ब्लॉग नं 2025/02 7 दिनांक:- 2 7 January, 2025. मित्रांनो , भारतातील वाढलेल्या सरासरी आयुष्यमानावर मी काही दिवसांपूर्वीच एक ब्लॉग लिहिला होता. पण या वाढलेल्या आयुष्यमानासोबत आरोग्याच्या समस्या अर्थात आजार देखिल वाढले आहेत.मधुमेह आणि उच्च रक्तदाब,हृदय विकार या समस्या पूर्वीसारख्या पन्नाशी,साठीतल्या समस्या राहिलेल्या नसून तिशी,चाळीशीत देखिल जाणवू लागल्या आहेत.आणि आजकाल कुठल्याही आजाराचे निदान हे टेस्ट केल्याशिवाय होत नाही म्हणा किंवा केले जात नाही. कारण पेशंटमध्ये वाढलेली न्याय,अन्यायाची जागरूकता. लगेच उठून डॉक्टरांशी मारामारी करण्यापर्यन्त मजल गेली आहे.अशा वेळेस योग्य आणि अचूक निदान होण्यासाठी काही चाचण्या/टेस्ट करणे गरजेचे होऊन बसते. या सोबतच आपण स्वतःहून या टेस्ट करून घेतल्या तर काय वाईट. म्हणून बरेच जण अशा व्यापक वार्षिक आरोग्य तपासण्या ( Comprehensive Annual Health Test ) करून घेत असतात. मी देखिल त्यातील एक. आज आपण या व्यापक वार्षिक आरोग्य तपासण्याबद्दल जाणून घेणार आहोत. ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .