Skip to main content

Posts

टक्कल का पडते? कारणे, गैरसमज आणि काळजी घेण्याचे सोपे उपाय

ब्लॉग नं. 2026/1 55 . दिनांक:  4   जून , 2026.   मित्रांनो, आजकाल आरशासमोर उभं राहिल्यावर , अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात , त्याचं कारण म्हणजे कंगव्यात किंवा स्नान करताना,हातात येणारे केसांचे पुंजके ! "अरेरे , माझे केस खूप गळतायत , मला टक्कल तर पडणार नाही ना ?" ही भीती आजकालच्या तरुणाईपासून ते पन्नाशीतील व्यक्तींपर्यंत,प्रत्येकालाच सतावते आहे. पण कधी विचार केलाय का , की नक्की टक्कल का पडते ? यामागे कोणती विज्ञानाची सूत्रं आहेत आणि आपण नकळत कोणत्या चुका करतोय ? चला तर मग , आजच्या या ब्लॉगमध्ये आपण टक्कल पडण्यामागचं नेमकं विज्ञान , आपली बदलती जीवनशैली आणि यावरील उपायांचा सविस्तर आढावा घेऊया. सविस्तरः 1. मानसिक ताण आणि टक्कल पडण्याचा संबंध: आपल्याकडे एक मजेशीर विनोद नेहमी केला जातो,"मला टक्कल पडत चाललंय या चिंतेनेच,माझे केस जास्त गळायला लागलेत !" यात विनोदाचा भाग सोडला , तरी हे अक्षरशः शंभर टक्के खरे आहे.आजच्या धावपळीच्या युगात,मानसिक ताणतणाव ( Stress) आणि सततची चिंता,हे आपल्या आरोग्याचे मोठे शत्रू बनले आहेत.जेव्हा आपण जास्त ताण घेतो , तेव्हा शरीरातील संप्...

महाराष्ट्रात ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ अर्थात SIR प्रक्रिया

  ब्लॉग नं. 2026/14 8 . दिनांक: 2 8 मे, 2026.   मित्रांनो,             महाराष्ट्रात ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ अर्थात SIR प्रक्रिया, 30 जून 2026 पासून सुरू होत आहे.  म्हणूनच आजच्या ब्लॉगमध्ये आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.भारतात निवडणुका म्हणजे, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत अचूक असणे, अत्यंत महत्त्वाचे असते.याच पार्श्वभूमीवर Election Commission of India म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाने,‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ ( Special Intensive Revision – SIR) ही मोठ्या प्रमाणावर मतदार पडताळणी मोहीम सुरू केली आहे. सविस्तर: ही मोहीम अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जात असून , कोट्यवधी मतदारांच्या नोंदींची तपासणी केली जाणार आहे. अनेक नागरिकांसाठी ‘एसआयआर’ हा शब्द नवीन असला , तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया म्हणजे,मतदार याद्यांची सखोल साफसफाई आणि अद्ययावत नोंदी तयार करण्याचा प्रयत्न आहे. एसआयआर ( SIR) मोहीम सुरू करण्यामागचे कारण काय ? निव...

LDL अर्थात ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी कसे कराल?

  ब्लॉग नं. 2026/14 7 . दिनांक: 2 7 मे, 2026.   मित्रांनो, LDL अर्थात ‘ बॅड’ कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी करा हे 5 सोपे बदल आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण फिटनेस , प्रोटीनयुक्त आहार आणि वजन नियंत्रण,यावर भर देतो , पण शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळींकडे अनेकदा दुर्लक्ष करतो.विशेषतः LDL म्हणजेच ‘बॅड’ कोलेस्टेरॉल,वाढल्यास ते हृदयासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊन, रक्तप्रवाहाला  अडथळा जातो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका , स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.या विषयावर आहे, आजचा ब्लॉग. सविस्तर:    पूर्वी ही समस्या केवळ वयस्कर लोकांमध्ये दिसत होती , पण आजकाल तरुणांमध्येही वाढलेले कोलेस्टेरॉल सामान्य झाले आहे. चुकीचा आहार , ताणतणाव , व्यायामाचा अभाव आणि झोपेची कमतरता,ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे,योग्य जीवनशैली अंगीकारल्यास LDL कोलेस्टेरॉल, मोठ्या प्रमाणात कमी करता येते. यूकेतील प्रसिद्ध सर्जन Dr. Karan Rajan ,यांनी स्वतःच्या दिनचर्येत केलेले काही महत्त्वाचे बदल, शेअर केले आहे...

