Skip to main content

मधुमेह आणि आवळा, एक सुपरफूड

  ब्लॉग नं. 2026/08 2 दिनांक: 23 मार्च , 2026. मित्रांनो मधुमेह आणि आवळा: रक्तातील साखर नियंत्रित करणारे एक नैसर्गिक ' सुपरफूड ' आजच्या धावपळीच्या युगात ' मधुमेह ' (Diabetes) हा जीवनशैलीशी संबंधित,एक अत्यंत वेगाने पसरणारा आजार बनला आहे.चुकीच्या खाण्याच्या सवयी , मानसिक ताण , लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव,ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मधुमेह केवळ रक्तातील साखरेवरच परिणाम करत नाही , तर तो हळूहळू डोळे , किडनी , हृदय आणि मज्जातंतूंवरही विपरीत परिणाम करू शकतो.चला सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर:  अशा परिस्थितीत , औषधांसोबतच ' काय खावे आणि काय टाळावे ' हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा मधुमेही रुग्ण फळे खाण्यास घाबरतात , परंतु निसर्गामध्ये असे एक ' सुपरफूड ' उपलब्ध आहे जे साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यास मदत करते— ते म्हणजे ' आवळा ' . आवळा: पोषकतत्त्वांचा खजिना : आवळ्याला ' इंडियन गूसबेरी ' असेही म्हणतात.अनेकांना वाटते की आवळा आंबट असल्याने तो हानिकारक ठरेल , पण सत्य याच्या उलट आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी , फा...

मानसिक ताकद म्हणजे काय?

ब्लॉग नं. 2024/281

दिनांक :- 21 नोव्हेंबर, 2024.

मित्रांनो,

असं म्हटलं जातं की मानसिक ताकद हा जीवनाचा कणा आहे.आजच्या तणावग्रस्त आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक ताकद ही एक महत्त्वाचे कौशल्य बनले आहे. मानसिक ताकद म्हणजे संकटांचा सामना करताना खंबीर राहण्याची क्षमता.ही फक्त कठीण प्रसंगांमध्ये सकारात्मक राहण्याचे नाव नाही, तर परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेण्याची कुवत आहे.आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की, मानसिक ताकद म्हणजे काय? मानसिक ताकदीचे महत्व, मानसिक ताकद कमी होण्याची कारणे? आणि मानसिक ताकद सुधारण्यासाठी करावयाचे उपाय जाणून घेणार आहोत.          

मानसिक ताकद म्हणजे काय?

           मानसिक ताकद म्हणजे मानसिक ताणतणाव, भीती, अपयश, किंवा अडचणींना तोंड देत स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनवणे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मानसिक ताकद महत्वाची भूमिका बजावते. मात्र, काही गोष्टी मानसिक ताकदीवर प्रतिकूल परिणाम करतात. 

मानसिक ताकदीचे महत्त्व: 

1. अपयशावर मात करण्यासाठी मदत:   मानसिक ताकद असल्यास अपयशाला तोंड देण्याची क्षमता विकसित होते.अपयश हे पुढील प्रयत्नासाठी शिकवणूक असते आणि यशाची पायरी असते.   

2. सकारात्मक दृष्टिकोन:  मानसिक ताकद कठीण काळातही सकारात्मक राहण्यासाठी मानसिक ताकद मदत करते. 

3. तणावावर नियंत्रण:  जीवनातील अनिश्चिततेचा सामना करताना तणाव कमी करण्यासाठी हे एक महत्त्वाचे  कौशल्य आहे. 

मानसिक ताकद कमी होण्याची कारणे: 

1. अतिप्रेशर आणि स्पर्धा:  आजच्या काळात व्यक्ती सतत स्पर्धेत असतो. प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम होण्याचा दबाव मानसिक थकवा आणतो. 

2. नकारात्मक विचारसरणी:   स्वतःकडे कमीपणाने पाहणे, सतत नकारात्मक विचार करणे किंवा स्वतःला कमी लेखणे यामुळे मानसिक ताकद कमी होते. 

