ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
B log No.2024/0 40 . Date: - 29 th , February,2024. मित्रांनो, तुम्ही इतक्यात बऱ्याच वेळा हे ऐकले असेल की,गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या वर आले आहेत.यासाठी एक दारिद्र्य रेषा आखून दिलेली असते.ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे त्या रेषेखाली असेल ते दारिद्रय रेषेखाली जगणारे लोक.केंद्रीय मंत्रिमंडळाने अधिकृत केलेल्या पद्धतीनुसार , बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) यादी अंतर्गत लाभार्थी होण्यासाठी घरगुती उत्पन्न मर्यादा अंदाजे रु. 27 , 000 प्रति वर्ष आहे. एखाद्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 27 , 000/- पेक्षा जास्त असल्यास कुटुंबाचा बीपीएल यादीत समावेश केला जाणार नाही.वर्षाला रु. 27 , 000/- म्हणजे महिन्याला रु.2250.00. पण आजकाल आणखी एका पद्धतीचा यासाठी वापर केला जातो. आजच्या ब्लॉगमध्ये त्या विषयी थोडे काही. सविस्तर आजकाल एक वेगळा सिद्धांत मांडला जातो आहे,तो म्हणजे एका परिवाराचा अन्नधान्य , भाजीपाला , फळे ...