ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
Blog No. 202 4 / 057. Date:31 st , March 202 4 . मित्रांनो, भारताच्या अंतर्गत कारभाराबाबत टिपणी करणे,हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे? अशा थाटात अनेक गोष्टी नेहमीच अमेरिका असो, संयुक्त राष्ट्र संघ यांच्या कडून होत असतात. या मागे खोडसाळपणा तर असतोच,पण त्यामागे राजकीय हेतु देखिल असतोच, हे लक्षात घ्यायला हवे.या विषयाला समर्पित आहे आजचा ब्लॉग. सविस्तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर ' भारतातील राजकीय अशांतता ' या बाबीवर लक्ष वेधताना प्रवक्त्याने ही टिप्पणी केली.स्टीफन दुजारिक , महासचिवांचे प्रवक्ते , यांनी व्यक्तींच्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यासह त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे यावर त्यांनी जोर दिला. ...