Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

बलिप्रतिपदा : दैत्यराज बलीच्या पुनरागमनाचा दिव्य उत्सव

 ब्लॉग नं.2025/297.

दिनांकः 22 ऑक्टोबर, 2025.


मित्रांनो,

बलिप्रतिपदा : दैत्यराज बलीच्या पुनरागमनाचा दिव्य उत्सव 🪔

दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे,आणि या दिवाळीतील चौथा दिवस म्हणजे  बलिप्रतिपदा.महाराष्ट्रात विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवसाला बली पद्मिनी, पाडवा, वीरप्रतिपदा किंवा द्युतप्रतिपदा अशी विविध नावे आहेत. हा दिवस केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे.  

🌞 बलिप्रतिपदा म्हणजे काय?

हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच,अमावास्येनंतरच्या पहिल्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी केली जाते. दिवाळीच्या या चौथ्या दिवशी दैत्यराज महाबली याचा पृथ्वीवर पुनरागमन होत असल्याचा पौराणिक समज आहे.

गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही भागांत या दिवसाला नववर्षाचा प्रारंभ मानतात. विक्रम संवत्‌ नववर्षाची सुरुवात या तिथीपासूनच होते. हा दिवस हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मानला जातो,याचा अर्थ म्हणजे कोणतेही शुभकार्य या दिवशी निर्बंधाविना करता येते.अर्थात मुहूर्त न बघता करता येते.  

👑 महाबलीची कथा : परोपकारी असुरराजा

दैत्यराज महाबली हा प्रल्हादाचा नातू आणि एक अत्यंत पराक्रमी,न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राजा होता. त्याच्या राज्यात कोणीही दुःखी नव्हता, सर्वत्र समृद्धी आणि शांतता होती. परंतु त्याचे काही अनुयायी सतत देवांवर (सुरांवर) आक्रमण करत असल्यामुळे देवांना भय वाटू लागले.

तेव्हा देवांनी विष्णूकडे शरणागती पत्करली. विष्णूने युद्धाचा मार्ग न निवडता, बटु ब्राह्मण वामन या अवतारात पृथ्वीवर आगमन केले.बली त्या वेळी यज्ञ करत होता आणि यज्ञकाळात जो कोणी मागेल,त्याला काहीही देण्याचे वचन त्याने दिले होते.

🪶 तीन पावले” आणि बलीचा पराभव:

वामनाने बलीकडे फक्त तीन पावले एवढीच जमीन मागितली. बली हसत म्हणाला, “इतकेच का मागणार? तुला हवे तेवढे घे.” वामनाने तीन पावलांची मागणी पुन्हा केली आणि बलीने वचन दिले. त्याक्षणी वामनाने विराट रूप धरण केले.एका पावलात त्याने पृथ्वी व्यापली, दुसऱ्यात आकाश आणि तिसरे पाऊल ठेवण्यासाठी काहीच उरले नाही. तेव्हा बलीने स्वतःचे मस्तक पुढे केले आणि म्हणाला, “भगवन्, तुमचे तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा.”
            वामनाने तसेच केले आणि त्याला पाताळलोकात पाठवले.परंतु विष्णू त्याच्या भक्तीने आणि प्रामाणिकपणाने प्रसन्न झाला आणि त्याला वरदान दिले. हे बली, वर्षातून एकदा तू पृथ्वीवर येऊ शकशील, आपल्या प्रजेला भेटशील आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकशील.”हीच ती प्रतिपदा, बलिप्रतिपदा,ज्या दिवशी बली पृथ्वीवर परत येतो, आणि लोक त्याचे स्वागत करतात.

🕯️ बलिप्रतिपदा उत्सवाचे स्वरूप:

या दिवशी घराघरात बलीराजाचे प्रतीकात्मक पूजन केले जाते.पाच रंगी पावडरने,जमिनीवर सुंदर आकृत्या काढून,त्यावर बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांच्या मूर्ती बसवतात.पुष्प,फळे,धान्य आणि नैवेद्य अर्पण केले जाते.काही ठिकाणी गाय-बैलांची शिंगे रंगवून सजवली जातात आणि त्यांची पूजा केली जाते.

ग्रामीण भागात या दिवशी लोक सामूहिक खेळ, द्युत (जुगार), रस्सीखेच, आणि लोकनाट्यांच्या स्वरूपात महाबलीच्या कथेचे सादरीकरण करतात. हे सर्व आनंद, उत्साह आणि ऐक्याचे प्रतीक असते.

💑 पाडवा आणि सौभाग्य

महाराष्ट्रात या दिवसाला पाडवा” म्हणूनही ओळखले जाते आणि हा दिवस सौभाग्य व प्रेमाचे प्रतीक मानला जातो. नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यांना फुलांचा हार घालतात. काही ठिकाणी पती पत्नीस सोन्याचे दागिने किंवा वस्त्र भेट देतो.

🌺 अध्यात्मिक अर्थ:

बलिप्रतिपदा ही केवळ एका राजाची आठवण नाही, तर भक्ती, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. बलीने आपले सर्वस्व अर्पण केले पण आपली सत्यनिष्ठा सोडली नाही. विष्णूलाही बलीचा पराभव नको होता; त्याला नम्रतेचा धडा द्यायचा होता.हा दिवस आपल्याला सांगतो,अहंकाराचा नाश आणि सत्यनिष्ठेचा विजय हा प्रत्येक मनुष्याच्या जीवनातला खरा दिवाळीचा प्रकाश आहे.

🌞 समारोप:

बलिप्रतिपदा म्हणजे दैत्यराज बलीचा पुनरागमन सोहळा आणि विष्णूच्या वामनावताराच्या विजयाची आठवण. या दिवसाचा खरा संदेश असा आहे की, सत्ता किंवा संपत्ती नव्हे, तर भक्ती, प्रामाणिकपणा आणि त्याग हेच खरे बल आहेत.या दिवशी आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणातील अहंकार, मत्सर आणि लोभाचा त्याग करून, प्रेम, समर्पण आणि कृतज्ञतेचा दीप लावू या. शुभ बलिप्रतिपदा! बलीराजा आपल्या जीवनात सदैव सुख, समृद्धी आणि शांततेचा वर्षाव करो.” 🌸🪔

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...