Skip to main content

Posts

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

रक्त तपासणीसाठी सुया लागणार नाहीत

ब्लॉग नं: 2025/173. दिनांक: 23 जून , 2025.   मित्रांनो ,             आपल्याला ठराविक अवधि नंतर हेल्थ रिपोर्ट घ्यावे लागतात.या हेल्थ रिपोर्ट रक्ताचे sample घेतांना दंडात सुई टोचून रक्त घेतले जाते.रक्त घेणाऱ्याचा हात हलका असेल तर, त्याचा त्रास होत नाही.हात जड असल्यास वेदना होतात. काही वेळा नस न सापडल्याने तो ट्रायल आणि एरर पद्धतीने विविध ठिकाणी सुई डोकहून रक्त घेण्याचा प्रयत्न करतो,हे सारं त्रासदायक असतं,त्यामुळे रक्त तपासणीसाठी रुग्णालयात जाणे, म्हणजे अनेकांसाठी भीतीदायक अनुभव ठरतो. पण जर रक्त काढण्याची गरजच उरली नाही , तर ? हो आजचा ब्लॉग या विषयावर आधारित आहे. सविस्तर: हैदराबादच्या निलोफर हॉस्पिटलने,भारतातील पहिले एआय-आधारित , नॉन-इनवेसिव्ह म्हणजे सुई न टोचता,रक्त निदान साधन तयार केले आहे. ‘अमृत स्वस्थ भारत’ नावाचा हा नवा तंत्रज्ञान चमत्कार,केवळ एका सेल्फीद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी करू शकतो. तंत्रज्ञान कसे कार्य करते ? या प्रक्रियेचा आधार म्हणजे फोटोप्लेथिस्मोग्राफी ( PPG) तंत्रज्ञान.सोप्या भाषेत , हे तंत्र त्...

एअर कंडिशनर बाबत केंद्राचे नवे धोरण

ब्लॉग नं: 2025/172 . दिनांक: 22 जून , 2025.   मित्रांनो , कधी तरी तुम्ही आणि तुम च्या घरातील सदस्य किंवा जोडीदार,यांच्यात एसीच्या तापमानावरून वाद झाला असेल. टीम 18 °C च्या सदस्यांना थंडगार वातावरण हवे असते , तर टीम 24 °C ला सौम्य थंडावा हवा असतो. मात्र , लवकरच हे "शीतयुद्ध" संपुष्टात येऊ शकते.कारण केंद्र सरकार संपूर्ण भारतात,एसी तापमानाचे नियमन लागू करण्याची योजना आखत आहे.आजचा ब्लॉग या विषयावर आहे. सविस्तर: सरकारचा प्रस्ताव आणि त्यामागील कारणे: नवीन प्रस्तावानुसार , एसीचे आता 20 °C पेक्षा कमी किंवा 28 °C पेक्षा जास्त तापमान सेट करता येणार नाही.सरकारचा हेतू कोणाच्या झोपेची काळजी घेणे नसून वीज बचतीचा आहे.2010 पासून,भारतात एसी वापरणाऱ्या घरांची संख्या तिप्पट झाली आहे.परिणामी , विजेची मागणीही 20% ने वाढली आहे. भारतात सध्या थंड होण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचे प्रमाण एकूण विजेच्या 10% इतके आहे. एसी तापमान आणि ऊर्जा बचत: एसी तापमान 24-26 °C दरम्यान ठेवले तर वीजेची बचत होऊ शकते.तापमान 20 °C वरून 24 °C पर्यंत वाढवल्यास वीज वापर 24% पर्यंत कमी होतो. यामुळे ग्राहकांचे...

