ब्लॉग नं: 2026/264 दिनांकः 21 सप्टेंबर , 2026. मित्रांनो , प्रास्ताविक जेवणात नियमित लसूण आणि कढीपत्ता वापरणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जेवणात आम्ही नेहमीच लसूण खात असतो.भाज्यांमध्ये, वरणाला फोडणी देतांना किंवा अगदी लसणाची चटणी करून आपण खातो. तसेच आपण कढीपत्त्याचा उपयोग वरणात,कढीत किंवा कढीपत्त्याची चटणी देखिल करून खातो. पण लसूण आणि कढीपत्ता खाण्याचे काय फायदे आहेत,ते पूर्णपणे आपल्याला ठाऊक नसते. नुकतीच माझ्या वाचनात अशी एक पोस्ट आली. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि,आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन दोन्हीमध्ये याचे अनेक लाभ सांगितले आहेत.आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर 🧄 लसूण ( Garlic) खाण्याचे फायदे: 1️ ⃣ हृदयासाठी फायदेशीर ❤️ लसूण रक्तातील खराब कोलेस्टेरॉल ( LDL) कमी करतो आणि चांगले कोलेस्टेरॉल ( HDL) वाढवतो. त्यामुळे हृदयविकार आणि ब्लडप्रेशर कमी होण्यास मदत होते. 2️ ⃣ रक्तदाब नियंत्रित ठेवतोः लसणातील Allicin नावाचे घटक रक्तवाहिन्या सैल करतात आणि हाय BP कमी करण्यास मदत करत...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .