा सुरू आहे, सर्वोच्य न्यायालयातील दोन न्यायमूर्तीनी राष्ट्रपतींना निर्देश देण्याचे जे धाडस त्यावरून सर्वोच्य न्यायालयाविरुद्ध देशात चांगलेच वातावरण तापले होते, सर्वोच्य न्यायालय प्रचंड दडपणाखाली होते.त्यावरून देशाचे लक्ष वळविणे हा हेतु असू शकतो.  

2.       काश्मीरमध्ये या वर्षी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या 1 लाख हा आकडा गाठणार होती. असं झालं तर काश्मिरी लोक कलम 370 हटविलं हे विसरून जातील,हे काही लोकांना वाटतं नसावे.

3.       काश्मिरी लोक आता भारताला आपला देश मानायला लागले तर पाकिस्तान किंवा एकंदर भारत विरोधी देशांना तुणतुणे वाजवून त्रास देता येणार नाही.

4.       भारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे,भारत आपण काही आगळीक केली तर त्याला उत्तर देईल, त्यामुळे भारताचा विकास खोळंबेल हा विचार सुद्धा मनांत असू शकतो.

5.       या उद्देश्यामागे पाकिस्तान, अन्य परकीय शक्ती किंवा भारतातील विघातक शक्ती देखिल असू शकतात.पण भारताने आता कायमचा धडा शिकवायला हवा असं मत खूप लोक आणि सामान्य जनता व्यक्त करीत आहे,आणि माझंही तेच मत आहे. एकदा आरपारची लढाई व्हायला हवी. तुमचं काय मत आहे हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा.   

समारोप:

            या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये या हल्ल्याविरोधात बंद पाळण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाने या बंदची हांक दिली नव्हती, तर जनतेने उत्स्फूर्तपणे हा बंद पाळला.हे उल्लेखनीय. आजच्या या ब्लॉगची समाप्ती या भ्याड हल्ल्यास बळी पडलेल्या माझ्या सर्व बांधवांना श्रद्धांजली अर्पण करतो.ईश्वर त्यांच्या परिवाराला दु:खातून सावरण्यासाठी शक्ती देवो.     

             आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु,पुणे. 

Comments

  1. जे इजरायल त्यांच्या शत्रूंबरोबर करतं तसंच धोरण भारताने ठेवलं पाहिजे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...