Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

आर्थिक साक्षरता म्हणजे काय आणि महत्व

Blog No. 2023/23 

Date,29th,  January 2023. 

मित्रांनो,  

            भारताची digitalisation  कडे मोठी झपाट्याने वाटचाल सुरु असतांना,काही गोष्टी ऐकायला मिळाल्या की,वाटते की त्या सोबत आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.अधून मधून एखाद्याच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचे,एटीएम कार्ड ची सविस्तर माहिती विचारून अकाऊंट पूर्णपणे खाली केल्याचे,ऐकायला मिळते.बँकांकडून आणि रिजर्व बँकेकडून टी.व्ही.“जानकार बनिये सतर्क राहिये” अशी जाहिरात दाखविल्यानंतर लगेच बातम्यामधून कुणाचे तरी अकाऊंट हॅक झाले.पूर्ण पैसे काढून घेतले सारखी बातमी ही पहायला/ऐकायला  मिळते ही किती विडंबना आहे.अजूनही सुशिक्षित घरातील स्त्रिया ह्या एटीएम कार्ड वापर करीत नाहीत किंवा यूपीआयचा वापर करु शकत नाही. त्यांना रोख (कॅश) जवळ बाळगणे जास्त सोयीचे वाटते.          

 आर्थिक साक्षरता कां गरजेची    

आज ही बाब ब्लॉग साठी निवडण्याचे कारण असे की, माझ्या पावणे सहा वर्षाच्या नातवासाठी,मी जेम्स चॉकलेटचा बॉल मिळतो,तो त्याला विकत घेऊन दिला.त्यात एक स्क्रॅच कार्ड होते ते त्याने मला दिले आणि तो मला म्हणाला की आबा हे स्क्रॅच कार्ड मोबाइल वरुन स्कॅन केले,तर मोबाइलवर एक गेम डाउनलोड करता येईल.मी सहज प्रयत्न करून पाहिला. खरं तर मोबाईल त्याला द्यायचा नाही हे ठरलेले.त्यामुळे तो गेम डाउनलोड करण्यासाठी माझा जीमेल आयडी आणि पासवर्ड द्यावा लागणार होता.त्याला ते सांगितले तो म्हणाला,पेटीएम चा पासवर्ड मागतो आहे का? तो देऊ नका तो तुमचे सगळे पैसे काढून घेईल.त्याला आज ह्या लहान वयात माहित झाले आहे.अशा अशा लहान मुलांना आतापासून जर आर्थिक व्यवहाराचे ज्ञान झाले,तर भविष्यात ते त्या मुलाला आणि देशाला फायदेशीर आहे.

आर्थिक साक्षरता म्हणजे काय आणि महत्व       

आर्थिक साक्षरता म्हणजे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन, बजेट आणि गुंतवणूक यासह विविध आर्थिक कौशल्ये समजून घेण्याची आणि प्रभावीपणे वापरण्याची क्षमता.आर्थिक साक्षरतेचा अर्थ हा तुमच्या पैशाशी असलेल्या नातेसंबंधाचा पाया आहे आणि तो शिकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.सोप्या शब्दात आर्थिक साक्षरता म्हणजे पैश्याचा योग्य आणि सुरक्षित उपयोग किंवा वापर. 

आर्थिक साक्षरता महत्व आणि उपयोग

    तुम्ही आर्थिक साक्षर असाल तर,तुमच्या मासिक उत्पन्नाचे बजेट तुम्ही अधिक परिणामकारक पद्धतीने करु शकता.आज मासिक उत्पन्नाचे बजेट करतांना मुलांचे शिक्षण,उच्च शिक्षण, त्यांना प्रस्थापित करून देणे,त्यांचे लग्न करून देण्यासाठीचे नियोजन आणि स्वतःच्या सेवनिवृत्ती पश्चात जीवनासाठीचे नियोजन ह्याचा समावेश व्हायला हवा.

    पर्यटन हा देखिल आज जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.धकाधकीच्या जीवनात चार क्षण निवांत घालवता यावे यासाठी पर्यटन हवहवेसे वाटते.त्यासाठी खर्च बराच होतो.त्याचे नियोजनही मासिक उत्पन्नाचे बजेट बनवितांना झाले पाहिजे.                   

    आज काल जीवनात बँकाकडून अथवा वित्तीय संस्थांकडून विविध कारणांसाठी कर्ज घेणे अनिवार्य झाले आहे.त्या कर्जासाठी लागणारे मार्जिन,त्या कर्जाचे हफ्ते वेळेवर परत करण्यासंबंधीचे नियोजन आर्थिक साक्षर असलेल्या व्यक्तीस कठीण जात नाही.ही साक्षरता आपल्या देशांत अजिबात नाही अशातला भाग नाही.पण जग बदलत आहे आणि ह्या बदलांचा योग्य पद्धतीने सामना करण्यासाठी नविन पिढी तयार करणे गरजेचे आहे.

     बँकेचे व्यवहार अजूनही लोक व्यवस्थितपणे करु शकत नाहीत आणि मग बँकेत योग्य सेवा मिळतं नाही वगैरे ओरड सुरु होते.ह्याला कारण असे की,अजूनही बऱ्याच मुलांना बँकेची पहिली ओळख ही शैक्षणिक कर्ज घेतले तर होते किंवा बँकेत पगार जमा होणार म्हणून अकाऊंट उघडावे लागते,त्या वेळेस होते.जे लोक आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत ते सर्वसाधारणपणे आर्थिक फसवणुकीला कमी बळी पडतात.

 आर्थिक साक्षरता कशी वाढेल

त्यामुळे आर्थिक साक्षरता ही अगदी प्राथमिक शाळांमधून शिकवायला सुरु करणे गरजेची आहे.त्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात त्याचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे नुकतेच वाचले.पण तुम्हीही आपल्या मुलांना,नातवांना आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रयत्न सुरु करा. यासाठी त्यांना पैश्याची ओळख करून द्यायला हवी.कारण आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे.         

 

 

प्रसाद नातु, पुणे 

Comments

  1. योग्य माहिती आणि खरंय बँक च काम काय हे अजून जास्त लोकांना माहिती नाही मला ही पूर्ण माहिती नाही
    पण आजकालची पिढी फार चतुर चाणाक्ष आहेत आपल्या देशाचे पुढचे भविष्य खरंच उज्वल आहे
    तुमच्या सारखे मार्गदर्शक असल्याने त्यांचे ही

    ReplyDelete
  2. आर्थिक साक्षरते संबंधीचा लेख खूप छान आहे.
    अनिल जोगळेकर

    ReplyDelete
  3. उपयोगी माहिती
    बैंकिंग साक्षरता सर्वाना आवश्यक🙏
    रा रा जोशी वर्धा

    ReplyDelete

Post a Comment