ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
Blog No.2023/1 96 Date:- 2 8 th , J uly, 2023. मित्रांनो , अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा एक सर्वांगसुंदर चित्रपट “ अभिमान. ” आज हा चित्रपट रिलीज होऊन 50 वर्षे झाली. 27 जुलै,1973 या तारखेला हा चित्रपट रिलीज झाला.त्याला व्यावसायिक यश सर्वसाधारण मिळालं, जे अपेक्षित होतं.कारण गल्लाभरु क्राऊड किंवा तेव्हाच्या थर्ड क्लास मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नव्हताच. एक साधी,सोपी,सरळ कहाणी होती. ना मारामारी, ना हिंसक दृश्ये, ना उत्तान नृत्ये हे काहीच नव्हतं.माझ्या काही टॉप चित्रपटाच्या यादीतील वरच्या नंबरचा हा चित्रपट.त्यामुळे आजचा ब्लॉग या चित्रपटाला समर्पित. प्रास्ताविक मी या चित्रपटास सर्वांगसुंदर चित्रपट यासाठी म्हटलं की अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा सुरेख अभिनय,त्यांना असरानी ,बिंदु, डेव्हिड , दुर्गा खोटे , ए के हंगल आणि ललिता कुमारी यांनी दिलेली सुंदर साथ. हृषिकेश मुखर्जी यांची सुरेख कथा त्यातील राजेंद्रसिंह बेदी यांचे लाजवाब संवाद, हृषीकेश मुखर्जी यांचे अप्रतिम दिग...