Skip to main content

Posts

LDL अर्थात ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी कसे कराल?

  ब्लॉग नं. 2026/14 7 . दिनांक: 2 7 मे, 2026.   मित्रांनो, LDL अर्थात ‘ बॅड’ कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी करा हे 5 सोपे बदल आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण फिटनेस , प्रोटीनयुक्त आहार आणि वजन नियंत्रण,यावर भर देतो , पण शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळींकडे अनेकदा दुर्लक्ष करतो.विशेषतः LDL म्हणजेच ‘बॅड’ कोलेस्टेरॉल,वाढल्यास ते हृदयासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊन, रक्तप्रवाहाला  अडथळा जातो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका , स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.या विषयावर आहे, आजचा ब्लॉग. सविस्तर:    पूर्वी ही समस्या केवळ वयस्कर लोकांमध्ये दिसत होती , पण आजकाल तरुणांमध्येही वाढलेले कोलेस्टेरॉल सामान्य झाले आहे. चुकीचा आहार , ताणतणाव , व्यायामाचा अभाव आणि झोपेची कमतरता,ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे,योग्य जीवनशैली अंगीकारल्यास LDL कोलेस्टेरॉल, मोठ्या प्रमाणात कमी करता येते. यूकेतील प्रसिद्ध सर्जन Dr. Karan Rajan ,यांनी स्वतःच्या दिनचर्येत केलेले काही महत्त्वाचे बदल, शेअर केले आहे...

रूपयाच्या ढासळत्या मूल्याचे वास्तव

  ब्लॉग नं. 2026/144.        दिनांक: 24 मे, 2026.   मित्रांनो, काही दिवसांपासून , भारतीय रुपयाच्या ( INR) घसरत्या मूल्याबाबत,सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत,रुपया विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे , चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पण हा प्रश्न केवळ भारतापुरताच मर्यादित आहे का ? की जागतिक अर्थकारणाचा हा एक भाग आहे ? हे समजून घेण्यासाठी , आपण 2012 मधील आणि आजच्या ( 2026 मधील) , प्रमुख जागतिक चलनांच्या विनिमय दरांचा ( Exchange Rates), आजच्या ब्लॉगमध्ये एक तुलनात्मक अभ्यास करूया आणि रुपयावर पडलेल्या ताणाची वास्तविक कारणे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सविस्तर:             गेल्या तीन चार महिन्यांपासून चाललेल्या आखातातील संघर्षाचा,परिणाम म्हणादुष्परिणाम म्हणा, केवळ भारतावर नाही तर जागतिक अर्थकारणावर याचा परिणाम झाला आहे.अर्थशास्त्रात इतर परिस्थिति समान असतांना , असं गृहीत धरून सिद्धांत मांडले गेले आहेत,जी परिस्थिति कधी समान असू शकत नाही.आणि आता ती फारच बिघडलेली आहे,ज...

गाऊट आणि सांधेदुखीसाठी कोणते पदार्थ कारणीभूत

ब्लॉग नं. 2026/14 3 . दिनांक: 2 3 मे, 2026. मित्रांनो, गाऊट आणि सांधेदुखी साठी कोणते पदार्थ कारणीभूत: आजच्या धकाधकीच्या जीवनात सांधेदुखी , पायाच्या अंगठ्यात सूज , चालताना त्रास किंवा अचानक तीव्र वेदना , अशा समस्या अनेकांना जाणवू लागल्या आहेत.यामागे फक्त वय किंवा व्यायामाचा अभाव कारणीभूत नसतो , तर आपल्या आहाराचाही मोठा वाटा असतो. अलीकडेच यासंबंधात एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यात आला. त्यामध्ये काही अन्नपदार्थ गाऊट आणि सांधेदुखी वाढवू शकतात , असे सांगण्यात आले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर:   गाऊट म्हणजे नेमके काय ? गाऊट हा एक प्रकारचा संधिवात ( Arthritis) आहे. शरीरात युरिक अॅसिड जास्त प्रमाणात वाढल्यास , त्याचे स्फटिक सांध्यांमध्ये जमा होतात आणि त्यामुळे तीव्र वेदना , सूज आणि जळजळ निर्माण होते. विशेषतः पायाचा अंगठा , गुडघे , घोटे आणि बोटांच्या सांध्यांमध्ये हा त्रास अधिक जाणवतो. खालील 8 अन्नपदार्थ ठरू शकतात धोकादायक : 1 . लाल मांस ( Red Meat) : मटण , बीफ किंवा प्रोसेस्ड मांसामध्ये पुरिन जास्त असते. पुरिनमुळे शरीरात युरिक अॅसिड वाढते आणि गाऊटचा धोका वाढू शकतो....

उपवास: विज्ञानाने सिद्ध केलेली प्राचीन 'डिटॉक्स' पद्धत

  ब्लॉग नं. 2026/142. दिनांक: 22 मे, 2026.   मित्रांनो, उपवास: आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेली प्राचीन ' डिटॉक्स ' पद्धत हजारो वर्षांपासून विविध संस्कृतींमध्ये उपवास पाळला जातो.पूर्वी याला धार्मिक अधिष्ठान होते , पण आता जगभरातील शास्त्रज्ञ , याला ' डिटॉक्स हॅक ' (Detox Hack) म्हणून पाहत आहेत.पण नक्की उपवास केल्याने शरीरात काय बदल होतात ? विज्ञानाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे ? आजच्या ब्लॉगमधून सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: 1 . ऑटोफॅगी ( Autophagy): शरीराची स्वतःची स्वच्छता मोहीम : उपवासाचा सर्वात मोठा वैज्ञानिक फायदा म्हणजे ' ऑटोफॅगी '. जेव्हा आपण काही काळ अन्न घेत नाही , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी , स्वतःच्याच खराब झालेल्या पेशी आणि प्रथिनांचा पुनर्वापर करू लागते.सोप्या भाषेत सांगायचे तर , शरीर स्वतःचीच ' स्वच्छता ' (Cellular Cleaning) करते , ज्यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो. 2 . पचनसंस्थेला विश्रांती आणि डिटॉक्सिफिकेशन : आपली पचनसंस्था चोवीस तास कार्यरत असते.उपवासामुळे या संस्थेला आवश्यक विश्रांती मिळते. शरीरातील विषारी द्रव्ये ( T...

