Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

माऊंट अबू राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन

 Blog No.2023/313.  

Date: -22nd, December 2023. 

मित्रांनो,

            मध्यंतरी मी सापुताऱ्याला जाऊन आल्यानंतर एक ब्लॉग सापुताऱ्याबद्दल लिहिला होता. तेव्हा मी माऊंट अबूला देखिल जाऊन आलो होतो.पण मध्यंतरी trending असे काही टॉपिक्स येत गेले आणि त्यामुळे त्यावरील ब्लॉग लिहायचं राहून गेलं होतं.माऊंट अबूला बरेच काही पहाण्यासारखं आणि माऊंट अबू बद्दल बरेच काही लिहिण्यासारखं देखिल आहे. म्हणून आज उद्याचा आणि कदाचित परवाचा ब्लॉग असणार आहे माऊंट अबूवर. 

प्रास्ताविक

            मी सापुताऱ्याहून माऊंट अबूला कारने गेलो होतो.पण तुम्हाला जायचं असेल तर कसं जायचं हे सांगतो. माऊंट अबू हे अहमदाबादहून रोडने 226 किमीवर आहे आणि रोडने पोहोचायला 5 तास लागतात.तसं जातांना मेहसाणा आणि पालनपूर ही गुजरात राज्यातील दोन मोठी गांवे लागतात.जवळपास 200 किमी तुम्ही चार तासात जाऊ शकता, कारण रस्ता छानच आहे.पण जवळपास 28 किमी रस्ता हा घाटाचा आणि वळणावळणाचा आहे,त्यामुळे 28 किमीला 1 तास लागतो.अनेक टेकड्यांचे मिळून बनलेले हे गांव आहे.तुम्ही उदयपूरला विमानाने पोहोचून तिथून अवघ्या सव्वा तीन तासांत माऊंट अबूला जाऊ शकता.जवळचे एयरपोर्ट उदयपूर आहे आणि जवळचे रेल्वे स्टेशन अबू रोड आहे,जे 27 किमी आहे.तिथून माऊंट अबूला पोहोचायला 1 तास लागतो. 

इतिहासात माऊंट अबू

            माऊंट अबू हे राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन आहे,जे समुद्र सपाटीपासून  1200 मीटर उंचीवर स्थित आहे. येथील गुरुशिखर हे 1722 मीटर म्हणजे 5650 फुट उंचावर आहे.या शहराचे प्राचीन नांव अर्बुदांचल आहे.माऊंट अबूच्या इतिहासाविषयी सविस्तर माहिती मी एखाद्या ब्लॉगमध्ये कव्हर करेन.   

मी पाहिलेले माऊंट अबू           

            माऊंट अबूमध्ये हॉटेल बरेच आहेत.मी बँक ऑफ इंडियाचा सेवानिवृत्त स्टाफ असल्याने मला येथील हॉटेल सुधीरमध्ये निवासाची व्यवस्था झाली होती.हॉटेल सुधीर अगदी हार्ट ऑफ द सिटी आहे म्हटले तर वावगे ठरू नये.माफक रेटमध्ये हे एक चांगले हॉटेल आहे.माऊंट अबूमध्ये काही स्पॉट असे आहेत की जे सीनियर सिटिजन फिट असतील तर त्यांनी पहावे असे आहेत.

देलवारा मंदिर किंवा दिलवाडा मंदिर

            देलवारा किंवा दिलवाडा मंदिर हे एक जैन मंदिर आहे.येथे पाच मंदिरं आहेत.स्थापत्य कलेचा एक सुंदर नमूना म्हणून या मंदिरास अवश्य भेट द्यायला हवी.या मंदिराचे निर्माण कार्य हे बाराव्या आणि तेराव्या शतकात राजा वास्तुपाल आणि तेजपाल या दोन भावांनी केले होते.संपूर्णतः संगमरवरी दगडामद्धे याचं बांधकाम करण्यात आले आहे.मूळ मंदिराच्या चौफेर जे बांधकाम आहे, त्यातील प्रत्येक खांबावर वेगवेगळे नक्षीकाम आणि त्याच्या सीलिंगवर वेगवेगळे नक्षीकाम आहे.हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने बघायचे झाले तर पूर्ण एक दिवस लागेल.हे मंदिर अवश्य पहावे असे आहे.टीप:- या मंदिरात कॅमेरा,मोबाईल फोन ज्याने फोटोग्राफी करता येईल असे कुठलेही डिव्हाईस नेण्यास बंदी आहे.    