3. ताणतणावाचा अतिरेक:  सततच्या तणावामुळे मनावर विपरीत परिणाम होतो. त्याचा दीर्घकालीन परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. 

4. संवेदनशीलता:  लहानसहान गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देणे किंवा प्रत्येक गोष्टीत दोष पाहणे यामुळे मानसिक स्थैर्य बिघडते. 

5. सोशल मीडियाचा प्रभाव:  सतत सोशल मीडियावर असलेली "परफेक्ट" आयुष्यांची तुलना आपल्यात न्यूनगंड निर्माण करते. 

मानसिक ताकद सुधारण्यासाठी उपाय: 

1. सकारात्मक विचारांचा अवलंब:  नकारात्मक विचार टाळा. कोणत्याही परिस्थितीत चांगल्या गोष्टी शोधा. 

दिवसाची सुरुवात सकारात्मक विधानांनी करा. उदाहरणार्थ, "मी या आव्हानाचा सामना करू शकतो." 

2. ध्येय निश्चित करा:  लहानसहान आणि वास्तववादी ध्येय ठेवा. प्रत्येक लहान यश तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते. ध्येयाकडे वाटचाल करताना वेळोवेळी स्वतःचा आढावा घ्या. 

3. आत्मविश्वास वाढवा:   स्वतःवर विश्वास ठेवा.आपल्या क्षमता आणि मर्यादा ओळखा आणि त्यानुसार कृती करा. 

4. ताणतणाव व्यवस्थापन:   ध्यान, योगासने किंवा प्राणायामासारख्या तंत्रांचा सराव करा. विश्रांती घेण्यासाठी वेळ काढा. 

5. सुदृढ शरीर, सुदृढ मन:  नियमित व्यायाम मनातील निगेटिव्हिटी कमी करून आनंद वाढवतो. पोषणमूल्ययुक्त आहार मानसिक आरोग्य सुधारतो. 

6. समस्या समजून घ्या:   समस्या लपवण्याऐवजी त्यांचा सामना करा. त्यासाठी मदत मिळवा, मग ती मित्रांची असो किंवा तज्ञांची. कठीण प्रसंगांमध्ये धीराने विचार करा. 

7. चांगले वाचन आणि प्रेरणा:   प्रेरणादायी पुस्तकं वाचा.अशा लोकांसोबत रहा जे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतात. 

8. सोशल मीडिया वापर मर्यादित करा:   सोशल मीडियावरील अनावश्यक गोष्टींवर जास्त वेळ घालवणे टाळा. 

वास्तविक जीवनातील लोकांसोबत जास्त वेळ घालवा. 

9. जिज्ञासू राहा:  नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन कौशल्य आत्मसात केल्याने आत्मविश्वास वाढतो. 

10. वेळेचे व्यवस्थापन:  प्राधान्यक्रम ठरवा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अनावश्यक ताणतणाव टाळता येतो. 

मानसिक ताकद असलेल्या लोकांच्या काही सवयी: 

1. ते तक्रारी करत नाहीत:   कठीण प्रसंगांतही ते तक्रारीऐवजी उपाय शोधतात. 

2. स्वतःला जबाबदार धरतात:  चुकांची जबाबदारी घेतल्याने सुधारणा करण्याची क्षमता विकसित होते. 

3. संतुलन राखतात:  मानसिक ताकद असलेले लोक भावनांना आवर घालून कृती करतात. 

4. स्वतःसाठी वेळ काढतात:   त्यांनी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी वेळ दिला तरच ते इतरांसाठी काही करू शकतात, हे त्यांना माहीत असते. 

समारोप:

मानसिक ताकद ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ही ताकद काही जन्मतःच येत नाही, तर ती सरावाने आणि योग्य दृष्टिकोनाने मिळवता येते. जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी, ताणतणाव कमी करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी मानसिक ताकद आवश्यक आहे.आजच सकारात्मक विचार, ताणतणाव व्यवस्थापन, आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करा. कारण खंबीर मन असले की कोणतीही अडचण तुम्हाला पराभूत करू शकत नाही. 

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.   


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...