ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
मित्रांनो चाळीसगाव सुटलं. तसा मी ही आपला प्रवास किशोरवस्थेकडे सुरू केला होता.आमच्या ध्यानी मानी नसतांना आबासाहेबांना सिकंदराबादच्या डी.बीआर.मिल्स कडून नोकरीची ऑफर आली.ते इंटरव्ह्यु साठी गेले अन तिकडे कामावर रुजू झाले.आबासाहेब आता डी.बीआर.मिल्स, सिकंदराबाद येथे नोकरीला लागले होते.1970 साली रु.1200/-पगाराची नोकरी म्हणजे गंमत नव्हती.हैदराबाद आणि सिकंदराबादच्या मधोमध, टॅंक बंद रोडच्या समोर, डी.बीआर.मिल्स अर्थात दिवाण बहादूर रामगोपाल मिल्स. विस्तीर्ण पसरलेला हुसैन सागर अगदी समोर होता.त्यात एक रोटरी पार्क होता. डी.बीआर.मिल्स.ही सिकंदराबाद आणि हैदराबादच्या सीमा रेषेवर होती. कवाडीगुडा हे त्या भागाचे नांव जिथे ही मिल होती.घरातून टॅंक बंद रोडची ट्राफिक दिसत असे. चाळीसगाव सारख्या लहान गावातून एकदम हैदराबाद-सिकंदराबाद सारख्या मोठ्या गावात रहायला जाणे.एक चॅलेंज होतं हे. हैदराबाद आता इतके मोठे नसले तरी जवळपास 350 वर्षाचा इतिहास आणि एकेकाळी निझामाची राजधानी असलेले शहर होते.हैदराबाद आणि सिकंदराबाद ही जु...