ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
ब्लॉग नं. 2025/03 1 दिनांक: 31 जाने वारी,2025. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही बऱ्याचदा हे नक्कीच ऐकलं असेल की,तेलाचे सेवन केल्याने कार्बोहायड्रेट्स म्हणजेच पर्यायाने चरबी वाढते,अर्थात लठ्ठपणा वाढतो. पण आता देशातील विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देवी प्रसाद शेट्टी म्हणतात की, कार्बोहायड्रेट्स वाढण्यासाठी तेल खलनायक नाही.ते कां? आणि जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की तेल तुमच्या धमन्या बंद करण्याचे आणि तुमच्या हृदयाला नुकसान पोहोचवण्याचे मुख्य कारण आहे , तर तुम्ही पूर्णपणे बरोबर नाही आहात.कारण आता परिस्थिति बदलली आहे.सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: कार्बोहायड्रेट्स वाढण्यासाठी तेल खलनायक नाही हे सांगताना,डॉक्टरांनी निरोगी खाण्यासोबत सक्रिय जीवनशैलीचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.भारताचे सर्वोच्य नागरी पुरस्कार,पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवलेले डॉ.शेट्टी म्हणतात,“तेलाला दोष देऊ नका , परंतु मिठाई , साखर , भात , चपाती इत्यादि हे कार्बोहायड्रेट्स वाढण्यासाठीचे खलनायक आहेत. ” असे ते म्हणाले....