उच्च रक्तदाबाचा डोळ्यांवर होणारा परिणाम

ब्लॉग नं: 2025/171 . दिनांक: 21 जून 2025.   मित्रांनो, लोक सहसा उच्च रक्तदाबाचा संबंध,हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकशी जोडतात.परंतु फार कमी लोकांना हे कळते की, उच्च रक्तदाब त्यांच्या दृष्टीलाही शांतपणे नुकसान पोहोचवू शकतो.किरकोळ दृष्टी धूसर होण्यापासून,ते अचानक डोळ्यांच्या झटक्यांपर्यंत , उच्च रक्तदाबाचे डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात जे बहुतेकदा कायमचे होईपर्यंत दुर्लक्षित राहतात.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे.   सविस्तर: नवी दिल्लीतील नेट्रा आय सेंटरमधील सल्लागार आणि नेत्र शल्यचिकित्सक डॉ. प्रियांका सिंग (एमबीबीएस , एमएस , डीएनबी , एफएआयसीओ) यांनी रक्तदाब आणि डोळ्यांच्या आरोग्यामधील विशेष माहित नसलेल्या परंतु गंभीर दुव्यावर भर दिला.त्यांनी उच्च रक्तदाब पातळी,तुमच्या दृष्टीवर कसा परिणाम करू शकते हे उघड केले आहे. 1. अंधुक किंवा अस्थिर दृष्टी: उच्च रक्तदाब रेटिनाच्या नाजूक रक्तवाहिन्यांना प्रभावित करू शकतो , ज्यामुळे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी नावाची स्थिती निर्माण होते.यामुळे अंधुकपणा , काळे डाग किंवा अगदी प्रकाशाच्या चमकासारखे   दृश्यमान अडथळे निर्...

आजकाल अनेक पुरुष अविवाहित रहाणे का स्वीकारतात?

ब्लॉग नं: 2025/170 दिनांक: 20 जून , 2025.   मित्रांनो , पूर्वी , भारतीय पुरुषांच्या आयुष्यात लग्न हा अंतिम टप्पा मानला जात असे.तो एक कर्तव्य , एक जबाबदारी , प्रौढत्वाचा एक शिक्का असे. पण आता हा प्रवास म्हणा,प्रवाह बदलत चालला आहे. विशेषतः 20 ते 30 या वयोगटातील पुरुष , लग्नाऐवजी अविवाहित राहण्याचा पर्याय निवडत आहेत. हे बंडखोरीसारखे नाही तर आत्मचिंतन आणि स्व-जागरूकतेचा भाग आहे. हे प्रेमापासून पळणे नाही,तर अवास्तव अपेक्षांपासून आणि मानसिक ताणांपासून स्वत:चा बचाव करण्याचा एक प्रयत्न आहे.आजचा ब्लॉग या विषयाला समर्पित आहे. सविस्तर:             भारतीय पुरुषांवर अपेक्षांचे वाढलेले ओझे, गैरसमज होण्याची भीती,आर्थिक ताण, तुटत चाललेली घरे, सासू सासऱ्यांच्या सोबत तणाव आणि भावनांना मोकळे करण्यासाठी जागा नसणे या गोष्टी यामुळे पुरुष , लग्नाऐवजी अविवाहित राहणे पसंत करत आहेत. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.               1. अपेक्षांचे वजन: भारतीय कुटुंबांमध्ये मुलगा जन्माला येताच,त्याच्यावर कर्तव्ये ल...

मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी काय कराल?

ब्लॉग नं: 2025/169 दिनांक: 19 जून , 2025.   मित्रांनो , शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच , आपल्या मेंदूलाही नियमित काळजी आणि व्यायामाची गरज असते. बदलत्या जीवनशैलीत मेंदूचे आरोग्य राखणे अत्यावश्यक बनले आहे.दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंघला यांच्या मते , जीवनशैलीतील सकारात्मक बदल , मानसिक व्यायाम , आणि निरोगी सवयींच्या संयोजनाद्वारे मेंदूचे कार्य सुधारता येते. आजचा ब्लॉग याच विषयावर आहे. सविस्तर:           मेंदूच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी सहा महत्त्वाचे मार्ग डॉ. सिंघला यांनी सुचविले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत; 1. नियमित व्यायाम करा:         दररोज चालणे , सायकलिंग किंवा पोहणे यासारख्या मध्यम-तीव्रतेच्या एरोबिक व्यायामामुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो आणि न्यूरोप्लास्टिकिटीला प्रोत्साहन मिळते. हे संज्ञानात्मक कार्य वाढवून मेंदूची कार्यक्षमता वाढवते. 2. पर्याप्त झोप घ्या: स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी आणि मेंदूला पुनरुज्जीवित करण्यासाठी दररोज रात्री 7 ते 9 तास झोप घेणे आ...