ब्लॉग नं. 2025/307.
दिनांक: 1 नोव्हेंबर 2025.
मित्रांनो,
“या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या
!”
“जिथे तुमची कदर नाही
तिथे का राहावे? भारतमातेला तुमची गरज आहे, आणि तुमचे स्वागत आहे!” झोहो
कॉर्पचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांचे हे शब्द केवळ एक ट्वीट नाहीत,तर प्रत्येक भारतीयाचे, स्थलांतरितासाठी अंतर्मनाला स्पर्श करणारे आवाहन
आहे.आज जगभरातील अनेक भारतीयांनी त्यांची बुद्धिमत्ता, कार्यकौशल्य
आणि प्रामाणिकतेच्या जोरावर,परदेशात प्रतिष्ठा कमावली आहे.त्यांचे योगदान इतके
मोठे आहे की,अमेरिकेच्या अर्थसंकल्पात भारतीय स्थलांतरितांनी गेल्या 30 वर्षांत
सरासरी 1.7 दशलक्ष डॉलर इतके योगदान दिल्याचे आकडे सांगतात.हे
सर्वात जास्त आहे,इतर कोणत्याही देशाच्या स्थलांतरितांपेक्षा.पण तरीही देखिल,अमेरिकेचे
तोंडाळ राष्ट्रपती आपली मुक्ताफळे उधळीत आहेत.
वेम्बू
यांनी याच आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना म्हटले. “भारताने त्याचे सर्वोत्तम पाठवले.” ही ओळ वेदनादायक आहे आणि
अभिमानास्पदही आहे.वेदना कारण भारताने आपली प्रतिभा गमावली आहे. आणि अभिमान,कारण त्या प्रतिभेने जग जिंकले.
🌏 “ब्रेन
ड्रेन” पासून “ब्रेन गेन”कडे:
दशकानुदशके
आपण ‘ब्रेन ड्रेन’बद्दल बोलत आलो आहोत,म्हणजे भारतातील उत्तम मेंदू,उत्तम शिक्षण घेऊन,चांगल्या संधींच्या शोधात परदेशात स्थायिक होतात.परंतु आता काळ बदलतो
आहे.भारताची अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान क्षेत्र आणि स्टार्टअप
संस्कृती झपाट्याने विकसित होत आहे. “ब्रेन ड्रेन”चा प्रवाह आता उलटा फिरू लागला
आहे.अनेक कुशल भारतीय पुन्हा मायदेशी परत येत आहेत,केवळ भावनांनी नव्हे, तर भारताच्या नव्या क्षमतेवर विश्वास ठेवून.
श्रीधर
वेम्बू स्वतः याचे उत्तम उदाहरण आहेत. अनेक वर्षे परदेशात राहून त्यांनी ग्रामीण
तामिळनाडूमध्ये,स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.आज ते केवळ कंपनी चालवत नाहीत,तर भारताच्या खेड्यांमध्ये “ग्रामीण तंत्रज्ञान क्रांती” घडवण्याचे काम करत आहेत.ते दाखवून देत आहेत की,जागतिक
स्तरावर स्पर्धा करणारा उद्योग भारताच्या मातीशी जोडला जाऊ शकतो.
🧠 भारताला
का हवी आहे परतलेली प्रतिभा?
भारताला आज
गरज आहे नव्या विचारांची,नव्या पिढीची
आणि नव्या आत्मविश्वासाची.
जगात उंच भरारी घेतलेल्या भारतीयांची दृष्टी, अनुभव
आणि कार्यशैली भारताला अधिक सक्षम बनवू शकते.
भारत आज फक्त ‘बाजार’ नाही, तर “संधींचे महासागर” बनला आहे.
तंत्रज्ञान,आरोग्य, शिक्षण,
शेती, पर्यावरण आणि उत्पादन क्षेत्र,सर्वत्र
मोठ्या बदलांची गरज आहे. आणि हे बदल घडवू शकतील तेच लोक, जे
जागतिक दृष्टीकोनासह भारताच्या मातीशी नाळ जोडून राहतात.
💬 समाजातील
प्रतिसाद — भावनिक आणि व्यावहारिक:
वेम्बू
यांच्या पोस्टनंतर अनेकांनी या आवाहनाला समर्थन दिले.एका वापरकर्त्याने User ने लिहिले: “भारताला जागतिक पॉवरहाऊसमध्ये बदलण्याची संधी प्रचंड आहे. योग्य परिसंस्था
आणि संधी मिळाल्या तर अनेकजण आनंदाने परत येतील.” तर काहींनी वास्तव मांडले. “परत येणे हे केवळ भावनिक असू शकत नाही. नोकरशाही, प्रदूषण
आणि कमकुवत पायाभूत सुविधा सुधारल्याशिवाय,भारतात टिकणे कठीण आहे.” हे दोन्ही
दृष्टिकोन महत्त्वाचे आहेत. कारण परत येण्यासाठी फक्त देशप्रेम पुरेसे नाही, देशानेही
त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था, सन्मान आणि सुविधा उपलब्ध
करून द्यायला हव्यात.
🌿भारताची
खरी ताकद – संस्कृती, कुटुंब आणि समुदाय:
अनेकांना
वाटते की परदेशातील पैसा आकर्षक आहे,पण भारताची खरी ताकद पैशात नाही.ती संस्कृतीत,कौटुंबिक मूल्यांत आणि आपुलकीत आहे. इथे अजूनही “शेजारी आपल्या मुलासारखा”
असतो, “कामगाराला सन्मानाने वागवले” जाते आणि “उद्या
सुधारेल” हा आशावाद टिकून आहे.या भावनिक बांधिलकीतच भारताचा आत्मा आहे.आणि तो
आत्मा अनुभवण्यासाठी,अनेक परदेशस्थ भारतीय पुन्हा मायदेशाकडे
वळत आहेत.
समारोप:
“घरी या, भारतमातेला तुमची गरज आहे !” श्रीधर
वेम्बू यांचे आवाहन हे फक्त एका उद्योजकाचे नव्हे, तर एका
देशभक्ताची हाक आहे. भारताला पुन्हा विश्वगुरू बनवायचे असेल, तर आपल्याला आपल्या उत्तम मेंदूंची गरज आहे.परदेशात गेलेले भारतीय हे
भारताचे हरवलेले तारे नाहीत, तर वितळलेल्या प्रकाशाचे किरण आहेत,ते
परत आले, तर
भारताचा आकाश पुन्हा उजळून निघेल.याचा अर्थ भारतात सध्या कार्यरत असलेले टॅलेंट नाही
असे नाही पण त्याला इतरांची साथ मिळेल.ज्याची कमतरता सध्या जाणवते आहे. म्हणूनच...
“घरी या... भारतमातेला तुमची गरज आहे!” 🌺
आजचा हा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट
बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
✍️ प्रसाद नातु.
(आरोग्य आणि
जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
📝 टीप: हा
लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी
संपर्क करावा.

अगदी तंतोतंत माझ्या मनातले बोललात
ReplyDeleteपरदेशी, विशेषतः अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांना माझे पण आवाहन आहे कि *या चिमण्यांनो परत फिरा*
धन्यवाद सर
DeleteNice information
ReplyDeleteधन्यवाद सर
Delete🙏योग्य आवाहन🙏RR
ReplyDeleteधन्यवाद जोशीजी
Delete