Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

“बॉबी” ची पन्नास वर्षे

 Blog No.2023/252            

Date:- 30th, September 2023.

मित्रांनो,

            28 सप्टेंबर,1973 या दिवशी रिलीज झालेल्या एका चित्रपटाने किशोरवयीन मुलांमधील प्रेमाची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडून एक धमाका केला होता.त्या चित्रपटाला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली.माझ्या वयाच्या मित्रांना लगेच लक्षात येईल की तो चित्रपट दूसरा तिसरा कुठला नसून राज कपूर निर्मित दिग्दर्शित “बॉबी” हाच असणार. हो मी “बॉबी” चित्रपटाबद्दल बोलतोय आणि आजचा ब्लॉग “बॉबी” ला समर्पित.

प्रास्ताविक

            राज कपूरने या चित्रपटातून आपला मुलगा ऋषी कपूरला हीरो म्हणून प्रदर्शित केले आणि डिंपल कपाडिया या नव्या हिरोईनला सुद्धा चित्रपटसृष्टीत आणले. या सोबतच शैलेन्द्रसिंग या नव्या गायकाचे पदार्पण देखिल या चित्रपटाद्वारे झाले. पहिल्या चित्रपटात हे तीनही तारे प्रकाशात आले.ऋषी कपूरने बरीच वर्षे चित्रपटसृष्टीवर राज्य केले आणि शैलेन्द्रसिंगला बरेच यश मिळाले.पण डिंपल कपाडियाने मात्र त्याच वर्षी तेव्हाचा सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न करून चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. पुनरागमनानंतर तिने अभिनेत्री म्हणून नांव कमावले पण “सागर” चित्रपट सोडला तर तिला बॉक्स ऑफिसवर यश सामान्य मिळाले  

नव्या पिढीतील वाचकांसाठी “बॉबी” ची कथा थोडक्यात देतो.                    

ही कथा वेगवेगळ्या वर्गातील दोन किशोरवयीन मुलांमधील प्रेमकथा आहे - राजा 'राज' नाथ (ऋषी कपूर) हा श्रीमंत हिंदू उद्योगपती राम नाथ (प्राण) यांचा मुलगा आणि बॉबी ब्रिगांझा (डिंपल कपाडिया), या गोव्यातील ख्रिश्चन मच्छीमार जॅक ब्रिगांझा (प्रेम नाथ) यांच्या मुलीच्या प्रेमाची. राज त्याच्या बोर्डिंग स्कूलमधून परतलेला असतो.परतल्यावर त्याचे आईवडील त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टी देतात. राजची माजी गव्हर्नस मिसेस ब्रिगांझा (दुर्गा खोटे) तिची नात बॉबीसोबत त्याला भेटवस्तू देण्यासाठी येते, परंतु राजची आई सुषमा नाथ (सोनिया साहनी) मिसेस ब्रिगांझाकडे दुर्लक्ष करते,ज्यामुळे मिसेस ब्रिगांझा बॉबीसोबत घाईघाईत पार्टी सोडून निघून जाते.

राज दुसऱ्या दिवशी त्या भेटवस्तू उघडतो आणि त्याला मिसेस ब्रिगांझाची भेटवस्तु सापडते म्हणून तो तिला प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतो. तिथे पोहोचल्यावर बॉबी दार उघडते आणि हे त्याच्यासाठी love at first sight असते.तो पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी तिला लायब्ररीमध्ये भेटायला जातो आणि त्यातून दोघांची मैत्री सुरू होते.राजच्या मनमिळाऊ स्वभावामुळे जॅक आणि मिसेस ब्रिगांझा,राज आणि बॉबीच्या नात्याला मान्यता देतात. पण राजला कळते की हे नाते रामला (त्याच्या वडिलांना) मान्य नाही.ज्यांना त्याचा मुलगा एका गरीब मच्छीमाराच्या मुलीच्या प्रेमात पडला आहे ही कल्पना पसंत पडत नाही.राजच्या सांगण्यावरून,राम जॅकला राज आणि बॉबीच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित करतो. पण राज आणि बॉबीच्या नात्याबद्दल बोलण्याऐवजी,राम जॅकचा अपमान करतो आणि त्याच्या पैशासाठी राजला अडकवण्यासाठी बॉबीचे सौंदर्य आणि मोहिनी वापरल्याचा आरोप करतो. मग त्यांचे भांडण होते.राम राजला बॉबीला भेटण्यास मनाई करतो.बॉबीच्या सुरक्षिततेसाठी, जॅक तिला आणि श्रीमती ब्रिगांझा यांना गोव्यात राहायला पाठवतो.

