ब्लॉग नं. 2026/120. दिनांक:- 30 एप्रिल ,2026. मित्रांनो , मधुमेह आहे म्हणून केळी खाणे बंद के लं य ? डॉक्टरांचा हा सल्ला एकदा नक्की वाचा! अनेकदा मधुमेह ( Diabetes) झाला की,रुग्ण सर्वात आधी गोड फळं आणि विशेषतः केळी खाणं बंद करतात.केळी खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते , हा समज सर्वत्र पसरलेला आहे.पण , खरंच मधुमेहींनी केळी पूर्णपणे टाळली पाहिजेत का ? नुकतंच अंतःस्राव तज्ज्ञ ( Endocrinologist) आणि मधुमेह तज्ज्ञांनी,या विषयावर अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.चला तर मग जाणून घेऊया , मधुमेहामध्ये केळी खाण्याचे नेमके नियम काय आहेत. सविस्तर: 1 . केळी पूर्णपणे टाळण्याची गरज नाही : तज्ज्ञांच्या मते , फळांमधील नैसर्गिक साखर,ही प्रक्रिया केलेल्या साखरेपेक्षा ( Processed Sugar) वेगळी असते. केळी पूर्णपणे बंद करण्याऐवजी,त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे जास्त महत्त्वाचं आहे.संपूर्ण फळ खाल्ल्याने,शरीराला आवश्यक फायबर मिळतं , जे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतं. 2 . फळांचा ' ग्लायसेमिक इंडेक्स ' (GI) आणि प्रमाणाचे महत्त्व : मधुमेहींनी फळं निवडताना,त्याचा ग्लायसेमिक इंडेक्...
ब्लॉग नं. 2026/11 3 , दिनांक: 2 3 एप्रिल, 2026. मित्रांनो, थकवा आणि केसगळतीकडे दुर्लक्ष करताय ? आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सतत थकवा जाणवणे , सकाळी उठल्यावरही उत्साह न वाटणे किंवा अचानक केस गळायला लागणे , या गोष्टी सामान्य वाटू शकतात.पण याला ' वर्क स्ट्रेस ' किंवा ' बदलता ऋतू ' म्हणतो. पण खरं तर , तुमचे शरीर तुम्हाला आतून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.बघू या,देशात करण्यात आलेले एक सर्वेक्षण काय सांगतंय. संविस्तर: भारतातील एका मोठ्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की , अगदी सकस आहार घेणाऱ्यांमध्येही व्हिटॅमिन बी 12 , व्हिटॅमिन डी आणि लोहाची ( Iron) मोठी कमतरता आढळत आहे. ही कमतरता शांतपणे तुमच्या शरीराचे नुकसान करत असते. पोषक तत्वांची ' मूक ' भूमिका: का आहे ही कमतरता घातक ? जेव्हा या तीन घटकांची पातळी खालावते , तेव्हा शरीर हळूहळू संकेत देऊ लागते: व्हिटॅमिन बी 12: हे मज्जातंतूंचे आरोग्य आणि मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे विसरभोळेपणा , हात-पायांना मुंग्या येणे आणि प्रचंड मानसिक थकवा ज...