Skip to main content

Posts

Showing posts from December, 2023

टाइप 5 मधुमेह

ब्लाॅग नं.2025/150 दिनांकः 31 मे, 2025. मित्रांनो,  मधुमेहाचा नवा प्रकार: प्रकार ५ मधुमेह – एक नवा दृष्टिकोन एप्रिल २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने (IDF) मधुमेहाच्या एका नवीन प्रकाराला अधिकृत मान्यता दिली – प्रकार ५ मधुमेह. या नवीन प्रकारामुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात नवी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रकार ५ मधुमेह विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अंदाजानुसार, सुमारे २० ते २५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. प्रकार ५ मधुमेह म्हणजे काय? प्रकार ५ मधुमेहाला "गंभीर इन्सुलिन-कमी असलेला मधुमेह" (Severe Insulin-Deficient Diabetes - SIDD) म्हणूनही ओळखले जाते. हा मधुमेह इतर प्रकारांपेक्षा वेगळा आहे. कुपोषणामुळे होणाऱ्या चयापचय विकारांशी त्याचा थेट संबंध असून, विशेषतः किशोरवयीन आणि तरुण प्रौढांवर त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो. दीर्घकाळ कुपोषणामुळे शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामतः, शरीर इन्सुलिनची निर्मिती पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. यामुळे चयापचय स्थिरता राखणे कठीण होते. टाइप १ आणि ...

नाना पाटेकर -एक अनोखा कलाकार

  Blog No.2024/001.   Date: -1st, January,2024.   मित्रांनो,                       सर्व प्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचे,आरोग्याचे आणि भरभराटीचे जाओ,हीच शुभेच्छा. इंग्लिश नवीन वर्ष वगैरे उगीच शब्दच्छल करण्यात काहीच अर्थ नाही.जेंव्हा सर्व व्यवहार या वर्षाप्रमाणेच केले जातात.असो.                        भारतीय सिनेसृष्टीत आपल्या वेगळ्या अभिनय शैलीसाठी प्रसिद्ध असलेले नाना पाटेकर यांचा आज जन्मदिवस,नाना 73 वर्षाचे झालेत. एक भारतीय अभिनेता , पटकथा लेखक , चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक   असलेले नाना पटेकर भारतीय प्रादेशिक सैन्याचे माजी अधिकारी आहेत.त्यांनी प्रामुख्याने हिन्दी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. नाना पाटेकर यांचे खरे नांव विश्वनाथ पाटेकर. पाटेकर यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार , चार फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन फिल्मफेअ...

2023 मिश्र परिणामांचे वर्ष

  Blog No.2023/321.   Date: -31 st , December 2023.   मित्रांनो,             या वर्षातील म्हणजे 2023 चा हा 321 वा ब्लॉग. आज 2023 संपणार आणि उद्यापासून 2024 सुरु होणार. नवीन संकल्प सोडायचा दिवस.माझे म्हणाल तर मी संकल्प केला आहे. येत्या वर्षात  ब्लॉग ची संख्या 350 पर्यन्त नेण्याचा प्रयत्न करणार आहे.अर्थात तसे विषय मिळणे आवश्यक असते.पण प्रयत्न नक्की असेल. आजच्या ब्लॉगमध्ये वर्ष 2023 मधे भारतात काय काय विशेष घडलं याचा आढावा आपण घेणार आहोत.   प्रास्ताविक             2023 हे भारतासाठी संमिश्र स्वरूपाचे गेले.भारतात दोन आंतरराष्ट्रीय एवेंट्स झाले. एक G -20 परिषद आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2023. आता प्रत्येक महिन्यात काय महत्वाच्या गोष्टी घडल्या हे थोडक्यात बघू या.   जानेवरी 2023             वर्षाच्या सुरुवातीला विनेश फोगट,साक्षी मलिक आणि बजरंग पूनिया यांच्या नेतृवाखाली भारतीय कुस्तीगीरांनी भारतीय...

पेपर बॅक पुस्तकांना पर्याय-ई-बूक

Blog No.2023/320.  Date: -29 th , December 2023. मित्रांनो,                 नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवात 12.50 कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. अशी बातमी कानावर आली.ही बातमी नक्कीच उत्साहवर्धक आहे.एक लेखक म्हणून हे लिहीत नाही तर एक वाचक म्हणून आणि पुस्तक प्रेमी म्हणून देखिल ही बातमी आनंद देणारी आहे. कारण पुस्तके ही ज्ञान देतात,करमणूक करतात,धकाधकीच्या जिवनात सहारा देतात आणि वेगळा विचार करायला लावतात.           म्हणून पुस्तके वाचली गेली पाहिजेत.आजचा हा ब्लॉग लिहायचे कारण हे की नुकतंच माझ्या वाचनात आलं की इतर देशांमध्ये ई-बूक घेऊन वाचणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.जगभरात 19.10 कोटी ई-पुस्तके विकत घेतली गेली.त्यामानाने मराठी ई-बूक कमी विकत घेतली जातात.खरं तर इतर जगाच्या मनाने आपल्या देशात शहरात भेडसावणारी समस्या म्हणजे मनाप्रमाणे रहायला घर मिळणे.घर म्हणजे पूर्वी ज्याला घर म्हणत असतं , ते स्वतःचे वेगळे असे घर ही कल्पना शहरात तरी दुर्मिळ आणि महाग झालेली आहे.आता घर म्हण...

रात्रीच्या प्रवासासाठी रेल्वेचे नवे नियम

  Blog No.2023/319.   Date: -28 th , December 2023.   मित्रांनो,             तुम्ही रेल्वेने रात्री प्रवास करत आहात.सहप्रवाश्यांचे मोबाईलवर मोठमोठ्याने बोलणे,रात्री दिवे सुरु ठेवणे किंवा मोबाईलच्या स्पीकरवर रात्री विडियो पहाणे,संगीत ऐकणे.या समस्यांना तुम्ही सामोरे जात असाल तर तुमच्या साठी आता एक गुड न्यूज आहे. काय आहे गुड न्यूज पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये.   प्रास्ताविक             तुम्ही रात्री ट्रेनने प्रवास करत असाल तर यापुढे तुम्हाला असे अनुभव येणार नाही. कारण, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन ( IRCTC) ने रात्री ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.सर्व प्रवाशांना आराम मिळावा यासाठी ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. रात्री १० नंतर ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांनी खालील मार्गदर्शक तत्त्वे लक्षात ठेवावीत.   रात्री 10 नंतर ऑनबोर्ड प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे 1.   ...