ऑटोइम्यून आजार म्हणजे काय?

  ब्लॉग नं. 2026/141. दिनांक: 21 मे, 2026.   मित्रांनो, ऑटोइम्यून डिसीज , ( Autoimmune Disease) ही आजच्या काळातील एक गुंतागुंतीची आरोग्य समस्या बनली आहे. जेव्हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चुकून , आपल्याच निरोगी पेशींवर हल्ला करू लागते , तेव्हा या आजाराची सुरुवात होते.अनेकदा याची लक्षणे इतकी सामान्य असतात की , आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.अलीकडेच 'Espresso' या प्रसिद्ध चॅनेलने , एका व्हिडिओद्वारे अशा 5 शारीरिक बदलांबाबत सतर्क केले आहे , जे ऑटोइम्यून डिसीजचे संकेत असू शकतात. या व्हिडिओवर आधारित सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमधून उपलब्ध करून देत आहे. सविस्तर: ऑटोइम्यून आजार म्हणजे काय ? सामान्यतः आपली रोगप्रतिकारशक्ती , विषाणू आणि जीवाणूंशी लढते. परंतु ऑटोइम्यून स्थितीत , शरीर स्वतःच्याच अवयवांना ' शत्रू ' समजते.यामुळे शरीरात जुनाट जळजळ ( Inflammation) निर्माण होते , ज्याचा परिणाम सांधे , त्वचा आणि अंतर्गत अवयवांवर होऊ शकतो. 5 महत्त्वाचे बदल जे तुम्ही ओळखायला हवेत ; 1 . सतत जाणवणारा थकवा ( Chronic Fatigue) : पुरेशी झोप घेऊनही , जर तुम्हाला दिवसभर गळ...

बडीशोपेचे पाणी एक महिना प्या

  ब्लॉग नं. 2026/140. दिनांक: 20 मे, 2026.   मित्रांनो, बडीशेप , ज्याला आपण सामान्यतः शोप   म्हणून ओळखतो , ती प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक अविभाज्य भाग आहे.जेवणानंतर मुखवास म्हणून असो किंवा भाजीची चव वाढवण्यासाठी , बडीशेप नेहमीच आघाडीवर असते.अनेक घरांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी बडीशेपेचे पाणी पिण्याची परंपरा आहे.लोकांचा असा विश्वास आहे की यामुळे पोट शांत होते , वजन कमी होते आणि झोपही चांगली लागते. पण , जर तुम्ही सलग एक महिना दररोज रात्री बडीशेपेचे पाणी प्यायले , तर तुमच्या शरीरात खरोखरच काही सकारात्मक बदल होतात का ? तज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनानुसार याचे उत्तर काय आहे , ते आज आपण या ब्लॉगमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: बडीशेप हा काही एखादा रात्रीत चमत्कार करणारा उपाय नाही , पण तिच्यात अँटीऑक्सिडंट्स , फायबर आणि आवश्यक तेले ( Essential Oils) भरपूर प्रमाणात असतात.आरोग्य शास्त्रज्ञांच्या मते , बडीशेपमध्ये दाहशामक , आकुंचनरोधक  आणि सूक्ष्मजीवविरोधी  गुणधर्म असतात. यामुळेच आतड्यांच्या आणि पोटाच्या आरोग्यासाठी पारंपरिक काळापासून तिचा वापर केला जात ...

कमी झोप घेताय? तर तुम्ही आरोग्याशी खेळत आहात.

  ब्लॉग नं. 2026/13 9 . दिनांक: 1 9 मे, 2026.   मित्रांनो, ' स्लीप डेब्ट ': 6 तासांपेक्षा कमी झोप घेताय ? तर तुम्ही आरोग्याशी खेळत आहात आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत , कामाचा प्रचंड ताण असणे , हे जणू अभिमानाचे लक्षण मानले जाते."मी तर फक्त 5 -6 तासांच्या झोपेवर अगदी आरामात काम भागवतो ," असे सांगणारे लोक आपल्याला आजूबाजूला सर्रास भेटतात. रात्री उशिरापर्यंत जागून डेडलाइन्स पूर्ण करणे , डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि तीव्र डोकेदुखी घेऊन , कॉफीच्या मदतीने दिवस ढकलणे , ही अनेकांची रोजची दिनचर्या झाली आहे. पण ज्याला आपण ' उत्पादकता ' (Productivity) समजतो , ती प्रत्यक्षात आपल्या शरीराला आतून पोखरत आहे. नवीन संशोधनातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे , सातत्याने 6 तासांपेक्षा कमी झोप घेणे म्हणजे , केवळ सुस्ती येणे नव्हे , तर शरीराच्या अनेक महत्त्वाच्या यंत्रणा कोलमडून पडणे होय. या संबंधी सविस्तर जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.     सविस्तर: अपुऱ्या झोपेचा शरीरावर होणा रे 5 गंभीर परिणाम:           ...