Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351.

दिनांक: 15 डिसेंबर, 2025.  

मित्रांनो, 

डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया,म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये.

सविस्तर:

हायपोग्लायसेमिया म्हणजे काय?

सामान्यतः,

डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि

डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात.

हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे:

मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ, चक्कर, विस्मरण, नकारात्मक विचार, नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा, तोतरेपणा, खूप थकवा,रक्तातील साखर आणखी खाली गेली तर शरीर अड्रेनलिन व ग्लुकॅगॉन वाढवून पुढील लक्षणे निर्माण करते.जसे की, छातीत धडधड वाढणे,तीव्र घाम येणे,पोटात खड्डा पडल्यासारखे वाटणे,डोकेदुखी, मळमळ, उलटी आणि अत्यंत कमी झाल्यास फिट्स येऊ शकतातविशेषतः जेवण चुकवून मद्यप्राशन केलेल्या रुग्णांमध्ये.

हायपोग्लायसेमिया वारंवार का होतो?

वारंवार येणारा हायपोग्लायसेमिया हा डायबेटीस मॅनेजमेंटमधील “सर्वात अवघड” भाग असतो. त्याची प्रमुख कारणे अशी:

1) औषधांचा किंवा इन्सुलिनचा वाढीव डोस: औषध घेतल्यावर पुरेसे अन्न न खाल्ल्यास साखर त्वरेने खाली जाते.

2) काही वेळा साखर कमी तर काही वेळा वाढते (Vicious Cycle): फास्टिंग/PP मध्ये साखर जास्त दिसते म्हणून डोस वाढवला की दिवसा मध्ये काही वेळेस साखर dangerously कमी होते.

3) Sulfonylureas गटातील औषधे: उदा. Glimipride, Glibenclamide,वृद्ध व्यक्तींमध्ये त्यामुळे हायपोग्लायसेमिया जास्त दिसतो.यातील तुलनेने सुरक्षित औषध Gliclazide (Short acting)

4) हायपोग्लायसेमिया न करणारी सुरक्षित औषधे: Metformin, DPP4 inhibitors – Teneligliptin, Vildagliptin इ.

डायबेटीस नसलेल्या व्यक्तींनाही हायपोग्लायसेमिया होतो का?

हो, पण कमी प्रमाणात.विशेषतः Reactive Hypoglycaemia, कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खाल्ल्यावर शरीर जास्त इन्सुलिन सोडते आणि साखर अचानक कमी होते.हे Pre-diabetic स्थितीचे संकेत असू शकतात.

Non-Reactive Hypoglycaemia

खाण्याशी संबंध नसतो. कारणे: लिव्हर, किडनी, पॅनक्रियाज विकार / इन्सुलिनोमा (ट्यूमर).

हायपोग्लायसेमिया कसा ओळखावा? – Whipple Triad

एंडोक्रायनोलॉजिस्ट हायपोग्लायसेमियाचे निदान खालील तीन गोष्टींवर करतात:

1.रक्तातील साखर कमी असणे, 2.कमी साखरेची लक्षणे असणे आणि 3.ग्लुकोज दिल्यानंतर लक्षणे कमी होणे

अत्यावश्यक उपचार — “Rule of 15 - 15 - 15”

हायपोग्लायसेमिया झाल्यास ही सर्वात सुरक्षित व वैज्ञानिक पद्धत:

1️ 15 ग्रॅम ग्लुकोज द्या.

उदा. Glucon-D, दोन चमचे मध, गोड कँडी, गोड चहा + बिस्किट

2️ 15 मिनिट थांबा.

3️ 15 mg/dl ने साखर वाढली का ते तपासा. नसेल वाढली तर पुन्हा त्याच पद्धतीने उपचार.

🔴 महत्त्वाचे:जो रुग्ण शुद्धीवर नाही त्याला तोंडावाटे काहीही देऊ नये.अस्पिरेशनचा धोका असतो.

अतिशय कमी साखर + रुग्ण बेशुद्ध असल्यास:

त्वरित हॉस्पिटलमध्ये IV Dextrose (10%, 25%, 50%)

जर रुग्ण Type 1 डायबेटिक असेल तर घरातच उपलब्ध ठेवण्याचा पर्याय.Inj.Glucagon (IM/Subcutaneous),इंजेक्शन दिल्यावर उलटी होऊ शकते म्हणून रुग्णाला Left Lateral Position मध्ये झोपवावे.

काही रुग्णांना लक्षणे जाणवतच नाहीत — Hypoglycaemia Unawareness:

कारणे: 1.Autonomic Neuropathy, 2. बीटा-ब्लॉकर औषधे (Atenolol, Propranolol), 3. वारंवार होणारे हायपोग्लायसेमियामुळे मेंदू ‘अलर्ट सिग्नल’ देणे बंद करतो. यामुळे साखर dangerously कमी होऊनही रुग्णाला कोणतीही सूचना मिळत नाही. ही अत्यंत धोकादायक स्थिती असते.

हायपोग्लायसेमिया टाळण्यासाठी सोपे उपाय: 1.जेवणाची वेळ न चुकवणे, 2.औषध/इन्सुलिनची योग्य मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बदलणे,3. बाहेर जाताना गोड कँडी/बिस्किट जवळ बाळगणे, 4. मद्यपान करताना जेवण जरूर करणे,5. ग्लुकोमीटर सोबत ठेवणे आणि 6. नियमित रक्तशर्करा तपासणी करणे.  

समारोप

हायपोग्लायसेमिया ही “हलकीफुलकी” समस्या नसून कधी कधी जीवघेणी ठरू शकते.
पण योग्य माहिती, योग्य वेळी दिलेला उपचार आणि सातत्यपूर्ण काळजी घेतल्यास ती पूर्णपणे नियंत्रित करता येते.डायबेटीस मॅनेजमेंटमध्ये ‘जास्त साखर’ जितकी धोकादायक आहे,तितकीच ‘अचानक कमी झालेली साखर’ सुद्धा. म्हणून प्रत्येक डायबेटीस रुग्णाने हायपोग्लायसेमिया ओळखणे, त्यावर उपचार करणे आणि तो टाळणे — हे तीनही टप्पे चांगले समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

  प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

सौजन्य: @पद्मनाभ केसकर.    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...