ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
Blog No. 2024/ 11 2 . Date: 3 1 st ,May 2024 मित्रांनो , रेफ्रिजरेटर हे कमी तापमानात अन्न आणि पेये साठवण्यासाठी वापरले जाणारे , सामान्य घरगुती उपकरण आहे.त्याचे प्राथमिक कार्य म्हणजे जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांची वाढ कमी करणे , ज्यामुळे नाशवंत वस्तूंचे शेल्फ लाइफ वाढते.साधारणतः, रेफ्रिजरेटर म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय,याचे थोडक्यात उत्तर हे आहे. रेफ्रिजरेटर मध्ये काय काय ठेवू नये,याची यादी खरं म्हणजे खूप मोठी आहे.आपण आजकाल रेफ्रिजरेटरचा उपयोग कपाटासारखा करतो.पण रेफ्रिजरेटर आजारांना कारणीभूत ठरू शकतात ? होय , तुम्ही बरोबर वाचलंत. कसे ते सविस्तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: काही खाद्य पदार्थ किंवा वस्तु जर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या,तर त्या विषारी आणि मानवी वापरासाठी अयोग्य बनू शकतात.खाद्यपदार्थ रेफ्रिजरेट करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अन्नाची उष्णता कमी करणे , त्याचे तापमान कमी करणे आणि ते जास्त काळ टिकवून ठेवणे.पण डॉ.डिंपल जांगडा , एक आयुर्वेद आंत आरोग्य प्र...