ब्लॉग नं. 2026/153 . दिनांक: 2 जून , 2026. मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी ,' लो-कार्ब - हाय फायबर ' डाएट: एक सोपी रेसिपी , आजच्या धकाधकीच्या जीवनात , आरोग्य टिकवून ठेवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे.चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे वजन वाढणे , आळस आणि पचनाच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. यावर मात करण्यासाठी ' लो-कार्ब ' ( कर्बोदके कमी असलेले) आणि ' हाय-फायबर ' ( तंतुमय पदार्थ जास्त असलेले) अन्न घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज या ' लो-कार्ब ' ( कर्बोदके कमी असलेले) आणि ' हाय-फायबर ' ( तंतुमय पदार्थ जास्त असलेले) अन्नाविषयी सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये , अशाच एका आरोग्यदायी रेसिपीबद्दल माहिती दिली आहे , जी चवीला उत्तम तर आहेच , पण आरोग्यासाठीही वरदान ठरू शकते. लो-कार्ब आणि हाय-फायबर डाएटचे महत्त्व : जेव्हा आपण आपल्या आहारात कर्बोदकांचे ( Carbs) प्रमाण कमी करतो आणि फायबरचे ( Fiber) प्रमाण वाढवतो , तेव्हा शरीरात खालील बदल होतात , वजन नियंत्रण: कर्बोदके कमी घेतल्यामुळे शर...
ब्लॉग नं. 2026/14 7 . दिनांक: 2 7 मे, 2026. मित्रांनो, LDL अर्थात ‘ बॅड’ कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी करा हे 5 सोपे बदल आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण फिटनेस , प्रोटीनयुक्त आहार आणि वजन नियंत्रण,यावर भर देतो , पण शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळींकडे अनेकदा दुर्लक्ष करतो.विशेषतः LDL म्हणजेच ‘बॅड’ कोलेस्टेरॉल,वाढल्यास ते हृदयासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊन, रक्तप्रवाहाला अडथळा जातो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका , स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.या विषयावर आहे, आजचा ब्लॉग. सविस्तर: पूर्वी ही समस्या केवळ वयस्कर लोकांमध्ये दिसत होती , पण आजकाल तरुणांमध्येही वाढलेले कोलेस्टेरॉल सामान्य झाले आहे. चुकीचा आहार , ताणतणाव , व्यायामाचा अभाव आणि झोपेची कमतरता,ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे,योग्य जीवनशैली अंगीकारल्यास LDL कोलेस्टेरॉल, मोठ्या प्रमाणात कमी करता येते. यूकेतील प्रसिद्ध सर्जन Dr. Karan Rajan ,यांनी स्वतःच्या दिनचर्येत केलेले काही महत्त्वाचे बदल, शेअर केले आहे...