ब्लाॅग नं.2026/123. दिनांकः 3 मे, 2026. मित्रांनो , ग्रेट निकोबार प्रकल्प : पर्यावरण आणि राष्ट्रीय सुरक्षेचा समतोल साधणारा,भारताचा हा निर्णायक टप्पा आहे , असं म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही.पण मोदी सरकारच्या धोरणाला नव्हे,तर देशहिताच्या आणि देशाच्या सुरक्षिततेच्या प्रत्येक मुद्द्याला विरोध करायचा,हे व्रत हाती घेतलेल्या लोकांनी,यांस पर्यावरणाच्या आडून विरोध सुरु केला आहे.या प्रकल्पाविषयी जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमधून. सविस्तरः भारताच्या विकासयात्रेत काही प्रकल्प असे आहेत , जे फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामरिक , भूराजकीय आणि भविष्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ग्रेट निकोबार प्रकल्प हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे.अलीकडे या प्रकल्पावर राजकीय स्तरावर चर्चा रंगली आहे.काहींनी पर्यावरणीय कारणांवरून विरोध दर्शवला , तर माजी वायुसेना प्रमुखांनी,या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत,स्पष्टपणे सांगितले की , भारतासाठी हा प्रकल्प केवळ विकास नव्हे,तर हिंद महासागरातील भारताची सामरिक उपस्थिती मजबूत करणारा टप्पा आहे. ग्रेट निकोबार कुठे आहे आणि का महत्त्वा...
ब्लॉग नं.2026/116 दिनांक: 26 एप्रिल 2026. मित्रांनो , आजच्या काळात ' व्हिटॅमिन डी ' (Vitamin D) हे आरोग्याच्या जगातील सर्वात लाडकं सप्लिमेंट बनलं आहे. हाडे मजबूत करणे , रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि मन:स्थिती सुधारणे यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः भारतीयांमध्ये याची मोठी कमतरता आढळते , त्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ हे सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात. परंतु , " अति तिथे माती" ही म्हण व्हिटॅमिन डीच्या बाबतीतही खरी ठरते. गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी घेणे तुमच्या जीवावर बेतू शकते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण या विषयावर सविस्तर चर्चा करूया. सविस्तर: ⚠️ व्हिटॅमिन डी इतर व्हिटॅमिन्सपेक्षा वेगळे का आहे ? व्हिटॅमिन सी सारखी जीवनसत्त्वे पाण्यात विरघळणारी असतात , जी शरीराबाहेर सहज टाकली जातात. मात्र , व्हिटॅमिन डी हे चरबी-विद्राव्य ( Fat-soluble) आहे. याचा अर्थ असा की,ते शरीरातील पेशींमद्धे ( Tissues) जमा होते.ते सहजपणे शरीराबाहेर पडत नाही.कालांतराने याची पातळी धोकादायक मर्यादेपर्यंत वाढू शकते.सूर्यप्रकाश किंवा अन्नातून व्हिटॅमिन ...