Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

इन्कम-टॅक्स रिटर्न स्वतः फाइल करा भाग 1

Blog No. 2023/16 7           Date: 1st, July 2023. मित्रांनो,             आज 1 जुलै, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचा महिना.31 जुलै ही शेवटची तारीख आहे. रिटर्न स्वतः फाइल करीत असाल तर सोबत फॉर्म 16, टीडीएस सर्टिफिकेट, जर शेअर्समधे गुंतवणूक केलेली असेल आणि शेअरची विक्री केली असेल तर, कॅपिटल गेन्स सर्टिफिकेट, म्यूचुअल फंड विक्री केली असेल तर त्याचे सर्टिफिकेट सोबत ठेवा.तसेच इन्कम टॅक्स च्या साइटवरुन Annual Information Statement ( AIS ) आणि Taxpayer Information Statement ( TIS )  डाउनलोड करुन ठेवा. TIS open करण्यासाठी तुमचा PAN no small characters मधे आणि त्यानंतर तुमची जन्मतारीख जर 01011965 असेल तर ती लिहून उघडता येईल. abcda1234f01011965 हा पासवर्ड टाकावा लागेल.       तुमचे या वर्षात केलेले सर्व व्यवहार TIS मधे तुम्हाला दिसतील. स्वतःचे रिटर्न स्वतःच फाइल करा.       ITR form कुठला निवडाल?       ...

आहार विचार 5 सीताफळ एक गोड फळ

  Blog No. 2023/16 6           Date: 29 th , June 2023. मित्रांनो             आजपर्यंत आहार -विचार मध्ये आपण अननस, आंबा, केळी आणि पपई यांची सविस्तर माहिती घेतली. आज आषाढी एकादशीचा आहे आणि गुरुवार आहे. आज अशाच एका गोड फळाची माहिती आपण घेऊ. ते फळ म्हणजे सीताफळ.       प्रास्ताविक         सीताफळ ज्याला कस्टर्ड अॅपल देखिल म्हणतात.मूळचे हे फळ वेस्ट इंडिज बेटं आणि  अमेरिकेतील मूळ उष्णकटिबंधीय फळ आहे. वैज्ञानिकदृष्ट्या त्याला Annona squamosa म्हणतात. सीताफळ याचा सीता मातेशी कुठं संदर्भ लागतो कां? अगदी लंकेत अशोकवनांत वगैरे सीताफळाची झाडं असल्याचा कुठे संदर्भ लागतो कां? बघितलं.पण उत्तर कुठे मिळालं नाही.जाणकारांनी यावर जरूर प्रकाश टाकावा.तसं अजिंठ्याच्या लेण्यात सीताफळाचं चित्र बघितल्याचे काही संबंधित सांगतात.सीताफळाचा सीझन हा ऑगस्ट ते जानेवारी हा असतो. महाराष्ट्र, तेलंगणा,आसाम, उत्तर प्रदेश या राज्यात प्रामुख्याने सीताफळाची लागवड क...

आला पाऊस मातीच्या वासात ग

  Blog No. 2023/16 5           Date: 27 th , June 2023. मित्रांनो,             शेवटी आज येईल उद्या येईल करत करत पावसाळा आला.आजकाल ते निंबोणीच्या झाडाच्या बारीक फांद्या तोडून त्यावर एक बेडूक ठेवून “धोंडी धोंडी पाणी दे” करीत रस्त्यावरून फिरणारी माणसं दिसतं नाही. शहरीकरणाच्या जमान्यात बऱ्याच जुन्या गोष्टी नष्ट झाल्या.नव्या गोष्टींमध्ये एकाच पावसात शहरातील वाहतूक विस्कळीत होणे हे नित्याचे झाले आहे. अर्थात मुंबईकरांना ही देखिल गोष्ट नवीन नाही म्हणा. एक जुनी म्हणजे माझ्या लहानपणापासूनची सुरु आहे, ती म्हणजे पहिल्याच पावसात लाइट जाणे.आधी एमएसईबी नांव होतं,आता त्याचे तुकडे झाले अन महावितरण असं साध्या वितरणाचं महावितरण झालं तरी ते सुरु आहेच.आणि आठवड्यातला एक दिवस हे रिपेअर्स अँड मेंटेनेंससाठी हक्काने बंद ठेवतात. असो. पावसाळा म्हटलं कि काही विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणून याच विषयावर आजचा ब्लॉग.                  ...

बाल गंधर्व एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व

  Blog No. 2023/164          Date: 26 th , June 2023. मित्रांनो ,             कदाचित नारायण श्रीपाद राजहंस कोण असा कुणा मराठी माणसाला,जर तो नाट्यप्रेमी नसेल,प्रश्न केला.तर उत्तर माहित नाही असं असेल.पण बाल गंधर्व कोण म्हटलं तर सगळेच सांगतील की हो मी ओळखतो. बाल गंधर्व एक प्रसिद्ध मराठी गायक आणि रंगमंच अभिनेता होते.त्यांनी जेव्हा रंगमंचावर भूमिका केल्या . तेव्हा महिलांना रंगमंचावर अभिनय करण्याची परवानगी नसे.मराठी नाटकांतील स्त्री पात्रांच्या भूमिकेसाठी बाल गंधर्व ओळखले गेले , एवढेच नव्हे तर खूप प्रसिद्ध झाले. आज त्यांची 136 वी पुण्यतिथि आहे.त्यांना आदरांजली वाहणारा हा आजचा ब्लॉग.   प्रास्ताविक                 नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बाल गंधर्व यांचा जन्म 26 जून,1888 ला,एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात श्रीपाद राजहंस आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई राजहंस यांच्या पोटी झाला.त्यांचे जन्मगांव सांगली जिल्ह्यातील पलूस ...