उन्हाळ्यातील 'स्मार्ट हायड्रेशन':

ब्लॉग नं. 2026/14 6 . दिनांक: 2 6 मे, 2026.   मित्रांनो, उन्हाळ्यातील ' स्मार्ट हायड्रेशन ': कडकडीत उन्हाळा सुरू झाला की , आपल्याला सतत तहान लागते. पण तुम्हाला माहीत आहे का ? उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवणे म्हणजे,केवळ भरपूर पाणी पिणे नव्हे , तर शरीरातील खनिजांचा समतोल राखणे होय.तीव्र उष्णतेवर मात करण्यासाठी,सध्या वैद्यकीय आणि पोषणतज्ञ ' स्मार्ट हायड्रेशन ' ( अधिक हुशारीने हायड्रेशन करणे) यावर भर देत आहेत. चला तर मग जाणून घेऊया , उन्हाळ्यात हायड्रेशन का महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी कोणते आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत. सविस्तर: 1 . डिहायड्रेशन: एक छुपा धोका : अनेकदा आपल्याला वाटतं,की तहान लागली नाही म्हणजे शरीरात पाणी पुरेसे आहे.पण वैद्यकीय तज्ञांच्या मते , तहान लागणे हे डिहायड्रेशनचे खूप उशिरा मिळणारे संकेत आहेत.आणि एका विशिष्ट वयानंतर ते मिळनासे होतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशन हा एक छुपा धोका बनून येतो , ज्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर होतो. ·         आकलन क्षमतेवर परिणाम: शरीरातील पाण्याच्या प्रमा...

रिजर्व बॅंकेने विक्रमी लाभांश सरकारला दिला

  ब्लॉग नं. 2026/145 अ दिनांक: 25 मे, 2026     मित्रांनो,             आज एक बातमी वाचनात आली की, देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडियाने,भारत सरकारला रु. 2.86 लाख कोटीचा लाभांश, ट्रान्सफर केला. 2014 ला एनडीएचे सरकार सत्तेत आल्यापासून, या ट्रान्सफरची माहिती व्हायला सुरुवात झाली. 1979 बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर Nationalised Bank नी देखिल, दर वर्षी लाभांश भारत सरकारला ट्रान्सफर केला.यांत गैर असं काही नव्हतं.कारण या बँकांची पूर्ण मालकी भारत सरकारची झाली होती.आणि लाभांशाच्या व्याख्येनुसार हा लाभांश,दर वर्षी भारत सरकारला ट्रान्सफर करण्यात येतो.यासाठी लाभांश या शब्दाची व्याख्या पाहू. " कोणत्याही कंपनीला किंवा संस्थेला वर्षभरात झालेल्या एकूण निव्वळ नफ्यापैकी ( Net Profit) जो हिस्सा ती आपल्या भागधारकांना ( Shareholders) किंवा मालकांना वाटप करते , त्याला ' लाभांश ' किंवा ' डिविडेंड ' असे म्हणतात."        रिजर्व बँकेतील भागधारक कोण? 100% भारत सरकार.त्यामुळे रिजर्व बँके...

सुंदर त्वचेसाठी महागडी क्रीम?

  ब्लॉग नं. 2026/14 5 . दिनांक: 2 5 मे, 2026.   मित्रांनो, सुंदर त्व चेसाठी महागडी क्रीम ? आजच्या काळात सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी , बाजारात असंख्य क्रीम्स , सीरम्स आणि महागडी स्किनकेअर उत्पादने उपलब्ध आहेत.सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या निर्दोष त्वचेचे फोटो पाहून , अनेकांना वाटते की , त्यामागे फक्त महागडी उत्पादने आणि लक्झरी ट्रीटमेंट्स असतील. पण वास्तव वेगळे आहे. खरं तर , चांगली त्वचा ही एखाद्या जादुई उत्पादनामुळे नव्हे , तर सातत्यपूर्ण सवयी , शिस्तबद्ध जीवनशैली आणि योग्य दिनचर्येमुळे मिळते. त्वचेची खरी काळजी ही बाहेरून लावल्या जाणाऱ्या उत्पादनांइतकीच , शरीराला दिलेल्या विश्रांतीत आणि नियमित सवयींमध्ये दडलेली असते. चला आज या विषयावर सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर:              सुंदर त्वचेसाठी फक्त क्रीमस् आणि इतर उत्पादने नव्हेत तर,खालील गोष्टींची गरज असते.     झोपेची कमतरता म्हणजे त्वचेचा शत्रू : रात्री उशिरापर्यंत जागरण करणे , हे त्वचेसाठी अत्यंत घातक ठरू शकते.अपुरी झोप घे...