ब्लॉग नं. 2026/1 72. दिनांक: 21 जून, 2026. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...
Blog No. 2023/15
Dated 19th, January 2023
मित्रांनो,
साधारणतः मध्यम वर्गीय पगारदार लोकांचे जीवन अर्थात त्यातील कमावत्या व्यक्तीचे जीवन हे आपली जी कुठली नोकरी असेल, ती जेवढी जमेल तेवढी ईमानदारीने करण्यांत जातं.देवदर्शन वगैरे जेवढे कमी उत्पन्न गट किंवा पगारदार व्यक्तींशिवाय इतर म्हणजे शेतकरी, व्यवसायिक यांना जमतं तेवढं जमत नाही. तुम्ही स्वतःच विचार करा किती वेळा आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला गेलात किंवा प्रगट दिनाला गजानन महाराजांचे दर्शन घेतले, किंवा नवरात्रात महालक्ष्मीचे दर्शन. नाही जमतं.मग साठी नंतर आपण हे काहीच केले नाही याची जाणीव होते.ज्याचा पाप पुण्यावर विश्वास असतो, तो आपल्या हातून काहीच पूण्यकर्म झालं नाही म्हणत दु:खी होतो. पण आपण आपला प्रपंच नीटनेटका केलेला असतो.आपलं कर्म व्यवस्थित केलेले असतं. अशांसाठी एक सुंदर गीत राम उगावकर आणि श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी लिहीलं असावं असं वाटून जातं. या गीताबद्ल आज मी तुम्हाला काही सांगणार आहे.
एक वेगळं भक्तिगीत
हे भक्तीगीत नवीन नाही. साधारणतः 1983-84 च्या आसपासचं असावं. पं.रामदास कामत यांनी खुप आर्त स्वरुपात गायले आहे. जणू आपल्या सगळ्यांची ती भावना त्यांनी देवापर्यत पोहोचवलेली आहे. या भक्तीगीतात म्हटलयं "कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात." पुढे कवि लिहीतात "कधी नाही आलो तुझिया कथाकिर्तनाला".नोकरीच्या व्यापात कधी वेळच मिळत नाही न. तुटपुंजा, संसार पुढे रेटण्या इतका पगार,त्यामुळे "कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला " अशीच अवस्था असते. ".गंधफूल नाही जवळी तुझ्या पूजनाला" पण भक्तीभाव असतो. म्हणून कवि परमेश्वराला म्हणतो "भक्तीभाव जाणून घे तू वसे जो उरांत".
कर्म हिच पूजा आहे.
पुढच्या कडव्यात कवि म्हणतो की, "कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी." गीता वाचलेली असो किंवा नसो, कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं. "नित्य सर्व कर्मांमधे तुला पाहतो मी." स्वतःचे कार्य निट करणे हिच ईशपूजा आहे, असे आपण म्हणतोच ना. पुढे कवि म्हणतो "कर्मरुप सेवा तुझिया पदी वाहतो मी." आपलं कार्य आपण एक पूजा मानून करतो. अगदी इंग्रजीत देखिल म्हटलयं "Work is worship". त्यामुळेच कवि पुढे म्हणतो की, "तिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसांत. मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात." आपण नोकरीत अगदी रमलेलो असतो. किती अर्थपूर्ण आणि सुंदर गाणं आहे. ह्या गाण्याचा मला अधिक परिचय साठीनंतर व्हावा. हा योगायोग निश्चितच नव्हता. ह्या गीतात सांगितलेले मी काहीच करु शकलो नाही हे मनावरचं मळभ, हे गाणं गायलं की दूर होतं असं मला जाणवलं. तुम्ही अनुभव घेऊन बघा.
"कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात". ऐकण्यासाठी टाईप करा. https://youtu.be/fVCp1xIxWmk
प्रसाद नातु,पुणे.

This comment has been removed by the author.
ReplyDelete
ReplyDeleteAdhunik jagatli vastavvadi post. Sadhyachya dhakadhakichya jeevnat ashi Shannara denari gani khup Anand detat
Exactly true!
ReplyDeleteसाधारण पणे मध्यम वर्गीय नोकरदार व्यक्तीच्या अध्यात्मिक जीवनाचे यथार्थ वर्णन केले आहे. मी देखील नोकरी मध्ये Work is worship ला प्राधान्य दिले व त्याचाचांगला अनुभव आला.
ReplyDelete