Skip to main content

पित्ताचा त्रास हा सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक आजार

  ब्लॉग नं. 2025/35 3 . दिनांक: 1 7 डिसेंबर, 2025.   मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनशैलीतून उद्भवणारे अनेक त्रास आपण वारंवार अनुभवतो,त्यापैकी पित्ताचा त्रास हा सर्वाधिक सामान्य आणि त्रासदायक प्रकार आहे. छातीत जळजळ , तोंड कडू होणे , अंग गरम जाणवणे , आंबट ढेकर… हे सर्व त्रास पित्त वाढल्याची लक्षणे आहेत.पण पित्त का वाढते ? आणि ते कमी करण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करता येतात ? चला , अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये.  सविस्तर: पित्त वाढण्याची मुख्य कारणे : 1. चुकीचा आहार: आपण नेहमी खात असलेल्या पदार्थांचा पित्ताशी थेट संबंध असतो.तेलकट , तिखट , मसालेदार पदार्थ रेड मीट , जंक फूड हे अन्न पदार्थ पित्त वाढवण्यामागील मुख्य कारणे आहेत. अशा पदार्थांमुळे छातीत जळजळ होणे अगदी स्वाभाविक आहे. 2. अपेय पानाचे सेवन: आयुर्वेदानुसार अपेय पान म्हणजे शरीरासाठी हितकारक नसलेले पदार्थ.जसे चहा , कॉफी , दारू , सिगारेट यांचे जास्त प्रमाणात सेवन पित्त दोष वाढवते. 3. तीव्र ऊन आणि उष्ण वातावरण: ऊन्हात जास्त वेळ काम करणे , शरीराला सूर्याची तिव्रता पेलवणं कठीण होणे,...

गणेश चतुर्थी

 Blog No.2023/242

Date:- 19th, Sept, 2023. 

मित्रांनो,

            आज गणेश चतुर्थी. सुखकर्ता विघ्नहर्ता, गौरीपुत्र, विनायक, वक्रतुंड, एकदतं, गजवदन, लंबोदर, विघ्नराजेंद्र अशा बाप्पाचे आगमन. महाराष्ट्रात तर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.भारतात नव्हे तर जगात जिथे जिथे भारतीय माणूस पोहोचला आहे. तिथे तिथे हा सण साजरा केला जातो.

            गणेश चतुर्थीबद्दल कुणाला काही माहित नसेल असे नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा लहानसा ब्लॉग. मंगलमूर्ती श्री गणेश आपल्या सगळ्यांचे सर्व संकटापासून रक्षण करो.

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।

भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।।

तृतीयं कृष्णपिङ्गगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।।

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।।

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।

न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।

पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।

संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।

इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।

सारांश

हे स्तोत्र देखिल तुम्हाला माहितच नव्हे तर पाठ असेल. या स्तोत्राच्या विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् या सोबत धन,आरोग्य, संपदा आपण सर्वांना लाभो हीच श्री चरणी प्रार्थना.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु,पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...