नक्की लेक                     

माउंट अबूमधील नक्की तलाव ज्याला स्थानिक पातळीवर नक्की झील म्हणून ओळखले जाते,हे नैसर्गिक चमत्कारांनी नटलेले सरोवर खरोखरच माउंट अबूचे वैभव आहे. सुमारे 11,000 मीटर खोली आणि एक चतुर्थांश मैल रुंदी असलेले हे भारतातील पहिले मानवनिर्मित तलाव आहे. हिल स्टेशनच्या मध्यभागी असलेला हा तलाव, पर्वत आणि विचित्र आकाराच्या खडकांनी वेढलेले आहे.नक्की तलावाच्या निर्मळ पाण्यातून जाताना, माउंट अबूचे जीवन आपल्यासमोर उलगडताना पाहणे रोमांचक आहे.निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीच्या शौकीनांसाठी हे एक योग्य ठिकाण आहे.असं म्हणतात की हा भारतातील पहिला मानवनिर्मित तलाव आहे.  नक्की तलावाशी संबंधित अनेक दंतकथा आहेत.एका दंतकथेनुसार, देवांनी त्यांचा शत्रू बाष्काली राक्षसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हा तलाव बांधला होता. दुसरी दंतकथा ही रक्षिया बालम ऋषींच्या प्रेमकथेवर आधारित आहे.एका राजाने फर्मान सोडले होते की जो कोणी आपल्या नखांनी रात्रभर तलाव खोदेल त्याचे त्याच्या मुलीशी लग्न लावून देण्यात येईल.रक्षिया बालमला राजाची मुलगी आवडली होती.त्याने हे काम पूर्ण केले.त्यामुळे नख म्हणजे नखे असल्याने हे नाव नक्की तलाव आहे.रक्षिया बालम आणि त्याचा प्रियकर हे भगवान शिव आणि पार्वतीचे अवतार असल्याचेही सांगण्यात यायचे.तथापि, ऋषीचा विश्वासघात केला गेला आणि अशक्य कृत्य पूर्ण केल्यानंतरही त्याला त्याच्या प्रियकराशी लग्न करू दिले गेले नाही.असे सांगितले जाते.या तलावाच्या दक्षिण दिशेस माऊंट अबूचा बाजार आहे,तिथे जाऊन तुम्ही शॉपिंगचा आनंद लुटू शकता.   

टोड रॉक

            माउंट अबूमधील नक्की तलावाच्या जवळ टॉड रॉक हा एक प्रचंड खडक आहे.जो तलावाच्या पाण्यात उडी मारत असलेल्या टॉडसारखा दिसतो.हा रॉक येथे येणाऱ्या विजिटर्सना वारंवार बघायला मिळतो.सभोवतालच्या तलावाचे विहंगम सौंदर्य आणि हिरवेगार डोंगराळ प्रदेश पाहण्यासाठी तुम्ही खडकावर चढून चित्तथरारक दृश्ये टिपू शकता.टॉड रॉक वर जाण्याचा मार्ग नक्की तलावाजवळ सुरू होतो आणि टॉड रॉकपर्यन्त जाण्यासाठी 250 पायऱ्या चढणे आवश्यक आहे. हा संपूर्ण मार्ग हिरवाईने नटलेला आहे,ज्यामुळे चालणे शक्य होते.तरी काही लोकांना भीती वाटू शकते कारण जिना मध्येमध्ये तुटलेला आहे.म्हणून वृद्ध लोक आणि लहान मुलांसाठी चढण्यापूर्वी विचार करावा.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु, पुणे.


Comments

  1. सुंदर माहितीबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  2. उत्तम आणि सुरेख अश्या शब्दात माउंट अबू वर्णन 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. खूपच छान माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...