Skip to main content

Posts

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

हिमोग्लोबिन वाढवणारे भारतीय अन्नपदार्थ

  ब्लॉग नं. 2026/0 73.  दिनांक: 14 मार्च , 2026 .   मित्रांनो , नैसर्गिक पद्धतीने हिमोग्लोबिन वाढवणारे भारतीय अन्नपदार्थ आजकाल अनेक लोकांमध्ये हिमोग्लोबिन कमी होणे (अ‍ॅनिमिया) ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.थकवा येणे , चक्कर येणे , हात-पाय थंड पडणे , लक्ष केंद्रित न होणे अशी लक्षणे दिसू लागतात.शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन नसल्यास रक्ताद्वारे ऑक्सिजन योग्य प्रकारे शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचत नाही.आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय स्वयंपाकघरात असे अनेक नैसर्गिक पदार्थ आहेत जे नियमित आहारात घेतल्यास हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करू शकतात. चला , अशाच काही प्रभावी पदार्थांविषयी आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया. सविस्तर: 1 . पालक – लोह आणि फोलेटचा समृद्ध स्रोत : पालक हा नॉन-हीम आयर्न आणि फोलेट चा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. हे दोन्ही घटक शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.भारतीय परंपरेत पालक बनवताना,त्यात लिंबाचा रस किंवा टोमॅटो घालण्याची पद्धत आहे. यामागे वैज्ञानिक कारण आहे. लिंबू आणि टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन C शरीराला पालक...

उभं राहून पाणी प्यायल्याने काय होतं?

ब्लाॅग नं.2026/072. दिनांकः 13 मार्च, 2026. मित्रांनो , मी देखिल हे बऱ्याच वेळा ऐकले आहे,आणि मला असं वाटतं, मी यावर एक ब्लॉग देखिल लिहिलाय की,उभं राहून पणी पिऊ नये. आजच्या ब्लॉगमधून आपण हे जाणून घेणार आहोत की,उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघे निकामी होतात का ? सत्य काय आणि विज्ञान म्हणतंय. सविस्तरः आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी किमान एकदा तरी, आई किंवा आजीचा ओरडा खाल्ला असेल,"अरे , उभं राहून पाणी नको पिऊ , गुडघे दुखतील!" त्यावेळी आपण निमूटपणे बसून पाणी प्यायलो , पण मनात नेहमी एक प्रश्न राहिला की , पाणी तर पोटात जातं , मग त्याचा गुडघ्यांशी काय संबंध ? हो ना, चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण यामागील वैज्ञानिक सत्य , आयुर्वेदाचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक बाजू सविस्तर समजून घेऊया. 1. विज्ञानाचा दृष्टिकोन: गुडघेदुखी आणि पाणी ( The Science) : सर्वात महत्त्वाचा प्रश्न: उभं राहून पाणी प्यायल्याने थेट गुडघेदुखी होते का ? आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार ( Modern Science), उभं राहून पाणी पिणे आणि गुडघेदुखी,यांचा थेट संबंध जोडणारा कोणताही ठोस वैद्यकीय पुरावा किंवा '...

पीनट बटर प्रमाणात खाल्यास फायदेशीर

  ब्लॉग नं. 2026/071 दिनांकः 12  मार्च , 2026.   मित्रांनो , कॅलरीजमुळे बरेच लोक पीनट बटरचे सेवन करत नाहीत.परंतु आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की , संयम असणे महत्त्वाचे आहे आणि पीनट बटर कमी प्रमाणात सेवन करणे , हे संतुलित आहाराचा एक निरोगी भाग असू शकते.एक चमचा पीनट बटर ऊर्जा देते , स्नायूंच्या आरोग्यास मदत करते आणि एकूणच आरोग्य राखण्यास मदत करणारे पोषक तत्वे प्रदान करते. पीनट बटरविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. सविस्तर:    शेंगदाणेच निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅटने समृद्ध असतात , जसे की काजू आणि बियांमध्ये आढळणारे प्रकार,जे बहुतेकदा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायद्यांशी जोडले जातात. या फॅट्समधील प्रथिने आणि फायबर शरीराला जास्त काळ ताजेतवाने ठेवतात आणि भूक लागण्यापासून रोखतात.दिल्ली येथील फेलिक्स ग्लोबलच्या वरिष्ठ क्लिनिकल न्यूट्रिशन स्पेशालिस्ट,डॉ.राधिका मेहता म्हणाल्या की,नियंत्रित प्रमाणात खाल्ल्यास पीनट बटर,हा एक निरोगी स्नॅकिंग पर्याय आहे.“एक चमचा पीनट बटर,निरोगी चरबी , प्रथिने आणि आवश्यक सूक्ष्म पोषक घटक प्रदान करतो,जे ऊर्जा पातळी नियंत्रित करतात , हृद...

