Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

क्रिकेट वर्ल्ड कप 2023

Blog No.2023/273
Date:- 28th, October,2023.


मित्रांनो, 
          वर्ल्ड कप 2023 चे सामने आता अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झालेत. कालच्या चुरशीच्या सामन्यात द.आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव करत त्यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या अपेक्षा जवळपास संपुष्टात आणल्या आहेत. तसेच श्रीलंकेने गतविजेत्या इंग्लंडला हरवत यावेळेस इंग्लड उपांत्य फेरीत नसणार हे निश्चित केले आहे.

गुणतालिका
           क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचे प्रत्येकी 10 गुण झाले आहेत, पण नेट रन रेटमुळे ते पहिल्या स्थानावर आहेत. पण भारताचे 5 सामन्यात 10 गुण आहेत तर द.आफ्रिकेचे 6 सामन्यात. न्युझीलंड 5 सामन्यात 8 गुण मिळवित तिसऱ्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया 5 सामन्यात 6 गुणां सहित चवथ्या स्थानावर आहे.
            श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे तिन्ही देश प्रत्येकी 4 गुणासहित पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. बांगलादेश, इंग्लंड आणि नेदरलॅड हे दोन गुणांसह आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत आणि या संघांचे वर्ल्ड कप मधील आव्हान संपुष्टात जमा आहे.

समारोप
             या वेळेला रोहित शर्माच्या नेतृत्वाची सर्व समालोचक प्रशंसा करत आहेत. त्याने बाॅलिंगमधे वेळोवेळी केलेले बदल, फिल्ड प्लेसमेंट आणि जोरदार बॅटींगसह Leading from the front या उक्तीला जागतोय. "रो को" अर्थात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना रोखून दाखवा अशा प्रकारची जाहिरात सध्या जोरात सुरु आहे. पण भारतीय टीमला गरज आहे ती फाजिल आत्मविश्वासात न येता वर्ल्ड कप जिंकूनच स्वस्थ बसायचं.तर या वेळेस वर्ल्ड कप आपलाच आहे.
              आजचा ब्लाॅग कसा वाटला हे कमेंट बाॅक्समधे अवश्य लिहा.पुन्हा भेटू पुढच्या ब्लाॅगमधे तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि मस्त जगा.

प्रसाद नातु, पुणे.
             

Comments

Post a Comment