ब्लॉग नं. 2026/1 55 . दिनांक: 4 जून , 2026. मित्रांनो, आजकाल आरशासमोर उभं राहिल्यावर , अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात , त्याचं कारण म्हणजे कंगव्यात किंवा स्नान करताना,हातात येणारे केसांचे पुंजके ! "अरेरे , माझे केस खूप गळतायत , मला टक्कल तर पडणार नाही ना ?" ही भीती आजकालच्या तरुणाईपासून ते पन्नाशीतील व्यक्तींपर्यंत,प्रत्येकालाच सतावते आहे. पण कधी विचार केलाय का , की नक्की टक्कल का पडते ? यामागे कोणती विज्ञानाची सूत्रं आहेत आणि आपण नकळत कोणत्या चुका करतोय ? चला तर मग , आजच्या या ब्लॉगमध्ये आपण टक्कल पडण्यामागचं नेमकं विज्ञान , आपली बदलती जीवनशैली आणि यावरील उपायांचा सविस्तर आढावा घेऊया. सविस्तरः 1. मानसिक ताण आणि टक्कल पडण्याचा संबंध: आपल्याकडे एक मजेशीर विनोद नेहमी केला जातो,"मला टक्कल पडत चाललंय या चिंतेनेच,माझे केस जास्त गळायला लागलेत !" यात विनोदाचा भाग सोडला , तरी हे अक्षरशः शंभर टक्के खरे आहे.आजच्या धावपळीच्या युगात,मानसिक ताणतणाव ( Stress) आणि सततची चिंता,हे आपल्या आरोग्याचे मोठे शत्रू बनले आहेत.जेव्हा आपण जास्त ताण घेतो , तेव्हा शरीरातील संप्...
ब्लॉग नं. 2026/14 8 . दिनांक: 2 8 मे, 2026. मित्रांनो, महाराष्ट्रात ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ अर्थात SIR प्रक्रिया, 30 जून 2026 पासून सुरू होत आहे. म्हणूनच आजच्या ब्लॉगमध्ये आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.भारतात निवडणुका म्हणजे, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत अचूक असणे, अत्यंत महत्त्वाचे असते.याच पार्श्वभूमीवर Election Commission of India म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाने,‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ ( Special Intensive Revision – SIR) ही मोठ्या प्रमाणावर मतदार पडताळणी मोहीम सुरू केली आहे. सविस्तर: ही मोहीम अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जात असून , कोट्यवधी मतदारांच्या नोंदींची तपासणी केली जाणार आहे. अनेक नागरिकांसाठी ‘एसआयआर’ हा शब्द नवीन असला , तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया म्हणजे,मतदार याद्यांची सखोल साफसफाई आणि अद्ययावत नोंदी तयार करण्याचा प्रयत्न आहे. एसआयआर ( SIR) मोहीम सुरू करण्यामागचे कारण काय ? निव...