Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

अनोखी कहाणी मनस्वी तरुणाची

ब्लॉग नं. 2025/121.

दिनांक: 22 एप्रिल, 2025.

मित्रांनो,

            मी सध्या एक मानसशास्त्राचा कोर्स करतोय, हे 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षात माझ्या ब्लॉगमधून मानसशास्त्राचा म्हणण्यापेक्षा वाढत्या मानसिक आजारांचा उल्लेख केला होता.जीवन धकाधकीचं झालंय आणि अशात मला वाटतं की कमी अधिक प्रमाणात आपण सारेच मानसिक आजारांचे शिकार होऊ लागलो आहे.कुठल्याही गोष्टीत कधी काही चांगलं दिसतं नाही,हा देखिल मला मानसिक आजार वाटतो. राजकीय पुढारी तरी मानसिक आजाराचे शिकार झाले आहेत.Abnormal या शब्दाची व्याख्या करायची झाल्यास ती शब्दकोषात Different from What is normal अशी आहे.मानसशास्त्रात Abnormal Personality Disorders आहेत. आपल्याला ते कुठले माहित झाले की,लक्षात येईल आपल्या आजूबाजूला Abnormal Personality Disorders चे असंख्य रोगी आहेत हे आढळून येईल.यावर मी एक कादंबरी लिहिली आहे, “खेळ कुणाला दैवाचा कळला” ते kindle Amazon वर ई-बूक स्वरूपात प्रकाशित झालीय.आज हा ब्लॉग त्यासाठीच.

सविस्तर:

माणसाच्या मनांत काही तरी प्राप्त करण्याची इच्छा झाली की त्यासाठी तो प्रयत्न करू लागतो. या प्रयत्नांमुळे स्पर्धा वाढते, कारण असे प्रयत्न अनेक लोक करत असतात आणि जशी स्पर्धा वाढली की,त्या सोबत ताण तणाव वाढणे अपेक्षित असते,क्रमप्राप्त होते.पण यातून मानसिक आजार जन्म घेतात आणि आज काल मानसिक रोग्यांची संख्या वाढत आहे.पण या सोबत मानसिक रोगतज्ञ वाढले कां? नाही. मानसिक रोग्यांना तो मानसिक रोगी आहे हे सांगणे किंवा पटविणे तेवढे सोपे नाही. तसेच त्याच्या नातेवाईकांना समजावून सांगणे सोपे नाही.बऱ्याचदा तो असाच आहे,तो abnormal च आहे,वेडा झाला आहे तो,किंवा आमच्या प्रत्येक पिढीत कुणी ना कुणी असा असतोच,इथपर्यंत सांगण्यात येते.मानसिक आजारांची लोकांना ओळख करून देण्यासाठी आपण ही काही तरी केलं पाह्यजे या विचारातून या कादंबरीचा जन्म झाला.

          या विषयावर कादंबरी लिहिण्याचे जेव्हा मनांत आले,त्याच वेळी मी मानसशास्त्राच्या डिग्री कोर्ससाठी अॅडमिशन घेतलेली होती आणि माझ्या पहिल्या सेमेस्टर मध्ये मला पर्सनल डिसऑर्डर्स विषयी माहिती मिळाली.पण या कादंबरीचा विषय कसा बनवायचा, कथाबीज कसे तयार करायचे हा विचार मनांत येत होता.एक दिवस अचानक हे कथाबीज मला मिळाले.मी ओला टॅक्सीमधून प्रवास करत असतांना,ड्रायव्हरला कुणाचा तरी फोन आला आणि तो फोनवर त्या डॉक्टरांकडे कसे पोहोचायचे हे समोरच्याला समजावून सांगत होता.त्याच्या बोलण्यात खूप आत्मियता वाटली मला.

          त्याचा फोन झाल्यावर मी त्याला विचारले की,तुमचे कुणी नातेवाईक होते कां फोनवर? तुम्हाला कसे माहित हे डॉक्टर चांगले आहेत? तेव्हा त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.तो म्हणाला,मी एकदा मुंबईहून पुण्याकडे एक जोडपे आणि त्यांचा मुलगा यांना घेऊन येत होतो.मुलाला काही तरी त्रास होता.ते पुण्याचेच होते,म्हणजे नागपूरहून मुलाच्या नोकरीसाठी पुण्याला शिफ्ट झालेले.त्यांना पुण्यात कुठले डॉक्टर चांगले,हे माहित नव्हते.ते आपसांत चर्चा करत होते,कुणाकडे जावं,आपलं पुण्यात कुणी ओळखीचं नाही की त्यांना विचारता येईल.मी त्यांना आता ज्यांचा पत्ता सांगत होतो,त्या डॉक्टरांचे नांव सुचविले.
          मी विचारले,पण तुम्हाला कसं माहित ते डॉक्टर चांगले आहेत म्हणून? तेव्हा तो म्हणाला,साहेब गेली दहा वर्षे टॅक्सी चालवतो आहे.या दहा वर्षात बऱ्याच जणांना त्या डॉक्टरांकडे सोडले आहे आणि तिथून बऱ्याच जणांना दवाखान्यातून घरी सोडले आहे.जातांना ते लोक  बोलत असतात,डॉक्टर खूप चांगले आहेत, ताबडतोब गुण आला वगैरे.बस असे माहित झाले ते डॉक्टर.मला त्याचं कौतुक वाटलं.मी पुण्याचाच असल्याने,मला ते डॉक्टर चांगले आहेत,हे माहित होतं. पण इथेच ठरलं की माझ्या कादंबरीचा नायक असेल,हाच टॅक्सी ड्रायव्हर.फक्त तीच्या बोलण्यात डॉक्टर एवढेच होते,मी त्यांना मानसशास्त्रज्ञ बनविलं आणि त्या नंतर जे सुचत गेलं,
मी फुलवत गेलो आणि मी जे फुलविलं ते या कादंबरीतून तुम्हाला वाचायला मिळेल. तुम्हाला निश्चितपणे आवडेल.आणि वाचता वाचता मानसिक आजारांची ओळख होईल.

समारोप:

            ही लघु कादंबरी सध्या तरी ई-बूक स्वरूपात आहे.पण मी लवकरच याची पेपर बॅक घेऊन येणार आहे.त्या सोबत हिच्या ई-बूकची कॉपी जे kindle चे सभासद नसतील त्यांना कशी उपलब्ध करून देता येईल यावर सध्या मी काम करत आहे.हा प्रयोग जमला तर मग तुम्हाला,तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ही कादंबरी वाचता येईल.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 

प्रसाद नातु,पुणे. 

Comments

  1. मानसशास्त्र या माझ्या आवडत्या विषयाचा आपण अभ्यास करत आहात हे वाचून खूप आनंद झाला.
    खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...