बॉबीला हाकलून दिल्याने राज आपल्या वडिलांवर रागावून,त्याच्या वडिलांशी असलेले सर्व संबंध तोडतो आणि बॉबीला भेटण्यासाठी गोव्याला निघून जातो.नंतर राम राजला शोधण्यात मदत करणार्‍याला  $25,000 चे बक्षीस जाहीर करतो.एका स्थानिक वृत्तपत्रावर बक्षीस पाहिल्यावर, प्रेम चोप्रा (प्रेम चोप्रा) नावाचा स्थानिक लोभी गुंड,त्याच्या साथीदारांच्या मदतीने पैश्यासाठी राज आणि बॉबीचे अपहरण करतो.ते दोघे जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बॉबीला रोखण्यासाठी प्रेम राजला मारहाण करण्यास सुरुवात करतो. अखेरीस,जॅक प्रेमवर हल्ला करून बचावासाठी येतो,जो त्याच्या गुंडांना जॅकला मारहाण करण्याचा आदेश देतो.पण तिथे पोहोचलेला राम आणि पोलिस प्रेम आणि त्याच्या गुंडांना अटक करतात.पण राज आणि बॉबी पळून जातात.राज आणि बॉबी धबधब्यावर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.पण राम आणि जॅक दोन्ही मुलांना बुडण्यापासून वाचवतात.पश्चात्ताप झालेला राम आणि जॅक,राज आणि बॉबीच्या नात्याला आशीर्वाद देतात,नंतर राज,बॉबी आणि त्यांचे वडील आनंदाने त्यांच्या कुटुंबाकडे परत जातात.

चित्रपटाचे संगीत

            या चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे असले तरी त्याला एक राज कपूर टच असल्याचे जाणवते. शैलेन्द्रसिंगने “मै शायर तो नही” हे सोलो गाणं खूप सुरेख म्हटलं आहे. “हम तुम एक कमरेमे बंद हो” हे शैलेन्द्रसिंगचे लता मंगेशकर यांच्या सोबतचं गाणं कमालीचं हिट झालं. याचं दोघांचं “झुट बोले कव्वा काटे”  आणि “मुझे कुछ कहना है,पहले तुम पहले तुम” ही गीतं सुद्धा तूफान लोकप्रिय झाली.नरेंद्र चंचलने “बेशक मंदिर मस्जिद तोडो” हे गीत गाजलं. “ना मांगू सोना चांदी” हे मन्नादा, शैलेन्द्रसिंग आणि लता मंगेशकर यांचं गाणं ही हिट झालं. एकूण सगळीच गाणी हिट झाली.     

 

सारांश

            ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी पदार्पणात सुरेख काम केले आहे. प्राण, प्रेमनाथ, अरुणा इराणी, फरिदा जलाल, दुर्गा खोटे यांनी त्यांना सुरेख साथ दिली आहे.राधू कर्माकर यांची सुरेख फोटोग्राफी, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे कर्णमधुर संगीत, आनंद बक्षी, विठ्ठलभाई पटेल आणि इंदरजीत तुलसी यांची प्रसंगानुरूप गाणी आणि राजकपूरचे सुरेख दिग्दर्शन या चित्रपटाच्या सगळ्याच बाजू छान जमून आल्याने चित्रपट हिट झाला.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

प्रसाद नातु, पुणे.

           

Comments

  1. There is a similarity between the first meeting of Raj Kapoor-Nargis and Rishi Kapoor-Dimple Kapadia in the actual cinema.
    This film was shown at Metro Theatre in Mumbai.
    Nice blog

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...