ब्लॉग नं. 2026/114 दिनांक: 24, एप्रिल 2026. मित्रांनो , अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे आणि चक्कर ? दैनंदिन धावपळीत अनेकदा , आपल्याला अचानक डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटतं किंवा चक्कर ( Dizziness) येते.कधीतरी असं होणं सामान्य असलं , तरी वारंवार होणारी ही ' अंधारी ' ,शरीरातील एखाद्या मोठ्या बदलाचे संकेत असू शकते.आजच्या या लेखात आपण ही लक्षणे का जाणवतात आणि त्यावर घरगुती व आयुर्वेदिक उपाय काय आहेत , हे सविस्तर जाणून घेऊया. सविस्तर: 🩺 ही लक्षणे का जाणवतात ? ( वैद्यकीय कारणे) जेव्हा आपल्या मेंदूला किंवा डोळ्यांना होणारा रक्तपुरवठा , ऑक्सिजन किंवा ऊर्जेचा पुरवठा विस्कळीत होतो , तेव्हा शरीर आपल्याला चक्करीच्या स्वरूपात इशारा देते. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत: · रक्तदाबातील चढउतार ( Low BP): रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे,मेंदूपर्यंत रक्त योग्य प्रमाणात पोहोचत नाही , ज्यामुळे डोळ्यासमोर अंधारी येते. · रक्तातील साखर कमी होणे ( Hypoglycemia): दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे,मेंदूला मिळणार...
ब्लॉग नं. 2026/108 दिनांक: 18, एप्रिल 2026. मित्रांनो , 🍼 बाळाच्या आहारात मीठ आणि साखर: कधी द्यावी , कधी टाळावी ? तुमच्या घरांत कुणी 1 वर्ष किंवा 2 वर्षाचे, मुलाचे/मुलीचे, स्वतःचे,नवजात बाळ असेल, तर आजचा ब्लॉग अवश्य वाचा.नवजात बाळाच्या आहाराबाबत पालकांमध्ये अनेक प्रश्न असतात.त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, “बाळाला मीठ आणि साखर कधी द्यावी ?” पोषणतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांचे एकमत असे आहे की, 1. वर्षापर्यंत बाळाला मीठ देऊ नये, 2. वर्षांपर्यंत बाळाला साखर (विशेषतः अतिरिक्त साखर) देऊ नये. या मागील वैज्ञानिक कारणे आणि योग्य मार्गदर्शन,आपण आजच्या ब्लॉगमध्ये समजून घेऊया. सविस्तर: 1. वर्षापर्यंत मीठ का टाळावे ? 1. बाळाची किडनी (मूत्रपिंड) अजून विकसित होत असतं, लहान बाळाची किडनी पूर्ण विकसित नसते. त्यामुळे जास्त मीठ (सोडियम) शरीरावर ताण आणू शकते. 2. नैसर्गिक अन्नातून पुरेसे सोडियम मिळते, आईचं दूध , फॉर्म्युला दूध , डाळ , भात , भाज्या यामध्ये नैसर्गिकरित्या सोडियम असते. त्यामुळे वेगळे मीठ घालण्याची गरज नसते. 3. भविष्...