वय वाढतंय… पण शक्ती कमी होतेय कां?

  ब्लॉग नं. 2026/0 71.  दिनांक: 12 मार्च , 2026 .   मित्रांनो , वय वाढतंय… पण शक्ती का कमी होतेय ? आपण नियमित चालता , व्यायाम करता , “ हेल्दी” खाता , सप्लिमेंट्सही घेता… तरीही शरीरात सतत अशक्तपणा जाणवतो ? खुर्चीतून उठताना हातांचा आधार घ्यावा लागतो ? जिने चढताना दम लागतो ? तर कदाचित हे फक्त “वय” नाही. ही असू शकते सार्कोपेनिया — वयानुसार होणारी स्नायूंची झपाट्याने घट.ज्या बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत,आजच्या ब्लॉगमध्ये.     सविस्तर 🧬 सार्कोपेनिया म्हणजे नेमकं काय ? सार्कोपेनिया म्हणजे, वयानुसार स्नायूंचा आकार आणि ताकद कमी होणे. साठीनंतर ही प्रक्रिया अधिक वेगाने होते.स्नायूंचे सूक्ष्म तंतू तुटतात आणि योग्य पोषण नसेल तर ते पुन्हा मजबूत होत नाहीत.याचा परिणाम म्हणजे, खुर्चीतून उठताना त्रास, सामान उचलताना कमजोरी, संतुलन बिघडणे आणि पडण्याचा धोका वाढणे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे — ही प्रक्रिया थांबवता येते , आणि काही प्रमाणात उलटवता ( Reverse ) देखील येते. 🚫 सकाळी टाळावेत असे 5 पदार्थ: 1️ ⃣ पांढरी ब्रेड: पांढरी ब्रेड ( White Bread ) शरीरा...

मधुमेहाबद्दलचे पाच मोठे गैरसमज आणि सत्य

ब्लॉग नं. 2026/069 दिनांकः 10 मार्च , 2026.   मित्रांनो , मधुमेहाबद्दलचे पाच मोठे गैरसमज आणि सत्य यावर्षी 14 नोव्हेंबरला,साजरा होणाऱ्या जागतिक मधुमेह दिनाची थीम आहे , “मधुमेह आणि कल्याण”. या थीमचा मुख्य संदेश असा आहे की,मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ रक्तातील साखरेची पातळी तपासण्यापुरते मर्यादित नसून , संतुलित , निरोगी आणि शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारणे तितकेच महत्त्वाचे आहे.आजच्या ब्लॉग मध्ये हे सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर:   आज जगभरात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.तरीही या आजाराबद्दल अनेक मिथक (गैरसमज) समाजात खोलवर रुजलेले आहेत.या गैरसमजांमुळे अनेक वेळा रुग्ण गोंधळून जातात , चुकीचे निर्णय घेतात किंवा योग्य उपचार सुरू करण्यास उशीर करतात. एंडोक्राइनोलॉजीचे तज्ज्ञ डॉ. हिमांशू शर्मा यांनी मधुमेहाबद्दलचे काही सामान्य गैरसमज स्पष्ट केले आहेत.चला , त्यातील पाच प्रमुख मिथक आणि त्यामागील सत्य समजून घेऊया. 1. गैरसमज: साखर खाल्ल्यानेच मधुमेह होतो: अनेकांना वाटते की,साखर खाल्ल्यामुळेच मधुमेह होतो.परंतु प्रत्यक्षात हे पूर्ण सत्य नाही. विशेषतः टाइप 2  मधुमेह,हा अनेक घटक...