ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
आज सकाळी सकाळीच मोबाईलची रिंग वाजली . तस धावतच फोन घेतला. तर समोरून माझा मित्र सदा भोजनी ओरडलाच “ राजा लेका अभिनंदन “ . मी म्हटले “कशाबद्धल? काय केले आहे मी? “. “अरे कुण्या गावच पाखरू ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाला आहे. काल पासून मी, सारे मित्र , साहित्य अकादमीतले तुझे मित्र, सारेच तुला शोधत आहेत , आहेस कुठे ?." त्याने एका दमात सारे सांगितले अन विचारले देखिल. “अरे काय सांगतो आहेस? खरं काय ? मी काल पासून निवांत मिळावा म्हणून सातपुड्याच्या पायथ्याशी माझ गाव आहे तिथे आलो आहे. इथे रेंज चा जरा प्रोब्लेम आहे. म्हणूनच फोन स्वीच...