ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
Blog No.2023/25 2 Date:- 30 th , September 2023. मित्रांनो , 28 सप्टेंबर,1973 या दिवशी रिलीज झालेल्या एका चित्रपटाने किशोरवयीन मुलांमधील प्रेमाची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडून एक धमाका केला होता.त्या चित्रपटाला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली.माझ्या वयाच्या मित्रांना लगेच लक्षात येईल की तो चित्रपट दूसरा तिसरा कुठला नसून राज कपूर निर्मित दिग्दर्शित “ बॉबी ” हाच असणार. हो मी “ बॉबी ” चित्रपटाबद्दल बोलतोय आणि आजचा ब्लॉग “ बॉबी ” ला समर्पित. प्रास्ताविक राज कपूरने या चित्रपटातून आपला मुलगा ऋषी कपूरला हीरो म्हणून प्रदर्शित केले आणि डिंपल कपाडिया या नव्या हिरोईनला सुद्धा चित्रपटसृष्टीत आणले. या सोबतच शैलेन्द्रसिंग या नव्या गायकाचे पदार्पण देखिल या चित्रपटाद्वारे झाले. पहिल्या चित्रपटात हे तीनही तारे प्रकाशात आले.ऋषी कपूरने बरीच वर्षे चित्रपटसृष्टीवर राज्य केले आणि शैलेन्द्रसिंगला बरेच यश मिळाले.पण डिंपल कपाडिय...