ब्लॉग नं. 2026/1 52 . दिनांक: 1 जून , 2026. मित्रांनो, आजच्या जगात नवनवे वेलनेस ट्रेंड्स , 10 ,000 स्टेप्सचे चॅलेंजेस आणि व्यायामाचे क्लिष्ट प्रकार , यामुळे फिटनेस नेमका कसा मिळवावा , याबद्दल गोंधळ उडणे साहजिक आहे.मात्र , द इंडिपेंडेंट प्रीमियम ( The Independent Premium) मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखाने , या सगळ्या गोंधळातून एक सोपा आणि व्यावहारिक मार्ग दाखवला आहे. या बद्दल सविस्तर जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: फिटनेस तज्ज्ञांच्या मते , आरोग्य सुधारण्यासाठी , तुम्हाला रोज तासनतास जिममध्ये घाम गाळण्याची किंवा फक्त ज्यूस पिऊन राहण्याची अजिबात गरज नाही.वास्तविक पाहता , जर तुम्ही दर आठवड्याला व्यायामाचे , फक्त तीन विशिष्ट प्रकार न चुकता केले , तर तुम्ही इतर सामान्य लोकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक तंदुरुस्त ( Fit) राहाल. तर मग , दर आठवड्याला करायच्या या तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या का महत्त्वाच्या आहेत ? चला सविस्तर जाणून घेऊया. 1 . रेसिस्टन्स (स्ट्रेंथ) ट्रेनिंग: आरोग्यासाठीची उत्तम ' पेन्शन ' जेव्हा लोक तंदुरुस्त होण्य...
ब्लॉग नं. 2026/145 अ दिनांक: 25 मे, 2026 मित्रांनो, आज एक बातमी वाचनात आली की, देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडियाने,भारत सरकारला रु. 2.86 लाख कोटीचा लाभांश, ट्रान्सफर केला. 2014 ला एनडीएचे सरकार सत्तेत आल्यापासून, या ट्रान्सफरची माहिती व्हायला सुरुवात झाली. 1979 बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर Nationalised Bank नी देखिल, दर वर्षी लाभांश भारत सरकारला ट्रान्सफर केला.यांत गैर असं काही नव्हतं.कारण या बँकांची पूर्ण मालकी भारत सरकारची झाली होती.आणि लाभांशाच्या व्याख्येनुसार हा लाभांश,दर वर्षी भारत सरकारला ट्रान्सफर करण्यात येतो.यासाठी लाभांश या शब्दाची व्याख्या पाहू. " कोणत्याही कंपनीला किंवा संस्थेला वर्षभरात झालेल्या एकूण निव्वळ नफ्यापैकी ( Net Profit) जो हिस्सा ती आपल्या भागधारकांना ( Shareholders) किंवा मालकांना वाटप करते , त्याला ' लाभांश ' किंवा ' डिविडेंड ' असे म्हणतात." रिजर्व बँकेतील भागधारक कोण? 100% भारत सरकार.त्यामुळे रिजर्व बँके...