Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

इमल्सिफायर म्हणजे काय? माहित असणे आवश्यक. 2809

ब्लॉग नं: 2025/273.

दिनांक: 28 सप्टेंबर, 2025. 

मित्रांनो, 

इमल्सिफायर म्हणजे काय?

आजकाल बाजारात मिळणाऱ्या,अनेक पॅकेज्ड व फास्टफूड पदार्थांमध्ये इमल्सिफायर (Emulsifier) हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.साध्या भाषेत सांगायचे तर,तेल व पाणी हे एकमेकात सहज मिसळत नाहीत.पण इमल्सिफायरमुळे हे दोन्ही घटक एकत्र राहून पदार्थाची चव, रंग, बनावट टिकून राहते.त्यामुळेच बिस्किट,चॉकलेट,केक,आईस्क्रीम असे पदार्थ जास्त चविष्ट व टिकाऊ बनतात.पण इमल्सिफायर नेहमी चांगलेच असतात कां? उत्तर आहे.नाही.आजच्या ब्लॉगमधे इमल्सिफायर म्हणजे काय? हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

सविस्तरः

अन्नपदार्थांमध्ये वापरले जाणारे काही इमल्सिफायर:(यापैकी काही प्राणीजन्य, विशेषतः गोमांस व डुकराच्या मांसावर आधारित असू शकतात.)

1. E-471 (Mono- and Diglycerides of Fatty Acids):

          सर्वाधिक वापरला जाणारा इमल्सिफायर.यांत काहीवेळा गोमांस (Beef) वा डुकराचे मांस (Pig Flesh) यांच्या चरबीपासून तयार केला जातो.

2. E-472 (Esters of Mono- and Diglycerides):

E-471 वर आधारित असून, प्राणिजन्य चरबीचा वापर होऊ शकतो.

3. E-442 (Ammonium Phosphatides):

चॉकलेट व मिठाईमध्ये वापरला जाणारा घटक.उत्पादन प्रक्रियेत जनावरांची चरबी असण्याची शक्यता.

4. E-476 (Polyglycerol Polyricinoleate – PGPR)

चॉकलेट अधिक मऊसर व पातळ ठेवण्यासाठी वापरतात.कधीकधी प्राणिजन्य घटक यामध्ये असू शकतात.

इमल्सिफायरचे फायदे:

साठवण क्षमता वाढते: पदार्थ जास्त काळ ताजे राहतात.

गुणवत्ता टिकते: रंग, वास, चव, बनावट एकसारखी राहते.

चविष्ट अनुभव: बिस्किट, केक, चॉकलेट अधिक मऊसर लागतात.

शिजवताना सोय: मिश्रण लवकर एकत्र येते.

इमल्सिफायरचे तोटे:

आरोग्यावर परिणाम: जास्त प्रमाणात घेतल्यास कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, लठ्ठपणा वाढू शकतो.

अ‍ॅलर्जीक धोका काही लोकांना त्वचेवर पुरळ, पोटदुखी, ऍसिडिटी होऊ शकते.

धार्मिक व सांस्कृतिक अडचण – जर इमल्सिफायर प्राणीजन्य (विशेषतः गोमांस वा डुकराच्या मांसावर आधारित) असेल, तर हिंदू व मुस्लिम धर्मातील लोकांसाठी तो वर्ज्य ठरतो.

शाकाहारींसाठी अडचण – "Vegetarian" म्हणून खरेदी केलेले काही पदार्थ प्रत्यक्षात प्राणीजन्य इमल्सिफायरयुक्त असू शकतात.

शाकाहारींसाठी पर्याय

शाकाहारी किंवा धार्मिक कारणास्तव प्राणीजन्य इमल्सिफायर टाळू इच्छिणाऱ्यांसाठी काही सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत:

1. सोया लेसिथिन (E-322): सोयाबीनपासून तयार होतो; बेकरी पदार्थ, चॉकलेट, आईस्क्रीममध्ये वापरतात.

2. सूर्यमुखी लेसिथिन: पूर्णतः वनस्पतिजन्य; सोयाला ऍलर्जी असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय.

3. पाम ऑइल आधारित इमल्सिफायर:वनस्पतीजन्य तेलापासून बनविलेले.

4. नैसर्गिक घटक: दूध, दही, मध, मोहरी, अंड्याचा पांढरा बलक (अंड्याहारींसाठी) हे नैसर्गिक इमल्सिफायर आहेत.

समारोपः

आपण जे अन्न खातो त्यामध्ये कोणते घटक आहेत, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः E-471, E-472, E-442, E-476 यांसारख्या इमल्सिफायरमध्ये प्राणीजन्य चरबी असू शकते.त्यामुळे लेबल वाचा, समजून घ्या आणि मगच खरेदी करा. शाकाहारी लोकांनी “100% Vegetarian” किंवा “Plant-based” असे लेबल असलेलेच पदार्थ निवडल्यास ते अधिक सुरक्षित ठरतील.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 

🏻 लेखक: प्रसाद नातु 

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. 






Comments

  1. उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...