ब्लॉग नं: 2025/331.
दिनांक: 25 नोव्हेंबर,2025.
मित्रांनो,
सोललेले बदाम विरुद्ध सालीसह बदाम:
चविष्ट,कुरकुरीत आणि पोषक मूल्यांनी भरलेले बदाम,नेहमीच लोकांना खावेसे वाटतात.आणि एक आरोग्यदायी ड्राय फ्रूट म्हणून ओळखले जातात. पण एक प्रश्न अनेक वर्षांपासून लोकांच्या मनांत आहे की, बदाम त्वचेसह खावेत का की सोलून खावेत? सालासहित की विनासालीचा बदाम जास्त फायदेशीर आहे? या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.
सविस्तर:
सालासहित की विनासालीचा बदाम जास्त फायदेशीर आहे? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी बदामांचे पोषण,त्यातील अँटिऑक्सिडंट्स,फायबर,पचन क्षमता आणि एकूण आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.
बदामाला त्वचा असते का? ती तुमच्या आरोग्यासाठी किती फायद्याची?
आपल्याला माहित आहे की,बदामांवर एक पातळ तपकिरी त्वचा असते. ही फक्त दिसण्यासाठी नसून ती पॉलीफेनॉल्स नावाच्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते.संशोधनानुसार, सुमारे 70% अँटिऑक्सिडंट्स बदामांच्या त्वचेमध्ये आढळतात.
अँटिऑक्सिडंट्स म्हणजे काय?
अँटिऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील, जळजळ कमी करतात,पेशींचे नुकसान रोखतात,वार्धक्याची गती मंदावतात आणि हृदयाचे व मेंदूचे आरोग्य सुधारतात.म्हणूनच, अँटिऑक्सिडंट्सच्या दृष्टीने पाहता सालीसह बदाम नक्कीच अधिक शक्तिशाली आणि फायदेशीर ठरतात.
भिजवून सोललेले बदाम पचायला सोपे असतात का?
अनेक लोक रात्री बदाम भिजवून सकाळी त्यांची साल काढून खातात. यामागे काही कारणे अशी आहेत.
बदामाच्या सालामध्ये टॅनिन नावाचे घटक असतात, जे काही वेळा पोषक तत्वांचे शोषण कमी करू शकतात. भिजवलेले बदाम मऊ होतात आणि पचायला अधिक सोपे बनतात.
काही लोकांना भिजवलेले बदाम खाल्ल्यानंतर सूज किंवा गॅस कमी होण्याचा अनुभव येतो.म्हणून ज्यांना आम्लता, पचनाच्या तक्रारी किंवा संवेदनशील पोट असते, त्यांच्यासाठी सोललेले बदाम उत्तम पर्याय असू शकतात. परंतु ज्यांना अशा समस्या नाहीत, त्यांच्यासाठी बदामाची साल ठेवणेच अधिक आरोग्यदायी.
पोषण तुलना: कोणते बदाम खाल्ले तर अधिक फायदा?
1) सालीसह बदाम:
सालीसह बदाम,अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, यांत जास्त व्हिटॅमिन ई, सालीसह बदामांत अधिक फायबर असतं,ते रक्तातील साखर नियंत्रणात मदत करतात. त्यांनी जास्त वेळ भूक नियंत्रण होते. म्हणजे ते वजन नियंत्रणातही मदत करतात.
2) सोललेले बदाम:
सोललेल्या बदामात थोडे कमी फायबर असते, ते मऊ आणि चघळायला सोपे असतात, दातांच्या समस्या असलेल्या व्यक्तींना अनुकूल असतात,तसेच संवेदनशील पोट असलेल्या लोकांसाठी अधिक योग्य असतात.
समारोप:
एकूण पोषणाच्या दृष्टीने सालीसह बदाम अधिक फायदेशीर आहेत.त्यातील
अतिरिक्त फायबर व अँटिऑक्सिडंट्स हेच त्यांचे खरे बळ आहे. तसेच वजन कमी करण्याच्या
प्रयत्नात हे कामाचे आहेत.त्वचा उजळणे आणि हृदय आरोग्य यासाठी दोन्ही प्रकारचे बदाम
उत्तम आहेत. रोज किती बदाम खायला हवेत? तर सकाळी 5-6 भिजवलेले बदाम, त्यातील अर्धे सालीसकट आणि अर्धे सोललेले खा.जर पचनाच्या समस्या नसतील तर सालीसह
बदाम प्राधान्याने घ्या.जर पोट संवेदनशील किंवा अॅसिडिटीची समस्या असेल तर सोललेले
बदाम निवडा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु,
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
image courtesy ChatGpt

अतिशय उपयुक्त ब्लॉग
ReplyDeleteसोललेल्या बदामाचे फायदे व
सालासकट बदाम खाण्याचे फायदे दोन्ही कळले
धन्यवाद नातू साहेब
मिलिंद निमदेव
Nice information
ReplyDelete